शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ओम...शांती ईव्हीएम शांती

By दिलीप तिखिले | Updated: December 9, 2017 05:04 IST

या ‘ओखी’ चेही काही कळत नाही. ना काळाचे भान, ना वेळेचे. बरं महाराष्टÑात आले ते ठीक पण या राज्यातून नंतर शिरायचे कुठे तर... थेट गुजरातेतच...!

या ‘ओखी’ चेही काही कळत नाही. ना काळाचे भान, ना वेळेचे. बरं महाराष्टÑात आले ते ठीक पण या राज्यातून नंतर शिरायचे कुठे तर... थेट गुजरातेतच...! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्यात ! अरे बाबा.... तेथे निवडणुका आहेत. मोदीसाहेब सभांवर सभा घेत आहेत. मुख्यमंत्री असताना १४ वर्षांच्या काळात घेतल्या नसतील तेवढ्या सभा यावेळी ते घेताना दिसत आहेत. इलेक्शन नसते तर एवढ्या वेळेत त्यांचे १० विदेश दौरे नक्कीच झाले असते.असो...! मोदीसाहेब यावेळी संत्रस्त आहेत एवढे मात्र खरं... त्यामागे कारणेही अनेक आहेत. टिष्ट्वटरवर विराटने मोदींना क्लीन बोल्ड केले. मोदींच्या तुलनेत विराट कोहलीच्या फालोअर्सची संख्या वाढली आहे. तिकडे ओपिनियन पोलवाले बीजेपीचा ग्राफ दिवसागणिक खाली आणत आहेत. राहुल, हार्दिक, जिग्नेश या त्रिकुटाचा वादळी धुमाकूळ चालूच आहे. त्यात या ‘ओखी’ची भर. आणि हिंमतही बघा... चक्क त्यांची सुरतचीच सभा रद्द करून टाकली.बरं हे ‘ओखी’ पॉलिटिकल असते तर त्याचा बंदोबस्तही करता आला असता. चार-सहा सीडी व्हायरल करून टाकल्या असत्या. इडी, आयटी, सीबीआयच्या रेड टाकून ईडा-पिडा टाळली असती. महाराष्टÑातून गुजरातेत आले म्हणून सीजीएसटीचा बडगाही उगारला असता. आणि शेवटी काहीच नाही तर विरोधकांनीच हे वादळ गुजरातेत पाठविले म्हणून त्याचे भांडवलही करता आले असते. पण हे वादळ काही आपल्या पूर्वाश्रमीच्या टपरीवर चहा पिण्यासाठी किंवा आपली ‘मन ही बात’ ऐकण्यासाठी आले नाही. नियतीच्या मनात यावेळी वेगळे काहीतरी आहे असे आता मोदींनाही वाटू लागले. गुजरातेत आता जादूगरांचे नव्हे तर ज्योतिषाचे काम आहे हेही त्यांंनी ताडले. लगेच ज्योतिषी बीजेपी मुख्यालयात हजर झाले. त्यांनीही बीजेपीची कुंडली तयार करून राहुल, हार्दिक, जिग्नेश अनुक्रमे राहू, केतू, शनीच्या स्थानी असून ओखीच्या प्रभावाने ‘बुरे दिन’ची संभावना वर्तविली.बरं यावर काही उपाय? ग्रह शांती वगैर...एका नेत्याने विचारले.ज्योतिषी : आहे ना...! ‘ईव्हीएम शांती’... बस्स... त्यावर विश्वास ठेवा.आणि मग सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला...!- दिलीप तिखिले