शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईनचे ‘आॅफलाईन’ वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 03:39 IST

महाराष्ट्र डिजिटल होतोय. झालाही पाहीजे. पण ज्या उपक्रम आणि योजनांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर केला जात आहे त्या संबंधित लाभार्थी आणि योजना राबविणा-या यंत्रणेच्या सोयीच्या आहेत का ? ती माध्यमे त्यांच्यापर्यंत पोहोचली आहेत का ?

महाराष्ट्र डिजिटल होतोय. झालाही पाहीजे. पण ज्या उपक्रम आणि योजनांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर केला जात आहे त्या संबंधित लाभार्थी आणि योजना राबविणा-या यंत्रणेच्या सोयीच्या आहेत का ? ती माध्यमे त्यांच्यापर्यंत पोहोचली आहेत का ? पोहोचली नसतील तर त्याचा फटका लाभार्थ्यांना बसेल का ? यावरही डिजिटल संकल्पना राबविणा-या सरकारने आणि त्यांच्या डिजिटल अधिकाºयांनी ‘टिष्ट्वटर’वर मंथन करण्याची गरज आहे. सध्या राज्याच्या शिक्षण विभागात ‘आॅनलाईन’ वर ‘आॅफलाईन’ वादळ उठले आहे. शाळेच्या स्टाफरूममध्ये गुरुजी सरकारच्या आॅनलाईन धोरणावर तासन्तास ‘आॅफलाईन’ चर्चा करताना दिसत आहे. यात गुरुजींचा आणि सरकारचा दोघांचाही वेळ जातोय. नुकसान मात्र गरीब विद्यार्थ्यांचे होत आहे. ग्रामीण भागात सध्या दहावीचे परीक्षा अर्ज आॅनलाईन भरण्याचे काम सुरू आहे. मात्र राज्यातील पहिल्या डिजिटल नागपूर जिल्ह्यात आॅनलाईन परीक्षा अर्ज भरताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांना घाम फुटला आहे. यावरून दुर्गम भागातील स्थितीचा अंदाज बांधता येईल. आधीच सरकारचे अनुदान बंद असल्याने आणि इंटरनेट सुविधेचा अभाव असल्याने ग्रामीण भागातील शाळांनी विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी शहरातील नेट कॅफेचा आधार घेतला आहे. त्यात सर्व्हरडाऊन झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांची आणखी परीक्षा! गतवर्षी सर्व्हरडाऊनमुळे जानेवारी महिन्यापर्यंत केवळ परीक्षेचे अर्जच भरल्या गेले होते. हीच स्थिती यंदाही आहे.इकडे विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यासाठी सरकारने ‘महा डीबीटी’ पोर्टल सुरु केले आहे. हे पार्टल फारच चमत्कारिक आहे. त्याची गती पाहता यंदा शिष्यवृत्ती मिळेल का, हे कुणीही सांगू शकत नाही. सामाजिक न्याय, आदिवासी विकास, ओबीसी, अल्पसंख्यांक, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, कृषी, वैद्यकीय शिक्षण अशा आठ विभागांमार्फत जवळपास राज्यातील ५५ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ती दरवर्षी जुलैपासून विद्यार्थ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात होते. आज आॅक्टोबर संपतोय तरी छदामही मिळालेला नाही. हे आॅनलाईनचे यश मानावे का ? त्यामुळे जीएसटीचे जे झाले ते महा डीबीटीचेही होईल असे ‘आॅफलाईन’ बोलले जात आहे. सेल्फी विथ स्टुटंड, डिजिटल हजेरी, आॅनलाईन परीक्षा अर्ज, आॅनलाईन शिष्यवृत्ती आणि शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या. सारेकाही झाले. मात्र यातील कोणती योजना वास्तवात साकारली हे सरकार ‘आॅफलाईन’ तरी सांगेल का ?

टॅग्स :onlineऑनलाइन