शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

वेध - वेड लागलेला वन, वित्तमंत्री !

By admin | Updated: July 3, 2017 00:32 IST

मंत्रिपद आले की अनेकांना नको त्या गोष्टीचे वेड लागते. त्याच्या सूरस कथा लपूनही राहत नाहीत. अगदी अमित शहा यांनी मंत्र्यांच्या बैठकीत

- अतुल कुलकर्णीमंत्रिपद आले की अनेकांना नको त्या गोष्टीचे वेड लागते. त्याच्या सूरस कथा लपूनही राहत नाहीत. अगदी अमित शहा यांनी मंत्र्यांच्या बैठकीत कोणत्या मंत्र्याला झापले तेही बाहेर आलेच की... या सगळ्या पार्श्वभूमीवर वेड लागलेला वनमंत्री म्हणूनच वेगळा ठरतो...जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला सारा...गमे या भ्रांत संसारी, ध्रुवाचा ‘वेड’ हा तारा...कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनीकांचे... भ्रमाने राजसत्तेच्या, कुणाचे चित्त ते नाचे...कुणाला देव बहकावी,कुणाला देश चळ लावी... दुरंगी दीन दुनियेची, जवानी रंगली सारी...वीर वामनराव जोशी, यांनी लिहिलेले व वझेबुवांनी संगीत दिलेले, मा. दीनानाथ यांच्या आवाजामुळे अजरामर झालेले हे गाणे ७० वर्षानंतरही जसेच्या तसे खरे ठरताना दिसते आहे. आपल्या आजूबाजूला वेड्यांचाच पसारा मांडलाय, कुणाला पैशांचे वेड लागले, तर कुणाला हातात पैसे खेळू लागले की कामिनीचे वेड लागते. बेभानपणे पैसा, जवानी आणि नको नको त्या गोष्टींची बेफाम उधळण करणारे मग मिळालेल्या पदाचीही तमा बाळगत नाहीत. आज हे सगळे आठवण्याचे कारण ठरले आहेत, स्वत:च्याच निर्णयांचा पाठपुरावा घेण्याचे आणि दिसेल तेथे वृक्ष लावण्याचे वेड लागलेले मंत्री सुधीर मुनगंटीवार. मंत्रिपदाची झुल अंगावर आली की भल्या भल्यांना काही सुचेनासे होत असताना मुनगंटीवारांना गेले दोन ते तीन महिने झाडं लावण्याच्या वेडाने झपाटले आहे. गेल्यावर्षी सव्वा कोटी झाडं लावून झाल्यानंतर यावर्षी त्यांनी चार कोटी झाडं लावण्याचा संकल्प सोडला आणि त्यासाठी हा माणूस दिवसरात्र वेड्यासारखा भटकतो आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला सारून पक्ष आणि पक्षाबाहेरच्या नेत्यांचे उंबरे झिजवत त्यांनी राज्यातल्या एकाही नेत्याचे घर सोडले नाही. सगळ्यांनी वृक्षारोपणात सहभाग घ्यावा, वातावरण निर्मिती करावी याचा आग्रह त्यांनी धरला. १ जुलै ते ७ जुलै हा आठवडा प्रत्यक्षात कृती करुन दाखवण्याचा असताना मुनगंटीवार यांनी त्याआधी शेकडो बैठका घेतल्या. दिसेल त्याला झाडं किती लावली असे आग्रहाने विचारणाऱ्या या वेडाचे वर्णन कुणाला झाड बहकावी,कुणाला झाडे चळ लावी... यापेक्षा वेगळे काय असू शकते? त्यांचा हा वेडेपणा केवळ झाडे लावण्यापुरता राहिलेला नाही. स्वत:च्या मंत्री कार्यालयाला आयएसओ प्रमाणपत्र ही त्यांनी मिळवले. आपण जो निर्णय घेतो त्याचे पुढे काय झाले यासाठी टोकाचा चिवटपणे पाठपुरावा करणारा दुसरा मंत्री अभावानेच दिसतो. एखाद्या सचिवाला काम सांगितलेले असेल तर कुठे, कधी, कोणत्या वेळी आणि कोणासमोर ते काम सांगितले याची लेखी नोंद ते ठेवतात. एखाद्याने कधी सांगितले असे विचारले की ते लगेच ‘पाठपुरावा डायरी’ काढतात आणि सगळी कुंडली सांगून टाकतात. त्यामुळे ‘काम करतो पण पाठपुरावा आवरा’ असे म्हणण्याची वेळ सचिवांवर येते तेथे बाकीच्यांचे काय? आयएसओ प्रमाणपत्र घेतल्यानंतर आता त्यांच्या कार्यालयात कोणत्या अधिकाऱ्याने कोणते काम किती दिवसात पूर्ण करायचे याच्या याद्याच भिंतीवर लावून ठेवलेल्या आहेत. जर दिलेल्या वेळेत काम झाले नाही तर थेट आपल्याला सांगा, असे ते सांगतात. याच्या उलट अन्य मंत्री कार्यालये आहेत. कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही पण त्यांच्या मोबाईलवर आलेल्या एसएमएसचेही ते प्रिंटआऊट काढतात आणि त्याचे पुढे काय झाले हे खासगी सचिवांना विचारतात. हे असले वेड राज्यातल्या अन्य मंत्र्यांना १० टक्के जरी लागले तरी मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असणारा निकाल मिळायला वेळ लागणार नाही, पण अन्य मंत्र्यांना कशाकशाचे वेड लागले आहे याच्या सुरस कथा मंत्रालयात फिरले की हमखास ऐकायला मिळतात.जे चित्र आज वित्त मंत्र्यांच्या कार्यालयात पहायला मिळते तेच चित्र अन्य मंत्र्यांच्या कार्यालयात का पहायला मिळत नाही याचे उत्तर त्या त्या मंत्र्यांनी शोधायचा जरी प्रयत्न केला तरी खूप काही साध्य होईल...