शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आता एकच हुंकार मी का बेरोजगार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 05:22 IST

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्वाधिक तरुण मराठवाड्यातील आहेत़ लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात़ जागा निघत नाहीत़ निवड होणे तर दूरच़ या अस्वस्थतेतूनच मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांचे

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्वाधिक तरुण मराठवाड्यातील आहेत़ लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात़ जागा निघत नाहीत़ निवड होणे तर दूरच़ या अस्वस्थतेतूनच मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांचे मोर्चे निघाले़ सरकार त्याची दखल घेईल, अशी अपेक्षा आहे़ परंतु, बेरोजगारांना दिलासा मिळणारे चित्र दिसत नसल्याने मोर्चानंतर आता तरुणांनी विशेषत: मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी बेरोजगार पदयात्रेचा एल्गार पुकारला आहे़ पुण्यातील भिडेवाडा ते मुंबईमध्ये विधान भवनापर्यंत ही पदयात्रा ११ ते १९ मार्च दरम्यान जाईल, असा प्रचार विद्यार्थीच सोशल मीडियातून करीत आहेत़ ‘ना धर्मासाठी ना जातीसाठी, ना पक्षासाठी ना नेत्यासाठी, चल येऊ या रस्त्यावर बेरोजगारी संपविण्यासाठी, असा नारा दिला आहे़आता एकच हुंकार मी का बेरोजगार? असा सवाल करीत विद्यार्थ्यांनी पदयात्रेतील सहभागासाठी आॅनलाईन अर्ज भरणे सुरू केले आहे़ कुठलाही पक्ष नाही वा कुठलीही संघटना नाही़ उत्स्फूर्तपणे विद्यार्थी एकत्र येऊन विरोधाची मूठ आवळत आहेत़ केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेवर विद्यार्थ्यांचा विश्वास आहे़ कष्ट केले तर १०० टक्के यश मिळते़ परंतु, गेल्या काही वर्षांपासून भरतीच्या जाहिराती नाहीत़ वर्षानुवर्षे विद्यार्थी गाव सोडून जिल्ह्यांच्या ठिकाणी, ज्यांना परवडत नाही असे काहीजण अर्धवेळ नोकरी करीत पुण्यात ठाण मांडून आहेत़ यश अपयश दूर संधीही मिळत नाही, अशा विचित्र अवस्थेतून तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींना जावे लागत आहे़मराठवाड्यात रोजगाराच्या अन्य संधी दुर्मीळ असल्याने पदवीधर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत़ शिवाय, शिक्षक, प्राध्यापक पदांच्या रिक्त जागाही भरल्या जात नाहीत़ जवळ-जवळ भरती प्रक्रिया बंद आहे़ एकीकडे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करावे, असा आग्रह धरला जातो़ मात्र विद्यार्थी निवृत्तीचे वय वाढू नये, अशी भूमिका मांडत आहेत़ शिक्षित बेरोजगारांना अद्यापि बेरोजगार भत्ता मिळण्याची तरतूद नाही़ नोकर कपातीचे धोरण, रिक्त जागा न भरण्याचे धोरण़ यामुळे खासगी शिक्षण संस्थांमध्येही संधी नाहीत़ धर्मादाय शिक्षण संस्था आता कुटुंब संस्था बनल्या आहेत़ उरले-सुरले सरकारने कंपनीकरण करण्याचा घाट घातला आहे़ त्यामुळे जवळपासही रोजगाराची संधी नाही़ मराठवाड्यात एखादा प्रकल्प येईल आणि रोजगार उपलब्ध होईल, असा आशावादही निर्माण केला जात नाही़ दरम्यान, लातूरला रेल्वे डबे निर्मितीचा मोठा प्रकल्प आणि हजारो रोजगार उपलब्ध होतील, अशी दिलासा देणारी बातमी बेरोजगारांचे मोर्चे निघत असतानाच उमटली आहे़ मुळात अशा प्रकल्पातील रोजगार हा कौशल्याधारित असतो़ ते कौशल्यच मराठवाड्यातील तरुणांकडे नसेल तर पुन्हा मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रातील तरुणांनाही रेल्वेतील नोकºया कशा मिळतील़ कपूरथला, रायबरेली, चेन्नई या ठिकाणी असलेल्या प्रकल्पांमध्ये अपवादानेही महाराष्ट्रीयन नाव कर्मचाºयांच्या यादीत दिसत नाही़ एकंदर, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना तरुणांकडे संबंधित रोजगाराचे कौशल्य शिक्षण असले पाहिजे, याची काळजी धुरीणांनी घेतली पाहिजे़ त्यामुळे बेरोजगार पदयात्रा मंच स्थापन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी पुणे-मुंबई पायी प्रवास करणार आहे़ त्यांना आश्वासक उत्तरे न मिळाल्यास सत्ताधाºयांचा उलटा प्रवास सुरू व्हायला वेळ लागणार नाही़- धर्मराज हल्लाळे