शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आता बघा कोकणी इंगा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:53 IST

अखेर नाही... हो... म्हणत कणकवली नरेश दिल्ली दरबारी रुजू झाले. तीन महिन्यांपूर्वी आम्ही याच सदरात ‘कणकवली टू दिल्ली’ या शीर्षकाखाली राणे साहेबांच्या दिल्ली प्रस्थानाचे सूतोवाच केले होते, ते आता वास्तवात उतरले आहे.

-दिलीप तिखिलेअखेर नाही... हो... म्हणत कणकवली नरेश दिल्ली दरबारी रुजू झाले. तीन महिन्यांपूर्वी आम्ही याच सदरात ‘कणकवली टू दिल्ली’ या शीर्षकाखाली राणे साहेबांच्या दिल्ली प्रस्थानाचे सूतोवाच केले होते, ते आता वास्तवात उतरले आहे.असो... राणेजी आता भाजपाचे खासदार म्हणून पहिल्यांदाच संसदेत पाऊल ठेवत आहेत. या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि मिळालीच तर त्यांची मुंहतोड मुलाखत घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. आम्ही मनापासून दिलेल्या शुभेच्छांचे त्यांनी सहर्ष स्वागत केले कारण बिनविरोध निवड झाल्यानंतर मनापासून असे कुणीही त्यांचे अभिनंदन केले नसावे. भाजपाला मन मारून त्यांना खासदारकी द्यावी लागली. शिवसेनेची तर बातच सोडा. अभिनंदन करणे तर दूरच, धनुष्यातून त्यांनी तीरच जास्त सोडले. नीतेशही घरच्याघरी अभिनंदन करून मोकळा झाला. काँग्रेसचा माणूस, जाहीर अभिनंदन तरी कसे करणार? मग नारायणराव स्वत:च म्हणाले, जाऊ द्या हो...! तसंही काँग्रेस सोडल्यापासून मी कुणाकडून कधी सदिच्छा, शुभेच्छांची अपेक्षा केली नाही. तुम्ही विचारा काय विचारायचं ते.(मग मुलाखत सुरू झाली)प्रश्न : आता तुम्ही भाजपाचे खासदार झालात, तेव्हा तुमच्या मित्र पक्षाबद्दल तुमची काय भूमिका राहणार?राणे : कसला आलायं मित्र... त्याला नामोहरम करण्यासाठीच तर मला खासदार करण्यात आले. आता बघाच कसा इंगा दाखवितो ते.प्रश्न : म्हणजे हे आधीच ठरले होते तर?राणे : हो...! दिल्लीतील पहिल्या भेटीतच अमितभार्इंनी सांगितले होते, आम्ही तुम्हाला राज्यात पद देऊ नाहीतर दिल्लीला बोलावू. तुम्हाला मात्र ‘मातोश्री’वर नारायणास्त्र डागावेच लागेल.प्रश्न : पण तुम्ही तोफ डागली अन् ते बाहेर पडले तर देवेंद्रबाबू अडचणीत नाही का येणार?राणे : अजिबात नाही. तशी वेळ आलीच तर आमचा प्लॅन तयार आहे.प्रश्न : कुठला प्लॅन?राणे : ते नाही सांगणार. पण, एक सांगतो... ते सहजासहजी बाहेर पडणारे नाहीत. मला पद देण्याच्या विरोधात त्यांनी आकांडतांडव केले. मी झालो खासदार... पडले ते बाहेर...? मी तर आज पेपरमध्ये न्यूज बघत होतो...‘सेनेने भाजपाला दिली सोडचिठ्ठी’. कसली सोडचिठ्ठी अन् कसली काडीमोड. केवळ खिशात चिठ्ठ्या घेऊन फिरतात. त्या बाहेर काढायला स्वाभिमान लागतो.प्रश्न : अरे हो...! स्वाभिमानवरून आठवले. तुमच्या त्या स्वाभिमान पक्षाचे पुढे काय?राणे : काय म्हणजे...? राहू दे की पडून.(मग हळूच म्हणाले, आॅफ द रेकॉर्ड सांगतो, या भाजपावाल्यांचेही काही खरं नाही. मी केंद्रात मंत्रिपद मागितले आणि त्यावरून बिनसले तर काही वेळ विश्रांती घेण्यासाठी आपला स्वत:चा पक्ष नको का?)प्रश्न : म्हणजे, मंत्रिपदाची तुमची मागणी आताही कायम आहे तर! पण केंद्रात तर सध्या व्हेकन्सी नाही म्हणे?राणे : नसली तर ती करावी लागते राव. आधी ‘महाराष्टÑावर फोकस’. राज्यात सेनेला सत्तेतून बाहेर काढण्याचे टार्गेट पूर्ण केले की, केंद्रात अनंतराव स्वत:च व्हेकन्सी तयार करतील की! द्या टाळी...!