शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

अंध मुलींची बोटे 'शोधणार' स्तनांतला कर्करोग

By shrimant mane | Published: June 10, 2023 7:40 AM

अंध मुलींच्या हातात ईश्वरानेच अधिकची स्पर्श-संवेदना दिलेली असते. त्याद्वारे स्तनांमधल्या कर्करोगाच्या गाठी शोधण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे!

- श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर

असे म्हणतात, की परमेश्वर एखाद्यापासून काही काढून घेतो तेव्हाच तो त्याला काहीतरी जास्तीचेही देतो. जन्मत:च किंवा नंतर अपघाताने ज्या अभाग्यांच्या डोळ्यातल्या नेत्रज्योती विझल्या अशा अंध व्यक्तींना याच न्यायाने स्पर्शाचे, तसेच सूक्ष्मातिसूक्ष्म आवाज ऐकण्याचे जास्तीचे कसब मिळत असावे. त्या कौशल्याचा वापर करून अंधांच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार केला जाऊ शकतो, असे फ्रेंच अंधशिक्षक लुईस ब्रेल यांना वाटले आणि उंच ठिपक्यांची ब्रेल लिपी अस्तित्वात आली. तिने लाखो, कोट्यवधी अंधांच्या जीवनात शिक्षणाची प्रकाशकिरणे पेरली गेली. सध्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी तशाच उंच ठिपक्यांच्या अक्षर व अंकांचा वापर होतो आहे. प्रशिक्षित अंध मुलींच्या मदतीला ब्रेल माक्र्ड डॉक्युमेंटेशन टेप्स देण्यात आल्या आहेत. छातीची मापे घेण्यासाठी, त्यातील कमीअधिक जाणण्यासाठी या टेप्सचा उपयोग होतो.

अंधांच्या हातातील ही जादू सर्वप्रथम जर्मन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. फ्रँक हॉफमन यांनी सहा-सात वर्षांपूर्वी ओळखली. डिस्कव्हरिंग हँडस् नावाने त्यांनी एक उपक्रम सुरू केला आणि अल्पावधीतच तो कोलंबिया, मेक्सिको, ऑस्ट्रिया, स्वीत्झर्लंड व भारतात पोहोचला. कोवि महामारीच्या काळात विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून कोलंबिया, मेक्सिकोमध्ये ही निदानपद्धती थांबविण्यात आली. भारतात २०१७ पासून या दिशेने प्रयत्न सुरू झाले होते. सर्व प्रकारच्या दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी झटणारी एनेबल इंडिया ही स्वयंसेवी संस्था देशातल्या २८ राज्यांत काम करते. लाखो लोक तिच्याशी जोडलेले आहेत. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड म्हणजे नॅबच्या विमेन अँड डिसॅबिलिटी स्टडीजच्या मदतीने बंगळुरू येथे या संस्थेने मेडिकल टॅक्टाइल एक्झामिनर (एमटीई) नावाचा उपक्रम सुरू केला आहे. देशभरातील १८ अंध मुलींना दिल्ली व बंगळुरू येथे प्रशिक्षण दिले गेले. त्यापैकी सहा जणींनी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. भारतात जवळपास दीड कोटी महिला अंध आहेत आणि त्यापैकी केवळ पाच टक्के कमावत्या आहेत, ही बाब लक्षात घेतली तर स्वतःच्या आयुष्यातला अंधार आणि स्तनाच्या कर्करुग्णांमधील भीतीची छाया दूर करण्याचे दुहेरी साध्य अंध महिला साधू शकतात.

महिलांमध्ये आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक प्रमाण स्तनांच्या कर्करोगाचे आहे. मेदांता हॉस्पिटलच्या अभ्यासानुसार, केवळ २०२० साली जगभरात २३ लाख महिलांमध्ये स्तनांच्या कॅन्सरचे निदान झाले. या कॅन्सरमुळे ६ लाख ८५ हजार महिला मृत्यू पावल्या. वर्षअखेरीस नव्याने निदान झालेल्या व आधीच्या मिळून ७८ लाख महिला उपचार घेत होत्या. फुप्फुसाच्या कर्करोगाला याच वर्षी स्तनाच्या कर्करोगाने मागे टाकले.

भारतात वर्षाला साधारणपणे सव्वालाख नवे रुग्ण निष्पन्न होतात. त्यात अपवादानेच पुरुष असतात. केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, १९९० साली सर्व प्रकारच्या कर्करोगांमध्ये स्तनांचा कर्करोग चौथ्या क्रमांकावर होता. आता तो पहिल्या क्रमांकावर आहे.

१९६५ ते १९८५ या वीस वर्षांमध्ये स्तनांच्या कर्करोग्यांचे प्रमाण तब्बल ५० टक्क्यांनी वाढले. २०१६ साली वर्षभरात १ लाख १८ हजार रुग्णांचे नव्याने निदान झाले. त्यापैकी ९८.१ टक्के महिला होत्या. अलीकडच्या काही वर्षांत स्तनाच्या कर्करोगाच्या प्रमाणात दर हजारी ० ते १ वरून २.५ रुग्ण अशी भयावह वाढ झाली आहे. स्थूलपणा, विस्कळीत जीवनशैली, धूम्रपान व मद्यपानाचे वाढते प्रमाण ही स्तनांचा कर्करोग वाढण्याची प्रमुख कारणे सांगितली जातात. बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक श्रम, हालचाली कमी झाल्याचाही हा दुष्परिणाम आहे.

ही आकडेवारी म्हणजे वास्तव नाही. कारण, अगदी शहरातही लाजेस्तव, तसेच न जाणो आपल्याला कॅन्सर निष्पन्न झाला तर मुलांचे, कुटुंबाचे काय होईल या भीतीपोटी महिला तपासणीसाठी पुढे येतच नाहीत. ग्रामीण भागातील परिस्थिती तर अत्यंत चिंताजनक आहे. खेड्यापाड्यात तपासणीच्या सुविधा नाहीत. मॅमोग्राफी म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी असलेली एक्स रे तपासणी किंवा अल्ट्रासाउंड मशिन्स ही दूरची गोष्ट झाली. महिला आपल्या हातानेही स्तनांची तपासणी करू शकतात; परंतु ते सांगण्यासाठी कुणी खेड्यात जात नाही. कॅन्सर या शब्दानेच छाती दडपून जाते. स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकरात लवकर होणे गरजेचे असते. लवकर निदान झाल्यास उपचार सुलभ व कमी त्रासाचे असतात. स्तनातल्या गाठी अगदी ४ ते ५ सेंटीमीटरच्या होईपर्यंत वेदना जाणवत नाहीत. परिणामी, साठ टक्के रुग्णांचे निदान तिसऱ्या किंवा अखेरच्या चौथ्या टप्प्यात होते. अर्थातच मग परिणामकारक उपचार उपलब्ध असूनही त्यांना मर्यादा पडतात. गाठी लपवून ठेवण्याच्या नादात स्त्रियांचा जीव जातो.

परक्यांकडून स्तनांची तपासणी करून घेणे महिलांना नको असते, ही बाब लक्षात घेऊनच अंध मुलींच्या माध्यमातून निदानासाठी पुढाकार घेण्यात आला. त्याचे निष्कर्ष संभाव्य कर्करोग्यांच्या आयुष्यात आनंदाची पेरणी करणारे आहेत. फिजिशियनकडून तपासणीत १० ते २० मिलिमीटरच्या गाठींचे निदान होत असताना या मुलींनी केवळ ६ ते ८ मिलिमीटरच्या गाठी स्पर्शाने शोधून काढल्या. १३३८ संशयित महिलांच्या तपासणीत ७८ टक्के महिलांना स्तनांचा कर्करोग असल्याचे निदान झाले आणि तज्ज्ञ डॉक्टरांशी तुलना करता या प्रशिक्षित एमटीईचे निदान केवळ एका रुग्णाबाबत चुकीचे निघाले. थोडक्यात पांढरी काठी' हा कर्करोग्यांच्या आयुष्याचा आधार बनू पाहत आहे. shrimant.mane@lokmat.com

 

टॅग्स :cancerकर्करोग