शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पौष्टिक ‘स्मूदी’ पिऊया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2017 01:30 IST

आपल्या घरी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची फळे, भाज्या असतात. त्यांचे विविध प्रकार आपण करत असतोच. पण सध्या अशा विविध फळे आणि भाज्यांचा एक हटके

- भक्ती सोमण आपल्या घरी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची फळे, भाज्या असतात. त्यांचे विविध प्रकार आपण करत असतोच. पण सध्या अशा विविध फळे आणि भाज्यांचा एक हटके आणि पौष्टिक प्रकार जाम लोकप्रिय आहे, तो म्हणजे स्मूदी. आजकाल लोक आपल्या आरोग्याबाबत खूपच जागरूक झाले आहेत. आपण जे खाऊ- पिऊ त्यातून काही तरी पौष्टिक मिळाले तर ते त्यांना हवे असते. त्यासाठी खाण्यापिण्यावर असंख्य प्रयोग होत असतात. यातलाच एक हटके प्रकार म्हणजे स्मूदी. स्मूदी म्हणजे दही, दूध घालून केलेला फळ आणि भाज्यांचा घट्ट रस. जवळपास मिल्कशेकसारखाच. घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून सहज करता येणारा. स्मूदीसाठी लागतं काय? तर आपण नेहमी खातो ती सर्वच फळं. केळं, सफरचंद, स्ट्रॉबेरी, पेर, कलिंगड, संत्रं, मोसंबी अशी सगळंीच फळे. आणि जोडीला दही, दूध किंवा पाणी. त्यानंतर गोड वा खारी याप्रमाणे मीठ, साखर, मिरची, कोथिंबीर, क्वचित पुदिना असं. काही वेळा फळांबरोबर दालचिनीपूड, जायफळ पूड, कोको पावडरचा वापर केला जातो. बरं स्मूदी करणंही एकदम सोप्पं. एक केळं, अननसाचे तुकडे, अर्धा कप दही वा दूध, काजू, साखर हे सर्व मिक्सरमधून काढायचं. झाली स्मूदी तयार. घरात आंबे खूप आहेत. मिल्कशेक पिऊन कंटाळा आला असेल तर त्याची स्मूदी करा! आंब्याच्या फोडी, दही, थोडंसं क्रीम, साखर मिक्सरमधून घट्टसर काढा. ते मिश्रण काचेच्या ग्लासमध्ये घाला वरून छोट्या आंब्याच्या फोडी आणि मध. अहाहा... अफलातूून चव लागते. गार करून प्यायचे तर गार करून नाहीतर तसेही. घरात केळी असतातच. तर या केळ्याचे, अननसाचे तुकडे व संत्र्याचा रस एक तास फ्रीजमध्ये गार करून मिक्सरच्या भांड्यात हे सर्व घालून त्यात दही व पिठीसाखर घालून दाट घट्टसर अशी सेलन स्मूदी तयार होते. केळ्याची स्मूदी करताना तुम्ही त्यात चॉकलेट सिरपही घालू शकता. ओट्सचाही वापर आवडीप्रमाणे करता येऊ शकतो. अशा प्रकारे एकच फळ नाही तर दोन-तीन फळं एकत्र करूनही स्मूदी करता येईल. हे वाचून साहजिकच घरी स्मूदी करायचा मोह नक्कीच होईल. आता हॉटेल्स, मॉलमध्येही स्मूदी सहज मिळते. जर तिथे पिणार असाल तर ती प्यायला देतात ती काचेच्या आकर्षक ग्लासमधून. घट्ट स्मूदी, त्यावर फळांचे तुकडे घालून आकर्षक वेष्टनातली ही स्मूदी सिप सिप पिण्यात मजा येते. या स्मूदी साधारण २०० रुपयांपासून पुढे मिळतात. एखादवेळेस ज्या फळाची स्मूदी करायचीय तेच घरी नसेल तर मूड घालवू नका. कारण आता बाजारात स्मूदी सिरपही सहज मिळते. ते सिरप दूध, दह्यात घालून तुम्ही स्मूदीचा आनंद घेऊ शकता.घरातल्या सामानापासून अगदी सहज करता येऊ शकणारी, महत्त्वाचं म्हणजे अत्यंत पौष्टिक आणि कमी खर्चात तयार होणारी. आरोग्याच्या दृष्टीनेही परिपूर्ण असल्याने ती आपलीशी वाटते. हो ना?

bhaktisoman@gmail.com