शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

प्लास्टिकबंदीचे केवळ ‘कवित्व’ नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:15 IST

प्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरूशकेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जमिनीचा पोत तर त्यामुळे खराब होतोच पण पूर येण्यामागीलही ते एक मोठे कारण ठरते.

- सविता देव हरकरेप्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरूशकेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जमिनीचा पोत तर त्यामुळे खराब होतोच पण पूर येण्यामागीलही ते एक मोठे कारण ठरते. जमिनीवर प्लास्टिक कुजण्यास १००० वर्षे तर पाण्यात ४०० वर्षे लागतात. पण तोपर्यंत या प्लास्टिकने अनेकांचे जीवन कुजते.भारतवंशातील राजकारणात घोषणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही घोषणा तर सदासर्वकाळ चालणाऱ्या असतात. अलीकडील नरेंद्र मोदी यांचा ‘अच्छे दिन’चा जयघोष असो वा ३० वर्षांपूर्वी स्व. इंदिरा गांधी यांनी दिलेला ‘गरिबी हटाव’चा नारा. दारुबंदीचा फार्सही त्यातलाच. हजारो महिला आणि सामाजिक संघटनांची वर्षानुवर्षे आंदोलने झाली. पण खºया अर्थाने दारुमुक्ती काही होऊ शकली नाही. उलट राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये दारुबंदी घालण्यात आली तेथेच दारूचा महापूर वाहात असल्याचे चित्र बघण्यात आले. गुटखाबंदीचे तरी काय झाले? गुटखा मिळत नाही असे एकही ठिकाण कदाचित अख्ख्या राज्यात सापडणार नाही. विशेषत: निवडणुकांच्या काळात तर घोषणांचा अक्षरश: पाऊस पडत असतो. गंमत अशी की, यापैकी बहुतांश घोषणाही मग पाण्याच्या पावसाप्रमाणेच कुठे वाहून जातात कळत नाही. अशीच एक घोषणा नुकतीच महाराष्टÑ शासनानेही केली आहे. प्लास्टिकबंदीची. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिची अंमलबजावणी सुरू होणार होती. तशी ती झाली असेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. प्लास्टिकची विक्री आणि वापर यापुढे गुन्हा ठरणार आहे. प्लास्टिकबंदीचे उल्लंघन करणारे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांना एकतर जेलची हवा खावी लागेल किंवा २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. थर्माकोलचाही या बंदीत समावेश करण्यात आला आहे. अर्थात दुधाच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, औषधांची वेष्टने आदी वस्तू या बंदीतून तूर्तास वगळण्यात आल्या आहेत. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे ठरले असून दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जाणार आहे. या शासन निर्णयाचे स्वागतच करावयास हवे.आज केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे. प्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जगभरात दरवर्षी सुमारे ५०० अब्ज प्लास्टिक बॅग्सचा वापर होतो. मोठमोठ्या कंपन्यांची ८५ टक्के उत्पादने ही प्लास्टिकच्या आवरणातच असतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास आज मानवाचे जीवन प्लास्टिकमय झाले आहे आणि त्याला या प्लास्टिकपासून विघटित करणे, वाटते तेवढे सोपे नाही. याची सर्वांनाच कल्पना आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरूआहेत. परंतु आजवर त्याचा सकारात्मक परिणाम कधी समोर आला नाही. महाराष्टÑ शासनाने पुन्हा एकदा या कामी पुढाकार घेतला आहे. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करीत असतानाच केवळ बंदीने लोक प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे थांबवतील, असा समज कुणी करून घेऊ नये. काही दिवस कारवाईचा बडगा उगारला जाईल पण कालांतराने सर्व काही ‘आॅल इज वेल’ होऊन प्लास्टिक पिशव्यांचे चक्र पूर्ववत सुरू होईल. त्यामुळे या बंदीतून खरोखरच काही ठोस साध्य करायचे असल्यास कायद्याच्या दंडुक्यासोबतच लोकजागरणही करणे गरजेचे ठरणार आहे. प्लास्टिकचे दुष्परिणाम लोकांना पटवून द्यावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या वर्षांपासून प्लास्टिकने व्यसनाधीन लोकांना त्यातून मुक्त करण्याकरिता दुसरा पर्यायही उपलब्ध करून द्यावा लागेल. लोकजागर आणि राजकीय इच्छाशक्तीतून हे घडू शकते, अन्यथा प्लास्टिकबंदीचे केवळ कवित्व तेवढे शिल्लक राहील.