शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

मध्ययुगीन क्रौर्याची नवी आवृत्ती

By admin | Updated: February 7, 2015 00:09 IST

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरीया या आजवरच्या सगळ्यात खुंखार आणि भीतीदायक दहशतवादी संघटनेच्या भीषण कृत्यांनी जगभरात सर्वांनाच धडकी भरलेली आहे.

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड लेवांत किंवा इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरीया या आजवरच्या सगळ्यात खुंखार आणि भीतीदायक दहशतवादी संघटनेच्या भीषण कृत्यांनी जगभरात सर्वांनाच धडकी भरलेली आहे. मुळातच आयसीस ही एक अत्यंत क्रूर दहशतवादी संघटना म्हणून अल्पावधीतच जगासमोर आलेली आहे. इराक, सिरीया, जॉर्डन आदि देशांमध्ये आयसीसने प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे. मागच्या आठवड्यात आयसीसने एक जॉर्डेनियन वैमानिकाला पकडले होते. त्याला अत्यंत अमानुषपणाने जाळून मारले गेले. या घटनेचे पडसाद जगभर उमटणे क्रमप्राप्त होते. आपल्या एका वैमानिकाला अशा पद्धतीने मारले गेल्यामुळे जॉर्डनमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. जॉर्डन टाइम्सने या घटनेला ठळक प्रसिद्धी दिली आहे. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांनी जनतेने एकजूट दाखवावी आणि या जॉर्र्डेनियन लोकांचे खरे रूप दाखवून या दहशतवादी कृत्याचा मुकाबला करावा, असे आवाहन केले आहे. जॉर्डन या क्रूर घटनेचा बदला घेईल आणि त्याला जगाला हादरवून टाकणारे उत्तर देईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. जॉर्डनने पूर्वी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना जाळण्याची घटना घडल्यावर लगोलग फाशी दिले गेले. गुरुवारी जॉर्डनच्या विमान दलाने इस्लामिक स्टेटच्या सैनिकांवर हवाई हल्ले केल्याचे वृत्तही वाचायला मिळते आहे. त्यातल्या वाचकांच्या पत्रव्यवहारातही या घटनेबद्दलचा लोकांचा संताप व्यक्त होतो आहे. अब्दुल्ला मुस्तफा अल रवाबदेह नावाच्या एका वाचकाने आपल्या पत्रात एका मुस्लीम पायलटला क्रूरपणे मारले गेल्याचा उल्लेख केलेला आहे. या इस्लामिक स्टेटमध्ये इस्लामिक असे काहीच नाही, असे म्हणून त्याने जगातल्या मुस्लिमांनी या दहशतवादाचा प्रतिकार केला पाहिजे असे सांगितले आहे. अल झझिरानेही या घटनेला ठळक प्रसिद्धी दिली आहे. आता आयसीसचा पूर्णपणाने खातमा करण्यासाठीच्या लढ्याचे नेतृत्व जॉर्डन करेल काय, असा सवालही केला आहे. आजवर जॉर्डनने आयसीसला अटकाव करण्याचे काहीसे मर्यादित धोरण स्वीकारलेले होते. ते बदलून जॉर्डनने आयसीसला नरकाच्या दरवाजात खेचण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करावे, असे मत अफझल अश्रफ या स्तंभलेखकाने मांडले आहे. मानवतेबद्दलच्या दया आणि करुणेचा प्रेषितांचा दृष्टिकोन पवित्र कुराणाने मांडलेला आहे, असे सांगून आपल्या लेखात तो म्हणतो की, भीती, फसवणूक, कौर्य असणाऱ्या घटना घडवण्याची अमर्यादित क्षमता आयसीसकडे आहे. या सगळ्या गोष्टी आयसीसने इस्लामशी जोडल्या आहेत. पण त्यांची कृत्ये इस्लामच्या प्रेषितांचा उपमर्द करणारी आहेत, असेही हा लेखक म्हणतो. पाकिस्तानच्या डॉनने कालच्या अंकात या विषयावरचा फायटिंग आयएस हा मुअझ्झम हुसेन ह्या लेखकाचा एक लेख प्रसिद्ध केला आहे. तो खरे तर मुळातूनच वाचण्यासारखा आहे. त्या लेखात हुसेन म्हणतात की, सुन्नी अतिरेक्यांच्या या वेड्या दहशतवादी संघटनेच्या धोक्याचा मुकाबला करणाऱ्या जागतिक मोहिमेचे नेतृत्व जगातली एकमेव महासत्ता म्हणून अमेरिकेनेच केले पाहिजे. शिवाय इराकमधली लष्करी कारवाई करताना अमेरिकेने केलेल्या चुकांची परिणतीच आता आयसीसच्या रूपाने जगासमोर आलेली आहे. त्यामुळे अमेरिकेची जबाबदारी अधिकच मोठी आहे. इस्लामिक स्टेट हा सर्व जगासाठीच एक धोका असून, कोणत्याही देशाने त्यांना पाठिंबा दिलेला नाही. याला त्याने या विषयातली ‘सिल्व्हर लायनिंग’ असे म्हटले आहे. हे काम सोपे नाही असे नमूद करून हुसेन पुढे लिहितात की, अमेरिकेने एकट्याने करायचे हे काम नाही. त्यासाठी तिला सौदी अरेबिया आणि इराण तसेच रशियासह इतरही देशांचे सहकार्य लागणार आहे. तसेच अत्यंत काळजीपूर्वक आणि नेमकी अचूक लष्करी कारवाई आणि त्याच्या जोडीला योग्य राजनैतिक धोरणांचीही दहशतवादाच्या विरोधातली जागतिक कारवाई यशस्वी होण्यासाठी गरज आहे. ‘जेरुसलेम पोस्ट’मधल्या या विषयावरच्या बातम्या वाचताना आपण इस्त्रायलमधले वत्तपत्र वाचतो आहोत हे जाणवते. जॉर्डनच्या पायलटला जाळून मारल्यावर आयसीसने कसा जल्लोष केला याचा एक व्हिडीओ या वृत्तपत्राच्या वेबसाइटवर आहे. आयसीसच्या विरोधात अधिक लष्करी ताकद वापरण्यासाठी ओबामांनी कॉँग्रेसकडे संमती मागितली असल्याची बातमीही पोस्टने दिली आहे.सौदीमधले धर्मगुरू सलमान अल औदाह यांनी ट्विटरवर प्रतिक्रि या देताना म्हटले आहे की, अशा पद्धतीने कुणालाही कोणत्याही कारणासाठी जाळून टाकणे ही गोष्ट इस्लामी कायद्याला मान्य नसणारा भयंकर अपराध आहे. जवळपास एक हजार वर्षांचा इतिहास असणाऱ्या इजिप्तमधल्या अल-अझर विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांनी एक पत्रक काढून या सैतानी आणि क्रूर कृत्यामुळे जगभरात निर्माण होत असलेल्या धोक्याकडे लक्ष वेधले आहे. अल-अझारचे मुख्य असलेल्या अहमद-अल-तय्यब यांनी या अतिरेक्यांचे हात तोडले पाहिजेत आणि क्रुसावर लटकवून मारले पाहिजे, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. आयसीसने केलेल्या या जळीत प्रकरणाबद्दलचा संताप इतर देशांबरोबरच इस्लामी देशांमध्येही व्यक्त होतो आहे, हे महत्त्वाचे.- प्रा़ दिलीप फडके