शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

नेटिझन्स, जरा जपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 02:48 IST

आज आम्ही सोशल मीडियाच्या पार आहारी गेलो आहेत. एवढे की त्यामुळे होणाऱ्या नुकसानाचाही आम्हाला पर्वा राहिलेली नाही किंबहुना तसे भानच आम्हाला नाही.

आज आम्ही सोशल मीडियाच्या पार आहारी गेलो आहेत. एवढे की त्यामुळे होणाऱ्या नुकसानाचाही आम्हाला पर्वा राहिलेली नाही किंबहुना तसे भानच आम्हाला नाही. आपल्या आयुष्यातील अगदी लहानसहान प्रत्येक गोष्ट फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर शेअर केल्याशिवाय आम्हाला चैनच नसते. तसेही एखादी गोष्ट फुकटात मिळाली की ती जास्तीतजास्त वापरून घेण्याकडे आमचा कल असतो आणि आमच्या या प्रवृत्तीचाच मग फेसबुकसारख्या कंपन्या फायदा उचलत असतात. आम्ही जो डेटा फेसबुक, टिष्ट्वटर यासारख्या साईटस्वर टाकतो त्याचे पुढे काय होत असेल याचा विचारही करीत नाही. पण या वरील आमच्या वैयक्तिक माहितीची राजरोसपणे चोरी होतेय. यासंदर्भात अलीकडेच केम्ब्रिज अ‍ॅनलिटिकाचे प्रकरण उघडकीस आले असतानाच सायबरतज्ज्ञ अ‍ॅड. महेंद्र लिमये यांनी सुद्धा नेटिझन्सना यासंदर्भात सतर्क केले आहे. त्यांच्या मते फेसबुक वापरणाºया भारतातील २० कोटी लोकांचा डेटा असुरक्षित आहे. भारतीय डिजिटल निरक्षर असल्याचे त्यांचे म्हणणे मान्य करावे लागेल. तसेच मोबाईलवरून आर्थिक व्यवहार टाळण्याचा सल्लासुद्धा गांभीर्याने घ्यावा लागेल. त्याचे कारण असे की आमच्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की आपल्या मोबाईलवरील प्रत्येक डेटा अगदी बँक व्यवहार पण फेसबुकला स्टोअर होत असतो आणि मग या कंपन्या हीच माहिती कोट्यवधी रुपयात विकतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फेसबुक असो वा अन्य कुठलाही सोशल मीडिया ते व्यवसाय करताहेत. समाजकार्य नाही. सोशल मीडियावरील डेटाचा होणारा दुरुपयोग लक्षात घेता त्यावर सरकारी माहितीसुद्धा सुरक्षित नसल्याचा इशारा लिमये यांनी दिला आहे. २०१२ साली शासकीय दस्तावेज सोशल मीडियावर टाकण्याचे एक प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले होते. त्यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने सरकारी अधिकाºयांसाठी ई-मेल धोरण तयार केले होते. त्यानुसार सोशल मीडियावर शासकीय माहितीचे आदानप्रदान हे कायद्याचे उल्लंघन ठरते. पण सोशल मीडिया कंपन्यांचे सर्व्हर विदेशात असल्याने या कंपन्या भारतीय कायदे मानण्यास बाध्य नाहीत. अमेरिकेत नऊ इंटरनेट कंपन्यांनी आॅपरेशन प्रिझमअंतर्गत भारतासह अनेक देशांची माहिती अमेरिकी गुप्तचर संस्थांना पुरविली होती. हे वास्तव उघड झाल्यावरही भारत सरकार या कंपन्यांविरुद्ध कुठलीही कारवाई करू शकले नव्हते, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे भूतकाळातील अशा घटनांमधून धडा घेत वेळीच या माध्यमांना आणि त्यांच्या वापराला आवर घालणे नितांत गरजेचे आहे.