शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तोंड बंद...मसाला गायब !

By सचिन जवळकोटे | Updated: April 26, 2018 08:53 IST

केसपेपर घेऊन नेता रुबाब न करता गपगुमानं कोपऱ्यातल्या बाकड्यावर बसला.

गेल्या चार-पाच दिवसांपासून डॉक्टर का.न. तोंडे यांच्या ‘इएनटी’ हॉस्पिटलमध्ये खच्चून गर्दी होऊ लागलेली. प्रवेशद्वारातील रिसेप्शनिस्टचा हात नवीन केसपेपर्स तयार करता-करता भलताच दुखू लागलेला. विशेष म्हणजे बहुतांश पेशंटस्चा आजार जीभेशीच संबंधित. आत्ताही एक नवा पेशंट आला.नवा केसपेपर हातात घेत रिसेप्शनिस्टनं विचारल, ‘नाव काय?’... पण पेशंट गप्पच. त्याच्या अंगात कडक स्टार्चचा खादी ड्रेस. कपाळावर मात्र सतराशेसाठ जाळ्या. शेजारी उभी असलेली बहुधा त्याची पत्नी असावी. ‘तुमच्या मिस्टरांना काय झालंय?’ असं विचारताच नेत्याच्या सौभाग्यवतीनं सांगितलं, ‘गेल्या चार दिवसांपासून ते बोलतच नाहीत. तोंडातून आवाजच फुटेनासा झालाय,’ रिसेप्शनिस्टनं पुटपुटत केसपेपर रखडला, ‘बाईऽऽगं.. एकशे सहावा पेशंट हा. इथंही तोच प्रॉब्लेम. नक्कीच साथीचा रोग झालाय या राजकीय नेत्यांच्या जीभेला!’केसपेपर घेऊन नेता रुबाब न करता गपगुमानं कोपऱ्यातल्या बाकड्यावर बसला. हॉस्पिटलमध्ये सारेच पेशंट खादीधारी. प्रत्येकजण एकमेकाला ओळखणारा. मात्र एकमेकांशी बोलण्याची कुणाचीच तयारी दिसत नव्हती. सारेच नाकासमोर बघून बसलेले. जणू ‘हातावर घडी... तोंडावर बोट.’ विशेष म्हणजे, प्रत्येकाचं नाक भलतंच चमकू लागलेलं. दुसºयांच्या खासगी गोष्टीत नाक खुपसण्याची सवय सुटल्यामुळं कदाचित. एवढ्यात पोटाला हात धरून कळवळत एक पत्रकार हॉस्पिटलमध्ये आला. चेहरा पुरता नि:स्तेज. पोट खंगलेलं. तसं तर ते नेहमीच आत गेलेलं असतं, ही बाब अलहिदा. त्याला बघताच आतला प्रत्येकजण दहा फूट लांब. एवढ्यात नंबर पुकारताच नेता सौभाग्यवतीसह आत गेला. तिनं प्रॉब्लेम सांगताच डॉक्टरांनी काहीही न बोलता प्रिस्किप्शन लिहून दिलं. ते वाचून मात्र नेत्याची पत्नी चपापली; कारण त्यात औषधांचा उल्लेख नव्हताच. फक्त दहा-दहा किलो वजनाची दगडं दोन्ही पायांना बांधण्याचा सल्ला दिलेला. ‘डॉक्टरऽऽ माझ्या मिस्टरांच्या पायाला दगडं बांधल्यानं त्यांच्या तोंडाचा प्रॉब्लेम थोडाच सुटणार?’ तिनं काकुळतीला येऊन विचारताच डॉक्टर गालातल्या गालात हसत उत्तरले, ‘काळजी नको; गेल्या तीन दिवसांत मी जवळपास शंभरपेक्षाही जास्त नेत्यांना हाच सल्ला दिलाय अन् तो उतारा जणू ‘रामबाण’ ठरलाय... कारण जड वजनामुळं या साºया नेत्यांचे पाय जमिनीवर येतायेत. त्यामुळं त्यांच्या तोंडाचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह होतोय.’पेशंटनं आ वासला. गळ्यातल्या भगव्या उपरणानं कपाळावरचा घाम पुसत त्यानं केबिनचा दरवाजा उघडला. एवढ्यात तो पत्रकार बडबडत आत शिरला, ‘डॉक्टरऽऽ गेल्या चार दिवसांपासून माझ्या पोटात आग पडलीय. शरीरात कुठलंच त्राण राहिलेलं नाही,’ तेव्हा डॉक्टर उत्तरले, ‘तुमच्या शरीरात ऊर्जा देणारे व्हिटॅमिन्स् कमी झालेत, जे रोजच्या मसाल्यात असतात.’ बोलता-बोलता त्यांनी ड्रॉवरमधल्या मसाला शेंगा त्याला खाऊ घातल्या. काही क्षणातच पत्रकार फ्रेश झाला. ‘हा चमत्कार कसा काय घडला?’ या प्रश्नाला उत्तर न देता डॉक्टरांनी केवळ पेपरातली हेडलाईन दाखविली, ‘तोंड आवरा; माध्यमांना मसाला देऊ नका. मोदींनी दिला भाजप नेत्यांंना इशारा!’

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी