शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

मातृभूमी

By admin | Updated: July 2, 2016 05:43 IST

मातृभूमीविषयीचे विलक्षण, उत्कट प्रेम हा माणसाचा एक लक्षणीय विशेष आहे.

मातृभूमीविषयीचे विलक्षण, उत्कट प्रेम हा माणसाचा एक लक्षणीय विशेष आहे. आपला देश, तेथील संस्कृती, वेशभूषा, भाषा, परंपरा याची ओढ, याचा अभिमान रामायणापासून तर सावरकर साहित्यापर्यंत अक्षुण्णपणे व्यक्त होत आला आहे. अठ्ठावीस युरोपियन देशांच्या युनियनशी नाते तोडण्याचा जो निर्णय ब्रिटनने घेतला त्यामागे हे एक कारण असू शकते. मातृभूमीच्या प्रेमाची भावना तेथे प्रबळ झाली असावी. आज विज्ञान-तंत्र-यंत्र युगात जे सर्व विशेषांचे सपाटीकरण होते आहे त्याच्यापेक्षा ह्या घडामोडी वेगळ्या आहेत.भूमाता, मातृभूमी, ‘मदर अर्थ’ ही माणसाला प्राणाहून प्रिय असते. ‘भूमि: पुत्रोहं पृथिव्य:’ भूमी ही माझी माता आहे आणि मी पृथ्वीचा पुत्र, पृथ्वीचा अंश आहे असे ऋग्वेद सांगतो. या भूमातेशी आतड्याचे नाते असल्याने शेतीसाठी जमीन खोदणे, नांगरणे म्हणजे तिला जखमी करणे असे अनेक आदीम जाती मानतात.जॉन स्टाइनबेकच्या ‘दि ग्रेप्स आॅफ रॅथ’मध्ये ओक्लेहोमाचे रहिवासी आजोबा, वडील आणि नातू जगण्याच्या शोधात दुसरीकडे जायला निघतात. पण ‘हा प्रदेश कसाही असला तरी तो माझा प्रदेश आहे’ ही भावना त्यांच्या मनातून कधीही जात नाही. जी.ए. कुळकर्णींच्या ‘ठिपका’ कथेतील धनगर कुटुंबातला रामण्णाही असाच आहे. दुष्काळाने उद्ध्वस्त, उजाड झालेला तो प्रदेश सोडून सारे जातात. मात्र रामण्णा दुसरीकडे रुजायला जाण्याचे साफ नाकारतो. पर्ल बकच्या ‘गुड अर्थ’ मधील वँग लुंगची कथा अशीच मनाच्या घालमेलीची आहे. व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘काळी आई’ कथेतील अप्पा याला अपवाद नाहीत.हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राने वलयांकित, आसेतू हिमाचल आणि जगन्नाथपुरी ते द्वारका असणारी सुजला, सुफला असणारी आमची मातृभू श्यामल शेतजमिनीतून सोने निपजवते. गंगा-यमुना ते तापी-भीमा नद्यांच्या तीरावर या समृद्ध संस्कृतीचे जतन-वर्धन झाले. परकी आक्रमणांना, परकी साम्राज्याला परतवून लावण्यासाठी किती देशभक्त हसत फासावर चढले. ‘तुजसाठी मरण ते जनन’ या उदात्त विचाराने एका पिढीचे जीवन उजळून निघाले होते.मातृभूमीविषयीचा हा अभिमान कवी सुरेश भट यांनी फार वेगळ्या संदर्भात व्यक्त केला. हे मायभू! तुझे मी पांग फेडीन. मात्र माझी व्यक्तिगत व्यथा सांगून मी कधीही केविलवाणेपणा स्वीकारणार नाही. आज मातृभूमीसाठी स्वत:चे कर्तव्य चोखपणे पार पाडणाऱ्या व्यक्तींची देशाला गरज आहे. धनदौलतीच्या हव्यासाने परदेशात धाव घेणाऱ्यांपेक्षा देशात राहून स्वाभिमानाने श्रम करणाऱ्यांची गरज आहे. संवेदनशीलतेने मातृभूमीवर प्रेम करणाऱ्यांची राष्ट्राला आस आहे.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे