शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आई आणि व्यसन

By admin | Updated: January 17, 2015 00:46 IST

आईने नऊ महिने सोसावं आणि मुलाने व्यसनानं नासवावं. गुटखा, दारू, तंबाखू, धूम्रपान करून आईकडून मिळालेल्या शरीर नावाच्या साक्षात्काराची नासाडी करावी हा मातृदेवतेचा अपमान आहे,

विजयराज बोधनकर - आईने नऊ महिने सोसावं आणि मुलाने व्यसनानं नासवावं. गुटखा, दारू, तंबाखू, धूम्रपान करून आईकडून मिळालेल्या शरीर नावाच्या साक्षात्काराची नासाडी करावी हा मातृदेवतेचा अपमान आहे, हे कळायला शुद्धीवर असणे गरजेचे आहे. फुकट मिळालेल्या हृदयाला जेव्हा झटका येतो, तो बरा करायला पाच-सहा लाखांचा झटका पुन्हा मिळतो. तेव्हा घर रडतं. यातून वाचावं म्हणून पूर्ण घर तणावाच्या निवडुंगावर लटकतं... तेव्हा कळते आरोग्याची किमया. शरीर हे गुणतेचे मंदिर आहे. पण व्यसनापायी त्या शरीराचे स्मशान बनविले जाते. गुणतेचा गुंता होतो आणि आत्मा अनंतात विलीन होण्याच्या मार्गावर असतो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यातून वाचला की मग तो योगा, अध्यात्म, प्राणायामाचा स्वीकार करतो. संकटातून माणसाला शहाणपण सुचतं. याची ही प्रत्यक्ष घटना. माझ्या एका जवळच्या नातेवाइकाला गुटख्याचं प्रचंड व्यसन होतं. दिवसाला कित्येक पुड्या तो तोंडात उलट्या करायचा. खूपदा समजविण्याचा प्रयत्न केला. तर त्याचं उत्तर एकच, ‘‘आगे की आगे, एक दिन तो जानाही है!’’ असे पाच-सहा वर्ष निघून गेले. एक दिवस अचानक त्याची छाती भरून आली. हृदयाच्या तीव्र धक्क्याने साहेब कोसळले. हॉस्पिटलमध्ये •भरती केलं. पाच-सहा लाख रुपये डॉक्टरांना कमविण्याची संधी या व्यसनाने प्राप्त करून दिली. कष्टाची पुंजी एका झटक्यात गेली. घर उघड्यावर पडलं. पण हळूहळू तब्येत सुधारत गेली. आता हा नातेवाईक ‘गुटखा सोडा, आयुष्य जोडा!’ असा प्रचार करतोय. आता तो नित्यनेमाने योगा, प्राणायम करतो.. वेळेत जेवतो, झोपतो... सकाळी चालायला जातो... हेच शहाणपण त्याला अगोदरच सुचलं असतं तर? अनेकांना वाटतं जन्म-मरण हे देवाच्या हाती असतं. त्याचं बोलावणं आलं की जावं लागतं. असा विचारच मूर्खपणाचा आहे. स्वत:च्या आरोग्याचं विधिलिखित स्वत:ला लिहिता येऊ शकतं. केव्हा? जेव्हा तो अशी प्रतिज्ञा करेल की, ‘‘हे शरीर आईने दिलेली देणगी असून, या देणगीरूपी शरीराला मी व्यसनाच्या विळख्यात जाऊ न देता काळजीने त्याचे संगोपन करेन व आरोग्यदायी जगण्याचा प्रयत्न करेन!’’ अशा प्रतिज्ञेमुळे आपण सारेच आनंदी होऊन जगू.ज्याला मनाचा गुंता, संकट येण्याअगोदरच सोडविता येतं, त्याला स्वत:चं आयुष्य सुंदरतेने विणता येतं. शरीर हेच खरं मंदिर आहे. योगा, प्राणायाम, चिंंतन, ध्यान आणि समाधान हीच मनाची खरी पूजा व आंघोळही आहे. या सर्व गोष्टींना धन लागत नसून केवळ मन लागतं. म्हणून तुकोबाराया म्हणतात,फजितखोर मना किती तुज सांगोनको लागो कुणा मागे मागे।