शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

क्षणापासून मनापर्यंत

By admin | Updated: November 4, 2016 04:44 IST

पुढच्या क्षणी आपण असू की नसू याची खात्री माणसाला देता येत नाही.

पुढच्या क्षणी आपण असू की नसू याची खात्री माणसाला देता येत नाही. तरीही तो आपल्या भविष्याविषयी चिंताग्रस्त, आपल्या कर्तृत्वाविषयी तणावग्रस्त आणि आपल्या प्रॉपर्टीविषयी भयग्रस्त स्थितीत का असतो, हे लक्षात येत नाही. या तिन्ही दिशांनी त्याचे लक्ष सतत विचलित केल्याने हाती घेतलेले कोणतेही काम तो नीट पूर्ण करू शकत नाही. त्याने खरी काळजी घेतली पाहिजे ती आजच्या दिवसाची, हातातल्या कामाची, आत्ताच्या क्षणाची. या क्षणी जर तो शरीराने आणि मनाने सक्षम असला तरच जगण्याचा आनंद व्यवस्थित घेऊ शकतो आणि हातातील कामही यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. एक आजीबाई आयुष्यात प्रथमच पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाल्या. जाण्यापूर्वी आपले सारे दाग-दागिने एकत्र करून त्यांनी ते गाठोडे शेजारणीकडे ठेवले. पण त्या जसजशा पंढरीच्या दिशेने पुढे सरकत होत्या तसतसे त्यांचे मन त्या गाठोड्याच्या दिशेने मागे मागे जात होते. आपले दागिने चोरीला गेले तर आपले पुढे काय होईल या भीतीने त्या इतक्या ग्रस्त होत्या की पांडुरंगाच्या जागी त्याना ते दागिन्यांचे गाठोडेच दिसायला लागले.असेच एक सद्गृहस्थ आजारी वडिलांना भेटण्यासाठी ट्रेनमध्ये बसून निघाले होते. ते इतके टेन्शनमध्ये होते की बसताना ते आपली बॅग डोक्यावर घेऊन बसले. शेजारी म्हणाला, बॅग वर किंवा पायाखालच्या जागेत ठेऊ शकता. त्यावर ते सद्गृहस्थ काय म्हणतात? माझे तिकीट काढले आहे; बॅगेचे नाही! बॅग डोक्यावर ठेवल्याने त्यांचे टेन्शन कमी कसे होणार होते हे त्या पांडुरंगालाच ठावे.विचलित न होता हाती घेतलेल्या कामात पूर्णपणे बुडून जाणारा किंवा चालू क्षणांना आनंदाने सामोरे जाणारा माणूस आपोआप यशाच्या मुक्कामी पोहोचतो. विद्यार्थी असो, खेळाडू असो, चित्रकार असो, गायक असो, शिक्षक असो वा आणखी कोणी असो, कामात पूर्ण लक्ष घातले की तो यशस्वी होणार हे नक्की. बर्फ जसा पाण्यात विरघळतो किंवा तेल आणि वात जसे पूर्णपणे एकरूप होऊन प्रकाश देण्याचे काम करतात, तसे माणसाने कामाशी एकरूप झाले पाहिजे. आजीबाईनी गाठोड्याचा विचार डोक्यातून काढून टाकणे किंवा त्या गृहस्थाने डोक्यावरचे ओझे खाली उतरून ठेवणे आवश्यक होते. आजीबार्इंनी विठ्ठलाचे नामस्मरण करत राहणे आणि त्या गृहस्थाने वडिलांना आराम पडावा म्हणून औषधोपचारांचे नियोजन करत, सद्भावनांचे वलय विस्तारत ठेवणे अधिक महत्वाचे होते.-प्रल्हाद जाधव