शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

मोदींच्या पावलावरच जनरल सिंग यांचेही पाऊल

By admin | Updated: April 17, 2015 23:45 IST

सध्या मीडियावर दोषारोपण करण्याचा काळ आला आहे असे दिसते. केंद्रीय मंत्री तसेच माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी पत्रकारांचे वर्णन ‘वेश्या’ असे केले आहे.

सध्या मीडियावर दोषारोपण करण्याचा काळ आला आहे असे दिसते. केंद्रीय मंत्री तसेच माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी पत्रकारांचे वर्णन ‘वेश्या’ असे केले आहे. त्यांचे वरिष्ठ नरेंद्र मोदी हेही पत्रकारांना बातम्यांचे सौदागर म्हणून हिणवीत होते. सरकारचे नेतृत्व करणारी व्यक्ती जर पत्रकारांबद्दल ही भावना बाळगत असेल तर मग त्यांच्या अन्य मंत्र्यांकडून वेगळ्या भावनेची कशी अपेक्षा करता येईल? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही पत्रकारांना ‘बिकावू’ किंवा ‘बाजारू’ म्हणतच असतात ना?माझा हा स्तंभ मी माझ्या पत्रकार बंधूंचा बचाव करण्यासाठी वापरणार नाही. कारण अलीकडच्या काळात काही पत्रकारांनी नैतिकतेला सोडून वर्तन केले असल्याचे पुरावे आहेत. जेव्हा तारतम्याची जागा खळबळजनक वृत्ते घेतात, जिथे खोटेनाटेपणा सत्यावर मात करतो, त्यावेळी पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर हल्ला होण्याची शक्यता वाढते. वृत्तवाहिन्यांचा दहशतवाद इतका वाढला आहे की स्पर्धेच्या नावाखाली, चुकीचे बटन दाबून, जीवघेणी स्पर्धा केली जात आहे. काही न्यूज चॅनेलने जनरल व्ही.के. सिंग यांच्या बोलण्यातील उपरोध चुकीच्या पद्धतीने मांडला. येमेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतले त्याचे कौतुक न करता त्यांच्या पाकिस्तान दिनाच्या उपस्थितीला त्यांनी अवाजवी महत्त्व दिले. काही वृत्तसंस्थांनी दबावाखाली केजरीवाल यांना दिल्ली निवडणुकीच्या वेळी पराभूत करण्याचा प्रयत्न केला.पण तरीही सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती जेव्हा मीडियाची अवहेलना करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा निषेधाचा झेंडा उंचावून त्यांचा निषेध केलाच पाहिजे. जे बहुसंख्य पत्रकार आपले काम समर्पणाच्या भावनेने चोख बजावीत असतात, त्यांची गणना वेश्यावृत्तीच्या पत्रकारांमध्ये जनरल सिंग यांनी करून त्यांचा एकप्रकारे अवमानच केला आहे. जनरलनी लष्करात प्रशिक्षण घेतले असल्यामुळे त्यांचे जग एकतर मित्र नाहीतर शत्रू याच विचारांनी भरलेले असते. त्यांनी ‘ते’ विरुद्ध ‘आम्ही’ अशा भेदभावाचा विचार करणे असहिष्णू वृत्तीचे दर्शन घडविते, जिला वास्तविक उदारमतवादी लोकशाहीत स्थान नसावे. त्यांनी नंतर पत्रकारांची काहीशी क्षमा मागितली असली तरी जनरलनी आपल्याविरुद्धच्या मीडियातील प्रचार मोहिमेमागे लष्करातील एका गटाचा हात असावा असे सांगून नवा वाद उपस्थित केला आहे. दुर्दैवाने, सध्याच्या टी.व्ही.च्या प्राइम टाइममध्ये चालणाऱ्या कर्कश चर्चेने, बातमीची जागा गोंधळाने घेतली आहे. बातमीसाठी ९० टक्के पत्रकारांनी परिश्रम घेतलेले असतात. कठीण परिस्थितीचा सामना करून त्यांनी बातमी मिळवलेली असते. पण एखाद्या व्यवसायाला स्वत:च्या खासगी भूमिकेमुळे अपमानास्पद पद्धतीने कमी लेखणे हे धोकादायक आहे. आपल्यावर काहींनी व्यक्तिगत टीका केली होती असे मोदी आणि सिंग म्हणू शकतात. मोदींना काहींनी ‘भस्मासूर’ किंवा ‘बेडूक’ किंवा ‘मौत का सौदागर’ म्हटले होते. पण ही शिवी त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्याबद्दल वापरली होती आणि तसे करणेही वास्तविक अक्षम्य होते. पण त्या तऱ्हेच्या शिव्या वापरल्यामुळेच मोदींना निवडणुकीत यश मिळू शकले. त्या शिव्या म्हणजे आपल्याविरुद्ध काँग्रेसने चालविलेली बदनामीकारक मोहीम होती असे ते म्हणू शकले. पण मोदींनीदेखील काँग्रेसवर टीका करताना गांधी कुटुंबीयांवर याच तऱ्हेची बदनामीकारक मोहीम चालविली होती किंवा शशी थरुर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदाचा उल्लेख त्यांनी थरुर यांची ‘५० कोटींची मैत्रीण’ असा केला होता हेही विसरता येणार नाही. सार्वजनिक जीवनात अशा तऱ्हेच्या असभ्य भाषेचा वापर केला जाता कामा नये. विशेषत: ज्याला राजनीतिनिपुण राजकारणी व्हायचं आहे, भडकावू पुढारी व्हायचे नाही, त्यांनी तर नाहीच!सत्तारूढ पक्षाचे जे चिअरलीडर्स म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडून जो संदेश दिला जात आहे तो धोकादायक आहे. सरकारवर होणारी टीका जेव्हा वृत्तपत्रीय व्यभिचार समजला जातो, तेव्हा अशी टीका दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या एनजीओ, विधिज्ञ, मानवी हक्कांचे संरक्षक जेव्हा सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्यावर सरकारकडून तपासणी यंत्रणेची नजर ठेवण्यात येते. आणीबाणी काळाशी त्याची तुलना करणे हे थोडेसे अतिरंजितपणाचे होईल, पण जे सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर टीका करतात त्यांना विशेषकरून लक्ष्य करण्यात येते पण त्याचवेळी सरकारचे लांगूलचालन करणाऱ्या पत्रकारांना त्यांच्या कामाचे बक्षीसही देण्यात येते.सोशल मीडियात मोदींच्या समर्थकांची संख्या जास्त आहे, पण तिथे जर कुणी सरकारवर टीका केली तर त्याला ‘राष्ट्रविरोधी’ ठरविण्यात येते किंवा त्याहून वाईट शब्दात त्यांची संभावना करण्यात येते. आजचा जमाना हा टिष्ट्वटरचा आहे पण तिथेही विरोधी स्वरांवर टीका करण्यात येते. त्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतो. जनरल सिंग यांनी या पद्धतीने पत्रकारांवर टीका करण्यासाठी शिव्या देणारी फौजच टष्ट्वीटरवर उभी केली आहे. १९७० साली जर सोशल मीडिया अस्तित्वात असता तर इंदिरा गांधींच्या समर्थकांनी तेच केले असते.मोदी निर्भयपणे आणीबाणीवर टीका करीत असतात पण त्यांनाही इंदिरा गांधीच्या मार्गाने एकाधिकारशाहीकडे जायचे आहे का? कारण इंदिरा गांधींनाही त्यांच्यासमोर झुकणारा लवचिक मीडियाच हवा होता. त्यांनाही मीडियावर सतत टीका करणारी व्यक्ती त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून हवी आहे का?जाता जाता - दिल्लीच्या निवडणुकीतील ओपिनियन पोलमध्ये भाजपा हा आपच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे सांगणाऱ्या मीडियाला मोदींनी ‘बाजारू’ म्हटले होते. आमचे ओपिनियन पोल्स चुकीचे ठरले तर आमच्यावर टीका करणे योग्य ठरेल. पण पोलचे जे निष्कर्ष असतात त्यांच्याशी पत्रकारांचा संबंध नसतो पण अंतिम निकालाबद्दल न्यूज चॅनेल्सना जबाबदार धरण्यात येते. पण आपने ७० पैकी ६७ जागा जेव्हा जिंकल्या तेव्हा आपल्या नेत्याचे आकलन चुकीचे होते असे सरकारच्या प्रचारकांनी म्हटलेले माझ्या कानावर तरी आलेले नाही. आजच्या पत्रकारांचे जीवन अशातऱ्हेने धोकादायक बनले आहे!राजदीप सरदेसाई(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)