शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

विनय

By admin | Updated: May 31, 2015 23:55 IST

ज्या समाजानं ज्ञानदेवादी भावंडांचा अनन्वित छळ केला, त्यांच्या माता-पित्यास देहान्त प्रायश्चित्त दिलं, त्या समाजाला शिव्याशाप तर राहू द्या; परंतु कडक शब्दांतून

डॉ. कुमुद गोसावीआकाशात पौर्णिमेचं टिपूर चांदणं पूर्ण चंद्राची आभा वाढवतं तसं विद्याविभूषित माणसाचं विनयशील वागणं हे त्याचं भूषणच ठरतं. ‘विद्या विनयेन शोभते’ असं रत्नालंकारासारखं म्हटलं जातं. संत-महंतांची, ज्ञानी-विचारवंतांची, महान कलावंतांची चरित्रं, त्यांनी मळलेल्या वाटा आणि त्यांची भव्यदिव्य वाङ्मय दालनं बघितली की, त्यांच्यातील विनयाचं-विनम्रभावाचं दर्शन आकाशाला गवसणी घालून जातं!ज्या समाजानं ज्ञानदेवादी भावंडांचा अनन्वित छळ केला, त्यांच्या माता-पित्यास देहान्त प्रायश्चित्त दिलं, त्या समाजाला शिव्याशाप तर राहू द्या; परंतु कडक शब्दांतून तक्रारही ज्ञानदेवांनी केलेली नाही! हा केवढा विनय म्हणायचा, ज्ञानदेव माउलींचा!‘ज्ञानाचा एका’ म्हणणाऱ्या संत एकनाथांच्या अंगावर वारंवार थुंकणाऱ्या यवनावर न रागवता उलट त्याच्या थुंकण्यामुळे आपल्याला अनेकवार गोदास्नान घडलं, म्हणून त्याला धन्यवाद दिले! शांतिब्रह्म नाथांच्या या टोकाच्या विनम्रभावानं त्या यवनाचं मनपरिवर्तन झालं! तो त्या रात्री आपण होऊन नाथांच्या कीर्तनास नाथवाड्यात गेला!याउलट अर्ध्या हळकुंडात पिवळी झालेली माणसं आपण बघतो. अहंतेच्या आहारी जाऊन सत्ताधीशांची मुजोरी आपण अनुभवतो. भोळ्याभोळ्या माणसांची समाजात होणारी फसवणूक आपण पाहतो. कधी एखादी भाजीवालीदेखील आपल्याशी अरेरावीची भाषा वापरते. तरीही गरजू ग्राहक तिच्याकडून भाजी विकत घेतो. त्यामुळे ती ताठच राहते! मात्र एखाद्या बड्या अधिकाऱ्याकडं वा दिग्गज कलावंताकडं दबकतच जातो आणि त्यांच्या विनयशील वृत्तीनं आपण भारावून जातो! ‘प्रेमानं जग जिकता येतं!’ असं म्हणतात; पण त्या पे्रमाची वीण जर विनयाच्या धाग्यांनी विणलेली नसेल तर ती चटकन उसवून जाण्याची शक्यता असते. वीर हनुमंत श्रेष्ठ दर्जाचे संगीतज्ञ होते! एकदा हिमालयावर एकांतात ते वीणावादन करतात. भजनात तल्लीन होतात! नारद तिथं येतात, आपली वीणा बाजूच्या खडकावर ठेवून हनुमंताचं रामभजन ऐकतात. हनुमंताला भान नसतं. त्यांच्या त्या आर्द्र अंत:करणाच्या भजनानं तो खडक पाझरतो! नारदाची वीणा त्या पाझरणाऱ्या खडकात असते! हनुमंताचं भजन थांबताच तो खडक पूर्ववत होतो! नारद वीणा आणायला जातात. (आत्मप्रौढीनं) म्हणतात, ‘हनुमंता! मी वीणेवर भजन गातो म्हणजे खडक द्रवेल, मग माझी वीणा मी घेईन.’ नारद तास-दीड तास गातात! मात्र खडक पाझरत नाही! हनुमान विनयानं गातात व खडक द्रवतो! नारदाचा अहंकार गळून पडतो! खरंच इथं हा विनयाचा फार मोठा विजयच म्हणायला हवा!