शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीचे शेती उत्पन्न पाण्यात

By admin | Updated: October 5, 2016 03:50 IST

गत चार वर्षांतील दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला प्रारंभीच्या पावसाने दिलासा दिला आणि संकटाचा सामना करीत सोयाबीन,

गत चार वर्षांतील दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला प्रारंभीच्या पावसाने दिलासा दिला आणि संकटाचा सामना करीत सोयाबीन, कापूस, उडीद, ज्वारी बहरलेली असतानाच परतीच्या पावसाने दगा दिला़ तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला़ पेरणी झालेले ७० टक्के खरीप एक तर वाहून गेले वा पाण्यात गेले़ आता पाहाणी होईल़ पंचनामे होतील़ आश्वासने मिळतील़ सरकार मदतही देईल़ प्रश्न आहे तो कोट्यवधीच्या नुकसानीचा आणि प्रत्यक्ष मिळणाऱ्या दोन-चार हजारांच्या मदतीचा़ मराठवाड्यात नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीसह सर्वच जिल्ह्यांत खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा होतो़ एकट्या नांदेड जिल्ह्यात ७ लाख ७७ हजार ५०० एकरांमध्ये सोयाबीन होते़ त्या खालोखाल ६ लाख ३१ हजार ७२० एकरांमध्ये कापूस होतोे़ शिवाय उडीद, ज्वारीचा पेराही मोठा होता़ तुलनेने यंदा पाऊस बरा झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़, परंतु परतीच्या पावसाने पिके तर पाण्यात गेलीच, शिवाय लाखो हेक्टर जमीन खरडून गेली़ एकूण पेरा झालेल्या शेती क्षेत्रापैकी ७० टक्के पेरा क्षतिग्रस्त झाला़ म्हणजेच नांदेड जिल्ह्यात सव्वापाच लाख एकरांवरील सोयाबीन आडवे झाले़ एकरी १० क्विंटल उत्पन्न निघेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता़ त्याला तीन हजार भाव जरी गृहीत धरला तरी एका जिल्ह्यात दीड हजार कोटींचे सोयाबीन उत्पन्न बुडाले आहे़ कापूस, उडीद, ज्वारीचे आणखी वेगळे़ एकंदर अतिवृष्टीने शेतमाल व्यवसायावरही संकट कोसळले असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हाती काही उरले नाही़ अनेकांनी मोठ्या कष्टाने जमीन कसली होती़ कोरड्याठाक पडलेल्या तलावातील, मोठ्या प्रकल्पांमधील गाळाचा उपसा करून खडकाळ जमीन सुपीक केली, मात्र पावसाने काळी माती वाहून गेली़ बळीराजा आशावादीखरीप गेले, आता रबी चांगली येईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे़ त्या आशेवरच येणारा दिवाळ सण गोड करण्याच्या तयारीला शेतकरी लागला आहे़ जणू ओल्या दुष्काळाच्या वेदनेला भरलेल्या जलसाठ्यांची सुखद किनारही आहे़ मराठवाड्यातील धरणे, मध्यम लघुप्रकल्प ६८़१५ टक्के भरले आहेत़ गेल्या वर्षी ते केवळ ८़१३ टक्के इतक्याच जिवंत साठ्याने व्यापले होते़ मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी ७३़२७ टक्के भरले आहे़ निम्न तेरणा, दूधना, मांजरा, माजलगाव धरणेही भरली आहेत़ येलदरीत येवा सुरू आहे़ त्यामुळे केवळ जिल्हा शहरे, तालुक्याचे ठिकाणे व मोठ्या गावांना निव्वळ पेयजलासाठी गेली अनेक वर्षे राखीव असलेली धरणे सिंचनासाठी उपयोगात येतील़ रबीला पाणी मिळेल़ जलसंकटही घोंघावणार नाही़ हा सुखद अनुभव असला तरी शेतकऱ्यांच्या सद्य:स्थितीतील दुरवस्थेकडे दुर्लक्ष करता येणार नाही़ ज्या शेतकऱ्यांनी लाखांत उत्पन्न मिळविले असते, त्यांना हजार अन् शेकड्यावर समाधान मानावे लागते, ही शोकांतिका बदलावी लागेल़ किरकोळ मदत नव्हे, तर भक्कम नुकसान भरपाई मिळाली पाहिजे़ तीही तातडीने़ २४ जण बचावलेमराठवाड्याला दुष्काळाचे नावीन्य नाही़ अतिवृष्टी अन् पुराचे फटके मात्र अभावाने बसतात़ सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अन् आॅक्टोबरच्या प्रारंभाला मराठवाड्याच्या बहुतांश भागात विशेषत: नांदेड व लातूर जिल्ह्यात नद्यांना पूर आले़ शेकडो गावांचा संपर्क तुटला़ हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविले़ धरणांचे दरवाजे उघडले, राज्य मार्ग नव्हे, तर राष्ट्रीय मार्गही २३ तास बंद राहिले़ त्याच वेळी लिंबोटी धरणालगत अन् इतर ठिकाणी उद्भवलेल्या पुरात २४ जण अडकले होते़ जिल्हाधिकारी सुरेश काकाणी तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या महत्प्रयासाने हानी टळली़ मदतीसाठी आलेले हेलिकॉप्टर परतले होते़ धोका वाढला होता़ अशा बिकट स्थितीत सर्वच्या सर्व २४ जण सुखरूप बाहेर आल्याने स्थानिक आपत्ती व्यवस्थापनावरचा विश्वास अधिक बळकट झाला़ - धर्मराज हल्लाळे