शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘म्याव म्याव’ आपल्या दारात...

By admin | Updated: March 4, 2015 22:57 IST

तरुणाईला उद्ध्वस्त करू पाहणारा ‘म्याव म्याव’ हा अमली पदार्थ ग्रामीण महाराष्ट्रात पोहोचलाच कसा? ३५ कोटी किमतीचा ५०० किलो मेफेड्रॉन कुर्डूवाडीत कसा पोहोचला...

तरुणाईला उद्ध्वस्त करू पाहणारा ‘म्याव म्याव’ हा अमली पदार्थ ग्रामीण महाराष्ट्रात पोहोचलाच कसा? ३५ कोटी किमतीचा ५०० किलो मेफेड्रॉन कुर्डूवाडीत कसा पोहोचला...अनेकदा संकटं आपल्या आसपास वावरत असतात, पण आपण मात्र त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये दाखल झालेली संकटे आपल्या दारात वावरत आहेत, याचेही भान आपल्याला नसते. तसाच प्रकार ‘मेफेड्रॉन’ या अमली पदार्थाच्या ग्रामीण महाराष्ट्रातील वावराबद्दल झालेला दिसतो. मागच्या आठवड्यात केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या गुप्तवार्ता विभागाने दिल्लीत ३० कोटी रुपये किमतीचा मेफेड्रॉन हा सहाशे किलो अमली पदार्थ पकडला. पपईची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये पपईसोबत हा अमली पदार्थ पाठविला जात होता. विशेष म्हणजे हा ट्रक सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी या गावातून पाठविला गेल्याचेही महसूल गुप्तवार्ता विभागाच्या तपासात निष्पन्न झाले. दिल्लीहून आलेल्या या बातमीने राज्यात खळबळ झाली. कुर्डूवाडीतून पपईसोबत जाणारा हा अमली पदार्थ कसा आणि कधी पाठविला जात असेल? तो नक्की तयार कोठे केला जात असेल? हा प्रकार कुर्डूवाडीत आणि राज्यातील इतर भागांतही चालत असेल का? असे असंख्य प्रश्न तुमच्या-आमच्या मनात उभे राहिले. हे प्रकरण आपल्या मनातील प्रश्न आणि त्याची उत्तरे एवढ्यापुरते मर्यादित मात्र निश्चितच नाही. हे संपूर्ण प्रकरण केंद्रीय वित्त मंत्रालयाचा गुप्तवार्ता विभाग हाताळत असल्याने या प्रकरणाशी स्थानिक पोलीस आणि राज्य सरकार यांचा काडीचाही संबंध नसल्याचे तांत्रिक वातावरण सध्या निर्माण झालेले आहे. हे वातावरण पूर्णत: संपवून राज्य शासनानेही या प्रकरणाकडे राज्यावरील संकट म्हणून पाहण्याची गरज आहे. एकट्या मुंबईतील लाखांहून अनेक तरुण मेफेड्रॉन या अमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेले आहेत. या पदार्थाला मेफ, म्याव म्याव, एम कॅट, ड्रोन, बबल्स आणि किटी कॅट यासारख्या नावांनी व्यसनग्रस्त ओळखतात. कोकेनसारखे अमली पदार्थ हजारो रुपयांना ग्रॅम मिळत असतात. शेकड्यांच्या किमतीत मिळणारे ‘म्याव म्याव’ व्यसनग्रस्त तरुणांना जवळचे आणि परवडणारे वाटते. पावडरच्या स्वरूपात नाकाद्वारे अथवा द्रवरूपाने या पदार्थाचे सेवन केले जाते. तीन-चार तास या पदार्थाचा अंमल राहतो. त्यानंतर हळूहळू सेवन करणारा व्यसनाधीन बनतो. महाविद्यालयीन तरुण-तरुणीमध्ये ‘म्याव म्याव’चे आकर्षण आहे.सुरुवातीच्या काळात कीटकनाशक व प्रयोगात वापरले जाणारे रसायन हा पदार्थ ओळखला जायचा. आज मात्र अमली पदार्थाच्या क्षेत्रात या पदार्थाने जागतिक प्रश्नाचे रूप धारण केले आहे. २००९ साली इंग्लंडसारख्या देशात रस्त्यावर मिळणाऱ्या कमी किमतीतील नशेचा स्वस्त पदार्थ म्हणून तरुण मेफेड्रॉनकडे आकर्षित झाले. आज जगातील अनेक देशांमध्ये या पदार्थाचा अंमल वाढला आहे.तरुणाई उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या व्यसनाधीनतेत मेफेड्रॉनचा मोठा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर कुर्डूवाडीसारख्या छोट्या गावात ५०० किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन येत असेल तर ते ग्रामीण महाराष्ट्रापुढील खूप मोठे संकट आहे, असेच म्हणावे लागेल. कुर्डूवाडीतील एका बंद पडलेल्या रसायन कारखान्यावर केंद्रीय महसूल गुप्तवार्ता विभागाने छापा टाकून तिथले साहित्य जप्त करून दिल्लीला नेले आहे. अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या लोकांनी फक्त कुर्डूवाडी हे एकच गाव निवडले असेल, असा अंदाज बांधणे चुकीचे ठरेल. तस्करांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्या तस्करीचे पाय पसरले असू शकतात. आज तरी कुर्डूवाडीतील बंद पडलेल्या कारखान्यात तस्कर नक्की काय करीत होते, अमली पदार्थ तयार करण्याची त्याची पद्धती नक्की कशी असावी, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. एकमात्र खरे ‘म्याव म्याव’ ग्रामीण महाराष्ट्राच्या दारात उभा आहे...- राजा माने