शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

विकासाचं ताट अन् पहिला घास !

By राजा माने | Updated: August 14, 2018 00:21 IST

एक राजबिंडा राजकारणी, दिलदार मित्र आणि सर्व स्तरातील लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या विलासरावांनी ज्या-ज्या वेळी त्यांच्यासमोर विकासाचे ताट आले, त्या-त्या वेळी त्यांनी पहिला घास...

विलासराव देशमुख यांचे अकाली जाणे उभ्या महाराष्टÑाला चटका लावून गेले. राजबिंड्या व्यक्तिमत्त्वाला दिलदार मनाची जोड लाभणे, हे भाग्याचे मानले जाते. त्या अर्थाने ते किती भाग्यवान होते, याचा अनुभव त्यांचा सहवास लाभलेल्या आणि न लाभलेल्या देखील व्यक्तींना यायचा. १९७० च्या दशकात उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील विलास देशमुख बाभळगावकर हा तरुण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून धडपड करायचा. त्या धडपडीला पदाची जोड देण्याचे काम त्यावेळचे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष उल्हास पवार करतात आणि तो तरुण उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष बनतो ! त्या काळातही पुण्यातील शिक्षण व वास्तव्याने संस्कारित झालेले नव्या जमान्याची भाषा बोलू लागतो. ग्रामपंचायतीतून फक्त भाषाच नाही तर बदलत्या काळाची दिशा घेऊनच बाभळगावात काम करतो. बाभळगाव ते मुंबई आणि मुंबई ते राजधानी दिल्ली असा ऐतिहासिक प्रवास करणारा विलास देशमुख बाभळगावकर या तरुणाने संपूर्ण राज्यातील सामान्य माणसांच्या हृदयात ‘विलासराव देशमुख’ हे नाव कोरले !आज विलासरावजींच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या स्मृती जागवताना या इतिहासाची आठवण अनेकांना झाल्याशिवाय राहत नाही. उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या ऐतिहासिक कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला. केवळ जिल्हा निर्मितीनंतरच्या इमारती उभ्या करून समाधान मानणे हा त्यांचा पिंड नव्हताच! त्यामुळे विकासाचे प्रत्येक दालन खुले करताना त्यांनी लातूरच्या बाबतीत ‘जे नवे ते लातूरकरांना हवे’ हा मंत्र सदैव कृतीने जतन केला. तो करताना मिळालेल्या प्रत्येक पदाचा उपयोग त्यांनी लातूर जिल्ह्यासाठी काही तरी नवे देण्यासाठी केला. स्व. शंकरराव चव्हाण यांचे राजकारणातील मानसपुत्र म्हणून केवळ ते वावरलेच नाहीत तर स्व. शंकररावजींच्या कार्यपद्धतीचा अमल देखील त्यांनी पदोपदी केला.मराठवाड्याला वरदायिनी ठरलेल्या जगातील पहिले मातीचे धरण बांधण्याचा इतिहास स्व. शंकररावजींनी त्यांच्या नावावर नोंदला. अशा गुरूचे बोट धरून राजकारण केलेल्या विलासरावांनी तोच कित्ता गिरविला. बालाघाटच्या माळरानावर मांजरा सहकारी साखर कारखान्यासारख्या प्रकल्पाची उभारणी करून त्यांनी मराठवाड्यातील शेतकºयांच्या जीवनाला नवी दिशा दिली. त्याच दिशेने शिक्षण असो वा कला, प्रत्येक क्षेत्रात ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले.महाराष्टÑाच्या राजकारणात सर्व स्तरातील लोकसंपर्क आणि लोकप्रियता संपादन केलेल्या विलासरावांनी राज्याच्या उद्योग क्षेत्रापासून सिंचन क्षेत्रापर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात नवा दृष्टिकोन निर्माण केला. त्याच कारणाने सिंचन क्षेत्रात फलदायी ठरलेला बॅरेजेस प्रकल्प आज त्यांच्याच नावाने ओळखला जातो. राजकारणातील अनेक वादळे अंगावर घेताना त्यांना १९९५ साली विधानसभा निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागले. तरीही तो पराभवही त्यांनी राजकारणातील ‘एक अपघात’ म्हणून खिलाडूवृत्तीने स्वीकारला. लातूरकरांनीही पुन्हा विक्रमी मतांनी त्यांना विधानसभेत धाडले आणि ते मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री असो वा केंद्रीय मंत्री पद कुठलेही असेल ‘ज्या-ज्या वेळी विकासाचे ताट समोर आले, त्या-त्या वेळी त्यातील पहिला घास त्यांनी कधी लातूरसाठी, कधी मराठवाड्यासाठी तर बºयाच वेळा राज्यासाठी बाजूला काढून ठेवला...  

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र