शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

माया-ममता

By admin | Updated: March 2, 2015 09:52 IST

परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा नुसती शक्तीही नाही, असं समजणं हीदेखील परमेश्वरी माया होय. तर परमेश्वराचं आनंद हे स्वरूप असून

डॉ. कुमुद गोसावी -परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा नुसती शक्तीही नाही, असं समजणं हीदेखील परमेश्वरी माया होय. तर परमेश्वराचं आनंद हे स्वरूप असून, जाणीव हे त्याचं रूप आहे आणि शक्ती हा त्याचा गाभा आहे, हे समजणं म्हणजे तो मायारहित विचार होय.‘सुखानं जगा आणि जगू द्या!’ या धारणेला खरा धर्म म्हणतात. माणसानं निर्माण केलेल्या मूर्तिपूजेतच केवळ गुंतून न राहता विश्वातील प्रत्येक माणूस हीच साक्षात परमेश्वरानं निर्माण केलेली परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे या सत्याची जाणीव ‘मायाच’ आपल्याला होऊ देत नसेल तर तिला बाजूला सारून संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागायला हवं.जे जे भेटेल भूत । ते ते मानिजे भगवंत ।असं संतांनी केवळ सांगितलं नाही, तर प्रत्यक्ष कृतीतही आणलं. म्हणून तर संत एकनाथ महाराज यांनी पैठणच्या वाटेवरून उत्तरकाशीतून आणलेलं गंगाजल रामेश्वराला परंपरेनुसार अर्पण करण्यासाठी वाहून नेताना तहानेनं तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखी घालून त्याचे प्राण वाचविले नि सोबतच्या लोकांनी आता रामेश्वराचं काय? असं विचारताच सहज उत्तर दिलं की, ‘हे गाढव म्हणजेच माझा रामेश्वर!’ प्राण वाचल्यानं आनंदित होऊन उठलेलं गाढव पाहण्यात ज्याला परमेश्वर पाहता आला त्याच्यावर मायेचा प्रभाव पडेलच कसा? दिसो परतत्त्व डोळा । पाहो सुखाचा सोहळा ।रिघो महाबोध सुकाळा । माजी विश्व ।।असं ज्ञानदेव माउलीने म्हटलं आहे तेही मोठं लक्षणीय आहे. कारण आपल्या डोळ्यांना परतत्त्व पाहण्याचा सुखसोहळा लाभणं कोणाला नको आहे? झाडावर राहणारे दोन पक्षी दिसतात एकसारखे; मात्र एक झाडाची फळं खाणारा, तर दुसरा न खाणारा म्हणजे मोठा हुशार आणि ज्ञानी मानायचा का? आणि फळ खाणारा अज्ञानी आहे असे म्हणायचं का? इथं ‘माया’ भ्रम आणि ज्ञान- डोळसपणा म्हणजे बद्ध आणि मोक्ष असा संबंध जोडला जातो. त्यातील सूत्र ध्यानी घेता मायेचं डोळ्यांवरील पटल दूर सारल्याशिवाय माणसाला खरं आत्मरूपही दिसू शकत नाही. निजवृत्ती काढी सर्व ‘माया’ तोडी । इंद्रिया सवडी लपू नको । ।असं संत ज्ञानदेव माउलीने अत्यंत आत्मीय भावानं आपल्याला सांगून ठेवलं आहे. तेव्हा आपणच आपल्या वृत्ती माया-मोहपाशात अडकू न देता इंद्रियजन्य विकारांवर जय मिळवून ताब्यात ठेवल्यास आपलाच अवघा जीवन व्यवहार चैतन्यानंदाची स्फुल्लिंग चेतवतच पुढं पुढं होत राहणार, आयुष्याचं सोनं होणार! हा विश्वास ज्ञानदेव माउलीने दिला आहे.