शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

मुख्यमंत्री होता होता राहीलेले वित्तमंत्री !

By अतुल कुलकर्णी | Updated: July 30, 2017 14:30 IST

आश्चर्य वाटेल खरे, पण सुधीर मुनगंटीवार हे नाव राज्याच्या मुख्यमंत्री पदावर जाता जाता राहीलेले नाव आहे. कसे ते या लेखात सांगेन...

आश्चर्य वाटेल खरे, पण सुधीर मुनगंटीवार हे नाव राज्याच्या मुख्यमंत्री पदावर जाता जाता राहीलेले नाव आहे. कसे ते या लेखात सांगेन...आज सुधार मुनगंटीवार यांचा वाढदिवस. त्यांना त्यासाठी शुभेच्छा. माझ्या पत्रकारितेला ३० वर्षे झाली. त्यातली गेली १५ वर्षे मी अनेक मंत्र्यांचा कारभार खूप जवळून पाहण्याची संधी मला लोकमतमुळे मिळाली. मंत्र्यांच्या कामाची पध्दती, निर्णय घेण्याची वेळ व काळ यांचे मांडले जाणारे गणितही पाहता आले. मात्र या सगळ्यांमध्ये आपण घेतलेले निर्णय अंमलात आणणारे, त्यासाठी स्वत: अत्यंत चिवटपणे पाठपुरावा करणारे आणि निर्णय झाल्यानंतर ज्याच्याशी संबंधीत तो निर्णय आहे त्याला स्वत: कळवणारे मंत्री एकमेव आहेत, ते म्हणजे सुधीर मुनंगटीवार..!हे गृहस्थ त्यांच्या मोबाईलवर आलेल्या एसएमएसचे देखील प्रिंटआऊट काढतात आणि त्यात मांडलेल्या मुद्यांचे काय झाले याचाही फॉलोअप घेतात. त्यासाठी त्यांनी फॉलोअप शिट तयार केलेले आहे आणि ते स्वत:च त्यावर माहिती लिहून काढतात. काही घटनांचा तर मी साक्षीदार आहे. औरंगाबादच्या एका कार्यक्रमात त्यांनी ५ कोटी देण्याची घोषणा केली होती. काही दिवस झाले, औरंगाबादचे राम भोगले यांनी त्या पैशांचे काय झाले अशी विचारणा केली. तेव्हा वित्तमंत्र्यांनी त्यांच्या खात्याचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव यांना बोलावून त्या कामाचे काय झाले असे विचारले. श्रीवास्तव म्हणाले, माहिती घेतो आणि सांगतो. त्यावर तात्काळ सुधीरभाऊंनी त्यांचे फॉलोअप वही काढली. मी अमूक तारखेला, या वेळेला तुम्हाला हे काम सांगितले होते, ही घोषणा मी औरंगाबादेत या तारखेला, या वेळेला केली होती आणि तुम्ही हे काम या तारखेपर्यंत होईल असे सांगितले होते. त्याला आता दोन दिवस उलटून गेले आहेत... श्रीवास्तव यांनी दुसºया दिवशी औरंगाबादच्या लोकांना चेक देऊन टाकला..!पाठांतर हा यांचा सगळ्यात मोठा गुण. कोणतीही आकडेवारी विचारा, तोंडपाठ. फेकाफेकी नाही. रुपये, पैशांमध्ये सगळा हिशोब क्षणात सांगण्याची सवय. झाडे किती, पाणी किती, आॅक्सीजन किती, बजेट किती, कर्ज किती, व्याज किती आणि किती झाडे लावली की किती जगतील आणि कोणत्या वर्षी त्यातून किती आॅक्सीजन मिळेल हे सगळं खाडखाड सांगण्याची त्यांची सवय. सोबतच्या आयपॅडवर अख्खा वित्त विभाग आणि वन विभाग. स्वत: अभ्यास केल्याशिवाय, माहिती घेतल्याशिवाय बोलायचे नाही हा त्यांचा गूण आज त्यांना अन्य सगळ्या मंत्र्यापेक्षा अत्यंत वेगळी प्रतिमा देऊन जात आहे.सचिन तेंडूलकरने ग्रीन आर्मीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हावे यासाठी ते सचिनच्या घरी गेले, तर अमिताभने वृक्ष लागवड मोहीमेत सहभागी व्हावे म्हणून त्यांनी अमिताभलाही गळ घातली. राज्याच्या कामासाठी जर कोणाची मदत होते आहे हे कळाले की ते कोणाचीही वाट न पहाता त्या व्यक्तीच्या घरी पोहोचतात. वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा असे सांगण्यासाठी स्वत:चे पक्षीय, राजकीय अभिनिवेश बाजूला सारुन मुनगंटीवार सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे जाऊन आले. सीएसआर फंडातून विविध कंपन्यांनी मदत करावी म्हणून त्यांनी राज्यपालांकडे राज्यातल्या तमाम बड्या उद्योगपतींना जेवायला बोलावले. त्यात टाटा, अंबानी, बिर्ला, गोदरेज पासून सगळे हजर राहीले. राज्यात तुम्ही कसे योगदान देऊ शकता, आम्हाला थेट पैसे देऊ नका, पण ही ही कामे आहेत जी तुम्ही करु शकता असे सांगत त्यांनी पैसे नको पण कामे करुन द्या अशी गळ घातली. पैसे न मागणारे हे कदाचित पहिले वित्तमंत्री ठरले असतील...!गेल्या ५० वर्षात जे कुणाला जमले नाही ते त्यांनी करुन दाखवले. मंत्र्यांच्या कार्यालयात खेटे मारल्याशिवाय काम होत नाही हा समज दूर करुन त्यांनी स्वत:च्या कार्यालयाला आयएसओ प्रमाणपत्र मिळवून दिले. मंत्री कार्यालयाला असे प्रमाणपत्र मिळवणारे ते देशातले पहिले मंत्री ठरले आहेत. आता मुनगंटीवार यांनी चंद्रपूर, गडचिरोलीच्या बाहेर पडून महाराष्टÑभर फिरले पाहिजे. भाजपात हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच मंत्री असे आहेत की ज्यांनी आपल्या कामातून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.आता मुद्दा मुख्यमंत्री होता होता राहीलेले वित्तमंत्री ! याचीही एक राजकीय कथा आहे. ती अशी - विधानसभेचे निकाल लागले आणि राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होणार अशी चिन्हे दिसू लागली आणि गडकरी वाड्यावर सुधीर मुनंगटीवार यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातले आमदार एकत्र आले आणि त्यांनी नितीन गडकरींच्या मुख्यमंत्रीपदासाठी घोषणाबाजी केली. तेथेच गणित बदलले. मोदींची सत्ता येऊन काही महिनेच झाले होते. त्यांना असे बंड पक्षात नको होते. परिणामी गडकरींची इच्छा असूनही ते दिल्लीत राहीले व मुनगंटीवार वित्त नियोजन आणि वन मंत्री झाले. मात्र स्वत:च्या कामातून मुनगंटीवार यांनी स्वत:ची वेगळी प्रतिमा उभी केली. उद्या देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीचे निमंत्रण आलेच तर राज्यात मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणू पहिले नाव मुनगंटीवार यांचे असेल. व त्यांना मिळता मिळता राहीली संधी त्यांच्याकडे सहजपणे येईल... वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा..!(वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत, मुंबई)