शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

मातोश्रीवर पाल चुकचुकली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:15 IST

‘डॅड, डू यू नो कॉमन हाऊस गेको?’ आदीच्या या प्रश्नावर पाल झटकावी तसं दादूनं हातातलं वर्तमानपत्र झटकलं... गळ्यातील भगव्या गमच्यानं चष्म्याची काच साफ केली, केसांवरून कंगवा फिरवला आणि दरबारात सभोवार नजर टाकली.

- नंदकिशोर पाटील

‘डॅड, डू यू नो कॉमन हाऊस गेको?’ आदीच्या या प्रश्नावर पाल झटकावी तसं दादूनं हातातलं वर्तमानपत्र झटकलं...गळ्यातील भगव्या गमच्यानं चष्म्याची काच साफ केली, केसांवरून कंगवा फिरवला आणि दरबारात सभोवार नजर टाकली. हा इशारा मिळताच उपस्थित मावळ्यांनी मुजरा ठोकून तिथून काढता पाय घेतला. दरबारात आता दोघेच उरले. एक पाय खुर्चीवर आणि दुसरा सोफ्यावर ठेवून चॅटिंगमध्ये दंगलेल्या आदिच्या हातून त्यांनी आयफोन हिसकावून घेतला अन् स्वीचआॅफ करून टेबलाखाली ठेवून दिला.दादू: ‘हं, आता बोल. काय म्हणत होतास?आदी: ‘मला वाटतं डॅड, आपण या बंगल्याचं पेस्ट कंट्रोल करून घ्यायला हवं?’आदिच्या या प्रश्नानं खवळलेले दादू एकदम ओरडले, ‘काय पेस्टकंट्रोल? अरे इथे वाघ राहतात वाघ...पेस्टकंट्रोल झुरळांसाठी असतं...!!’दादूच्या या उत्तरावर आदीला लहानपणी पाहिलेलं ‘श्रीमंत दामोधर पंत’ नावाचं नाटक आठवलं अन् एकदम हसू आलं. या नाटकातील दामोधर पंतांवर कपर्दिक होण्याची वेळ आलेली असताना त्यांना आपण अजूनही संस्थानिकच आहोत असं वाटत असतं. त्यासाठी ते संस्थानिकाचे कपडे घालून घरात वावरत असतात आणि येणाऱ्या-जाणाºयांवर सतत गुरगुरत असतात.दादू: ‘कसला विचार करतोयस? वाघाच्या बछड्यानं शिकारीची बात करण्याऐवजी तू झुरळं मारण्याची गोष्ट करतोस? आम्ही आजवर कित्येक झुरळं आमच्या पापणीनं चिरडली आहेत...त्यासाठी पेस्ट कंट्रोल कशाला हवंय?’पिताश्रींच्या या उत्तरानं एकदम भानावर आलेल्या आदिनं पुन्हा तोच प्रश्न विचारला.आदी: ‘‘डॅड, डू यू नो कॉमन हाऊस गेको?’दादू: ‘आदी तुला कितीदा बजावलं. किमान घरी असताना तरी तू मराठीत बोलत जा म्हणून. तू जेवायची आॅर्डरसुद्धा केएफसीमध्ये बसल्यासारखी देतोस. तुझ्या अशा वेस्टर्न लाईफस्टाईलमुळे आपल्या हिंदू संस्कृतीचं आणि माय मराठीचं काय होईल याची कल्पना आहे का तुला?’आदी: ‘पण डॅड, मी विचारलेल्या प्रश्नाचं हे उत्तर नव्हे!’आदीच्या प्रश्नातील ‘कॉमन हाऊस गेको’ ही काय भानगड आहे, हेच मुळी दादूला माहिती नव्हतं. त्यामुळं त्यांनी आपल्या मोबाईलवर हळूच गुगल सर्च मारला. गुगलवरचं उत्तर वाचून ते एकदम ओरडले, ‘पाल...पाल...पाल कुठंय पाल?’आदी: कुल डॅड...कुल...दादू: कुल बिल सोड. अरे घरात पाली होणं हे काही चांगलं लक्षण नाही. आजवर या बंगल्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाची शामत झाली नाही. आता पाली हिंडताहेत? कसलं अपशकुनी लक्षण हे!’आदी: चिल यार डॅड... शकून-अपशकून काही नसतं. परवा मला मिलिंद अंकल सांगत होते की, कुठं तरी पाल चुकचुकत आहे. म्हणून मी अर्थ शोधायला गुगलवर सर्च दिला तर उत्तर आलं, पेस्टकंट्रोल!’दादू: ‘हा मिलिंद पण ना घरबसल्या लेकरांना घाबरवत असतो. पाल चुकचुकली तर कधीकधी धनलाभही होतो बाळा!’आदी: मग ‘पालघर’मध्ये आपले धनही बुडाले अन ्मानही का गेला डॅड?दादू: तिथे तो सरडा आडवा आला ना!आदी: म्हणूनच तर म्हणतो डॅड, घरात एकदा पेस्टकंट्रोल करूनच घ्या!

टॅग्स :Mumbaiमुंबई