शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

उपेक्षेच्या लोहमार्गावर मराठवाड्याची रेल्वे

By admin | Updated: February 4, 2015 01:32 IST

सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्ष होताच मनमाड-धुळे-इंदूर हा मार्ग महिनाभरात मार्गी लागला. सत्तेचाच हा परिणाम. आता तर केंद्रीय मंत्रिमंडळात मराठवाड्याला स्थानच नाही.

सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्ष होताच मनमाड-धुळे-इंदूर हा मार्ग महिनाभरात मार्गी लागला. सत्तेचाच हा परिणाम. आता तर केंद्रीय मंत्रिमंडळात मराठवाड्याला स्थानच नाही. उपेक्षा आणि उदासीनतेच्या गर्तेत मराठवाडा सापडला आहे. मग ते पाणी असोे की रेल्वे. कोणताही विषय घेतला तरी त्याला या दोन्ही गोष्टींनी घेरले आहे. जायकवाडीच्या पाण्याची हीच गोष्ट. येथे अहमदनगरची दंडेली दिसते; पण हक्काच्या पाण्यासाठी आम्ही किती आसू गाळतो याचाही हिशेब करायलाच पाहिजे. रेल्वेचा प्रश्नही तसा जुनाच. यासाठी आंदोलने झाली, संघर्ष केला. काही तुकडे पदरात पडले; पण पुढे मात्र उपेक्षाच सहन करीत आहोत. या उपेक्षेने पेटून उठत नाही, हेच दु:ख आहे. रेल्वे अर्थसंकल्प तोंडावर आला असताना या उपेक्षेला वाट मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही.रेल्वे मंत्रालयाने मराठवाड्याची उपेक्षा कशी केली याची यादीच द्यावी लागेल. गेल्या ३५ वर्षांत येथे केवळ मनमाड ते काचीगुडा या मार्गाचे रुंदीकरण झाले; परंतु त्यासाठी संघर्ष करावा लागला. गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा यांच्या संघर्षाचे हे फलित; पण त्यानंतर लातूर ते लातूर रोड हा केवळ ३५ कि.मी. नवीन रेल्वे मार्ग टाकण्यात आला आणि तोसुद्धा विलासराव देशमुखांमुळे. रेल्वे मंत्रालयाने मराठवाड्याच्या केलेल्या उपेक्षेचा एक नमुना म्हणजे सोलापूर-जळगाव हा प्रस्तावित मार्ग. प्रवासी, पर्यटक असा हिशेब धरून हा मार्ग पैठण, औरंगाबाद, वेरूळ असा जाणार होता. तसे सर्वेक्षणही झाले होते; पण रेल्वे मंत्रालयाने त्यात जुलै २०१२ मध्ये बदल केला आहे. पैठण-औरंगाबाद-वेरूळ वगळून तो जालना, भोकरदन, सिल्लोडमार्गे नेला. तीन देवस्थाने, औरंगाबाद, वेरूळसारखी पर्यटन स्थळे जोडणे ही यामागची भूमिका होती; पण मार्ग बदलताना रेल्वे मंत्रालयाने खासदारांना विश्वासात घेतले नाही, की जनतेची मते अजमावली नाहीत. रस्ता नागमोडी आहे, ५० कि. मी. अंतर वाढते अशी कारणे पुढे करण्यात आली; पण यावर लोकप्रतिनिधी आणि जनता यांची प्रतिक्रिया उमटली नाही.अहमदनगर-बीड-परळी या २६२ कि. मी.च्या रेल्वे मार्गाचा पहिला भूमिपूजन समारंभ १९९६ साली सुरेश कलमाडी यांनी केला होता. १९९८ साली पुन्हा रामविलास पासवान यांनीही भूमिपूजन केले. केशरकाकू क्षीरसागर यांनी याचा पाठपुरावा केला होता. संसदेमध्ये हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. आज हा मार्ग केवळ अहमदनगर-नारायणडोह असा १५ कि.मी.च झालेला आहे. १५ वर्षांतील ही प्रगती. याचे भूसंपादन पूर्ण झाले. आष्टीपर्यंत मातीकामही झाले; पण पुढे मार्ग सरकला नाही. आता तर ते मातीकामही वाया गेले.जालना-खामगाव या मार्गाची मागणी ब्रिटिशांच्या काळापासून. याचे सर्वेक्षण दोन वेळा झाले; पण अखेर हा प्रस्तावच फेटाळण्यात आला. त्याचे कारणही दिले नाही.रोटेगाव-पुणतांबा हे ३५ कि़मी. अंतर जोडले तर शिर्डीशी थेट जोडता येईल. या मार्गाचा दुसरा फायदा म्हणजे औरंगाबाद हे पर्यटन केंद्र पुणे, कोल्हापूर, थेट गोव्याशी जोडले जाणार; परंतु त्याचाही विचार होत नाही. पोटूळ-चाळीसगाव या मार्गाची मागणी १९९५ पासून. त्यावेळचा खर्च होता २०० कोटी आणि आज हा आकडा पोहोचला ३ हजार कोटीवर; पण याचाही विचार होत नाही.मराठवाड्याचा सर्व संपर्क मुंबईशी; पण दक्षिण मध्य रेल्वेचे कार्यालय सिकंदराबादला. ते सर्वार्थाने गैरसोयीचे. मराठवाडा मध्य रेल्वेला जोडण्यात यावा ही मागणी याच हेतूने करण्यात आली होती; पण तीसुद्धा रेल्वे मंत्रालयाने फेटाळली. सिकंदराबाद नको असेल तर नागपूरला जोडतो असा प्रस्ताव दिला. नागपूरपेक्षा सिकंदराबाद परवडले अशी म्हणायची वेळ आली. सत्तेचा परिणाम कसा असतो ते मनमाड-धुळे-इंदूर या नव्या मार्गाकडे पाहिले तर कळते. सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्ष होताच महिनाभरात तो मार्गी लागला. आता तर केंद्रीय मंत्रिमंडळात मराठवाड्याला स्थानही उरले नाही. मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी कोकण रेल्वेप्रमाणे प्राधिकरण नेमून रोखे काढण्याचाही प्रस्ताव कोणी विचारात घेत नाही. अशी ही उपेक्षा आहे आणि आपली उदासीनता.- सुधीर महाजन