शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:13 IST

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! ही ओळ केवळ कविता म्हणून नाही तर आपले जीवन-सत्त्व आहे. यातील भाग्य हा शब्द केवळ मराठी बोलणा-या, असणा-या माणसासाठी आहे. ते मान्य करायलाच हवे.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! ही ओळ केवळ कविता म्हणून नाही तर आपले जीवन-सत्त्व आहे. यातील भाग्य हा शब्द केवळ मराठी बोलणा-या, असणा-या माणसासाठी आहे. ते मान्य करायलाच हवे. उद्या मराठी भाषा दिन. मराठी भाषेचा जागर करण्याचा दिवस. कुणीही अभिमान बाळगावा असा. मराठीचे प्रेम म्हणजे इंग्रजीचा दु:स्वास नाही. तिने एक बºयाच देशांशी संपर्क करण्याची भाषा म्हणूनच राहावे. जगाचं बोलणं समजण्यासाठी ती खिडकी आहे. परंतु खिडकी म्हणजे दार नाही तो दरवाजा कायम मराठीसाठीच राहणार आहे.मराठीच्या भवितव्याची काळजी करताना मराठी भाषा आणि शाळा हा कायम चिंतेचा विषय असतो. पण अलीकडे बहुसंख्य कार्यालये, त्यांची परिभाषा मराठीच होत असताना त्या गोष्टीकडे पहावे. म्हणजे महदाईसा महदंतचा धावा, धवळे, लीळाचरित्र मुकुंदराज, ज्ञानेश्वर ते फुले, शाहू, आंबेडकर या सर्वांनी मराठीला अतिशय कणखरपणे जपले, जोपासले, वाढविले. तिचे अभिजातपण अबाधित ठेवले. यात शासनापासून सगळे प्रयत्नशील आहेत. असायलाच हवेत. वेगवेगळ्या समित्या कायम काम करीत असतात. त्यांचे अहवाल आपण वाचतोही. हा मराठी प्रवास इतर भाषांना सांभाळून सावरून पुढे होतो. म्हणून तिला ‘अभिजात’ दर्जा प्राप्त होईपर्यंत लढत राहायला हवेच. मराठी भाषा भवन दिमाखाने स्थापन व्हायला हवे. मुंबईत जागा नसेल तर सगळी यंत्रणा इतरत्र हलविता येईल. कदाचित ते खर्चिक, वेळघेऊही काम असेल. पण मराठीचे प्रेम अबाधित राहायलाच हवे. मराठी टिकेल न टिकेल हे गळा काढणे बंदच व्हायला हवे. हे स्वप्न नाही. भविष्यकाळ भीषण आहे वगैरे भाकड गोष्टी करण्यापेक्षा ‘भिलार’सारखी पुस्तकपेठ उभी राहाते आहे. आय.ए.एस.सारखी उच्च दर्जाची परीक्षा मराठीतून उत्तीर्ण होता येते. आपले संवादसाधन मराठीच असू शकते. या सगळ्या प्रगतीच्या खुणाच आहेत. कुसुमाग्रजांचा आत्मविश्वास वांझोटा नव्हता, नाही. फक्त डोळस प्रयत्न हवेत. अभिजात दर्जा मिळेल. मराठीचा अभ्यास फोफावेल ही आशा ठेवायलाच हवी तरच होकारार्थी मराठी महाराष्टÑ मराठी भारत आणि मराठी जग आपण पाहू शकू. परदेशातले लाखो मराठी बांधव हाच विश्वास जागवून आहेत. हा सकारात्मक दृष्टिकोनच आपल्याला म्हणायला आनंद देईल, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा.-किशोर पाठक

टॅग्स :marathiमराठी