शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
4
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
5
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
6
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
7
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
8
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
9
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
10
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
11
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
12
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
13
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
14
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
15
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
16
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
17
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
18
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
19
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
20
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...

मनाचिये गुंथी - जे खळांची !

By admin | Updated: March 27, 2017 00:20 IST

कृष्णाने गीता सांगितली. ती आपल्यातल्या अर्जुनाला. आपण कायम किंकर्तव्यमूढ असतो तेव्हा ती वाचावी गीता

कृष्णाने गीता सांगितली. ती आपल्यातल्या अर्जुनाला. आपण कायम किंकर्तव्यमूढ असतो तेव्हा ती वाचावी गीता. सध्याचा कालखंड हा गीता अभ्यासावी असाच आहे. गीतेचा भावानुवाद ज्ञानेश्वरांनी केला. तो करताना ज्ञानदेवांनी गीता फुलवली. पण ज्ञानेश्वर आणि श्रीकृष्ण यात फरक म्हटलाच तर कृतीचा आहे. कृष्ण म्हणतो ‘ततो युद्धाय युज्यस्व’! युद्ध कर ‘हतो वा प्राप्तसी स्वर्गं जित्वा वा मोक्ष्यसे महीम्’। म्हणजे मार किंवा मर । त्याला माणसाच्या अस्तित्वावर शंका आहे. पण ज्ञानेश्वर तसे करीत नाहीत. त्यांचे अमर महाकाव्य ‘पसायदान’ यात ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मीरति वाढो ।। आणि दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्य पाहो ।। म्हणजे ज्ञानदेव जिंकण्यासाठी युद्ध कर म्हणत नाहीत. म्हणजे दृष्ट झाला तरी त्याला जवळ करून त्याची दृष्टता दूर कर, त्याची सत्कार्यात गती वाढव, तिथे मैत्र जिवांचे महत्त्वाचे. म्हणून तर दुरितांमधला अंधकार दूर व्हावा. विश्वाने स्वधर्माचा सूर्य पहावा हा स्वधर्म म्हणजे हिंदू, बौद्ध, शीख, इस्लाम नाही. हा स्वत:चा धर्म जो सूर्य पाहतो. म्हणजे माणसाला मारून तू राजा झालास तर ते राज्य तुला लाभणार नाही. त्यापेक्षा माणसातील माणूसपण जागं करणं महत्त्वाचं आहे ! सर्व संतांचं आयुष्य हे दुरित नष्ट करण्याचं आहे. ज्ञानदेवांनी कुणाही दृष्टाला मारून टाका म्हटलं नाही. माणसातलं वाईटपण दूर करा. माणूस वाईट नसतोच. त्याची एखादी कृती त्याला क्रूर, गुन्हेगार बनवते. तो क्षण टाळायला हवा. हे टाळण्याचं अनुसंधान संत असतात. म्हणून संतांची संगती हवी ! आपण माणसाला बदलू शकत नाही, त्याला आहे तसा सर्व गुणदोषांसकट सांभाळणे, स्वीकारणे, बदलवणे हेच आपल्या हातात. मला याबाबत बिभीषण महत्त्वाचा वाटतो. महाबलाढ्य रावणाशी संयमाने, विचाराने बोलणारा बिभीषण खूप वेगळा वाटतो. समाजात असे खूप बिभीषण असतात. त्यांना रावणांना बदलायचं असतं. पण ते बदलत नाहीत. ते आपलाच शेवट करून घेतात. तो शेवटही साधा नसतो. ती सुरुवातही साधी नसते. ही व्यंकटी सांडणं सोपं नाही. भल्याभल्यांना ते जमत नाही. जमलं नाही म्हणून तर आपल्याकडे रामायण, महाभारत ही केवळ आर्ष महाकाव्य नाहीत तर तो एक वाक्प्रचार आहे. ‘तुला हे महाभारत माहीत नाही’, हे म्हणताना खूप काही घडलेलं असतं. म्हणजे महाभारत वेगळेच, पण ते आयुष्याचे होते. आपण कसे असतो आणि कसे असावे यातील अंतर म्हणजे जगणे असते. हा मधला मजकूर वाचता यायला हवा. आपण म्हणतो खरे की मी असा, तसा पण तुकाराम म्हणतात तसा अनुभव प्रमाण असतो. बघा ना, ज्ञानेश्वरांनी तारुण्याच्या उंबरठ्यावरच जगाचा निरोप घेतला, तुकाराम संसार करीत जगला म्हणजे संसार केला पेक्षा झाला म्हणावा, पण दोघांनी जगाचे तत्त्वज्ञान मांडले. हे तत्त्वज्ञानच पसायदानात सार रूपाने आहे. या ओळीच्या आशेवरच सगळे सुजन माणसं वाईटाचं वाईटपण नष्ट होईलच असं समजून जगत असतात. आपणही या ओवीला सांभाळू या !किशोर पाठक