शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:16 IST

अंधारात चिमण्या फडफडतात की कावळे कोकलतात कळत नाही. अंदाज घ्यायचा पाखरांचा. त्यांच्या आवाजाचा आणि मग मार्गक्रमण करायचं.

किशोर पाठकअंधारात चिमण्या फडफडतात की कावळे कोकलतात कळत नाही. अंदाज घ्यायचा पाखरांचा. त्यांच्या आवाजाचा आणि मग मार्गक्रमण करायचं. किंबहुना आपण कोण याचाही अशावेळी अंदाज घ्यावा लागतो. आपण शोधत असतो आपल्यालाच कळत नाही आपण आपण आहोत की अजून कोणी? असं निरर्थक होत जाणं म्हणजे स्वत:ला दिशांच्या स्वाधीन करणं. मग वारा वाहील तसा आपला प्रवास आणि आपण या सर्वात अनोळखी होत जातो स्वत: मग शोधूही लागतो आपल्यालाच. हा शोध विलक्षण असतो. आपण हरवलोत की नाही माहीत नाही. पण आपण आपल्याला सापडत नाही. अखंड शोध चालू असतो. वाटतं की हेच आहोत आपण, पण आपण ते नसतो आणि आपण जे असतो त्यावर विश्वास बसत नाही. आपण तेच आहोत असं जरी कुणी म्हटलं तरी ते खरं वाटत नाही. पुन्हा खरं काय त्याचाही अदमास लागत नाही. ज्याला आपण खरं मानतो त्याला पूर्ण असत्य कुणीतरी म्हणतं. मग खरं काय? हा खऱ्याचा प्रवास खरं तर खडतरच. कारण गवसलेले सत्य स्वीकारायला मन तयार होत नाही आणि असलेल्याचा आपला सातत्याने नकार म्हणूनच आपण ते नाकारतो आणि जे पूर्ण नाकारतो तेच सत्य म्हणून समोर दत्त म्हणून उभं राहतं. आता असा संभ्रम पोकळ अवस्था मनाची होतेच तेव्हा आपण कुठल्या पर्वातून जात असतो? म्हणजे प्रत्येक वयात असे संभ्रम आपल्याला भेडसावतात. लहानपणी आपल्याला गरम तव्याला, ज्योतीला हात लावावासा वाटतो. आई बाबा नाही म्हणतात. वर्गात आपली गृहितके सर नामंजूर करतात. त्यांच्या पद्धतीने विचार करावा लागतो. तरुणपणी एखादीबद्दल आकर्षण वाटते ती आपली पत्नी होऊ शकत नाही. एक मित्र म्हणाला, अति सुंदर स्त्री मला पत्नी म्हणून नको. का तर मला न्यूनगंड येईल. पण असा न्यूनगंड स्त्रियांना येत नाही? एखाद्या अतिशय नाजूक तरुणीला जाडाभरडा, काळा कुळकुळीत धिप्पाड नवरा मिळतो तेव्हा तिला काय वाटत असेल म्हणजे आपण पूर्ण मनाचं, मनासारखं वागू शकत नाही म्हणजे आपल्यावर कुणी बळजबरी केलीच असते असे नाही पण नाही आपण काही करू शकत. चांगला विचार डोक्यात घुसला की पक्का जाऊन बसतो. त्याचा राग येत नाही. आपण त्याचा विचार करतो. संभ्रमाची अवस्था दूर जाऊ लागते. खरंतर संभ्रम काही क्षण का होईना दूर गेलेले असतात आणि नवे संभ्रम निर्माण होण्यापूर्वीचा स्वच्छ प्रकाश असतो तो. ज्यात नक्की चांगलंच वाटतं. कारण संभ्रम नसतात, नवे नसतात आणि जुने संपलेले असतात.