शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

माणसाला कधी मृत्यूच येऊ नये, म्हणून..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 06:45 IST

दीर्घायुष्य किंवा अमरत्व कसं मिळवता येईल, यासाठीचे माणसाचे प्रयत्न अनेक शतकांपासून चालत आले आहेत. त्यात कधी यश येऊ शकेल का?

अच्युत गोडबोलेख्यातनाम लेखकसहलेखिका- आसावरी निफाडकर

दीर्घायुष्य किंवा अमरत्व कसं मिळवता येईल, यासाठीचे माणसाचे प्रयत्न अनेक शतकांपासून चालत आले आहेत. त्यात कधी यश येऊ शकेल का?

दीर्घायुषी होण्याचं किंवा अमरत्व मिळवण्याचं माणसाचं स्वप्न अनेक शतकांपासून कथा- कादंबऱ्यांमध्ये अगदी पौराणिक ग्रंथांमध्ये दिसतं.अश्वत्थामा बलिव्र्यासो हनूमांश्च विभीषण:।कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥ सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित॥ 

अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि मार्केंडेय या आठ चिरंजीवांचं नित्य स्मरण केलं तर शंभर वर्षं व्याधीमुक्त आयुष्य मिळेल असं सांगणारं हे सुभाषित. आपल्या पुराणात ‘अमृतमंथना’ची कथाही प्रसिद्ध आहेच. देव आणि दानव यांनी समुद्रमंथन कसं आणि का केलं; त्यातून लक्ष्मी, कौस्तुभ मणी, पारिजातक वृक्ष, सुरा, धन्वंतरी, चंद्र, कामधेनु, ऐरावत, रंभा/अप्सरा, सातमुखी शुभ घोडा, हलाहल (विष), धनुष्य, पांचजन्य शंख या १३ रत्नांबरोबरच ‘अमृत’ हे १४वं रत्न कसं बाहेर पडलं; त्यासाठी देव आणि दानव यांच्यात युद्ध कसं झालं वगैरे.

ग्रीक पुराणातही अमरत्व/दीर्घायुष्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत ! एका कथेप्रमाणे ‘इऑस’ नावाची अतिशय देखणी ग्रीक-रोमन देवता टिथोनस नावाच्या राजकुमाराच्या प्रेमात पडली, पण टिथोनस हा एक माणूस असल्यानं त्याला कधीतरी मरण येणार हे इऑसच्या लक्षात आल्यावर तिनं रोमन देवांचा राजा ‘झियस’कडे आपल्या प्रियकराला अमरत्वाचं वरदान द्यावं, अशी मागणी केली; पण टिथोनससाठी ‘अमरत्व’ मागताना इऑस त्याचं ‘तारुण्य’ मागायची विसरली. टिथोनसला अमरत्व मिळालं खरं; पण त्याचं तारुण्य उतरत चालल्यामुळे त्याला अनेक व्याधी जडल्या आणि त्याचं शरीरही खंगायला लागलं. प्रचंड वेदनेनं त्याचा जीव कासावीस झाला तरी त्याला आता मरण येणं शक्य नव्हतं !... अशीही एक कथा आहे.

‘अमरत्व/दीर्घायुष्य’ मिळवण्यासाठीचं माणसाचं स्वप्न अनेक शतकांपासून आहे. ख्रिस्तपूर्व २७ व्या शतकात मेसापोटेमीयामधल्या गिल्गिमेश नावाच्या राजाची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. प्रचंड साहसी असलेला हा राजा अमरत्व मिळवण्यासाठी उपचारांची शोधाशोध सुरू करतो. एका जोडप्याला देवांकडून ‘अमरत्व’ मिळालं आहे असं  कळताच तो त्यांचा शोध घेतो. ते अमृत घेऊन जात असताना वाटेवर एका झाडाखाली त्याला कशी झोप लागते आणि एक साप ते अमृत पिऊन कसा निघून जातो याचं या कथेत वर्णन आहे.

माणसाचं आयुर्मान वाढवण्याचं वेड चीनमध्येही होतं. तिथे ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात लाओत्सेचे अनुयायी होते. त्यांना ‘टाओइस्टि्स’ असं म्हटलं जायचं. अतिशय साधं राहणीमान असलेली ही मंडळी ‘यिन’ आणि ‘यँग’ अशा दोन तत्त्वांचं पालन करायची. पुरुषांसाठी ‘यँग’ आणि बायकांसाठी ‘यिन’ अशी तत्त्वं वापरून श्वासोच्छ्वासाची एक आयुष्यवर्धन करणारी पद्धती त्यांनी शोधली  होती. आपल्या योगविद्येसारखंच हे काहीसं होतं. 

हजारो वर्षांपूर्वी ‘फाउंटन ऑफ यूथ’ म्हणजेच ‘तारुण्याचं कारंजं’ या नावाच्या एका नैसर्गिक पाण्याच्या झऱ्याचं पाणी प्यायल्यावर किंवा त्यात स्नान केल्यावर माणसाचं तारुण्य अबाधित राहातं असा या झऱ्याचा उल्लेख अनेक साहित्यांत होता; पण तो झरा नेमका कुठे आहे याची माहिती मात्र कुणालाच नव्हती. १३ व्या-१६ व्या शतकांच्या दरम्यान अनेक राजे-महाराजे यांनी फक्त तो झरा शोधण्यासाठी मोहिमा चालवल्या होत्या. ‘क्वीन’ नावाच्या राजानं तर ‘तो झरा सापडल्याशिवाय परत येऊ नका’ अशी दर्यावर्दींना तंबी दिली होती. गंमत म्हणजे तो झरा शोधण्याच्या नादात जपानचा शोध लागला! इजिप्तची सौंदर्यवती राणी क्लिओपात्रा तर आपलं सौंदर्य आणि तारुण्य टिकवण्यासाठी दररोज १० गाढविणींच्या दुधानं, तर १६ व्या शतकातली एलिझाबेथ बाथरॉय नावाची राणी तरुण रहाण्यासाठी तरुण मुलींना मारून त्यांच्या रक्तानं अंघोळ करायची असं म्हटलं जातं !

इ. स. १३०० च्या सुमारास अमृत आणि सोनं तयार करण्याच्या अल्केमिस्टांच्या प्रयत्नांचं प्रमाण वाढलेलं होतं. अमृत किंवा परीस तयार करता आलं नसलं तरी या भानगडीत रसायनशास्त्रामध्ये प्रगती मात्र झाली होती. लवकरच लोखंड, तांबं, सोनं, मूलद्रव्यं या धातूंचा शोध लागायला लागला; पण तांबं आणि कथिल यांची सरमिसळ करून जेव्हा ब्राँझचा शोध लागला, तेव्हा मात्र असे काहीसे धातू मिसळून ‘सोनं’ तयार करता येईल अशी अनेकांना आशा वाटायला लागली. कुठल्याही धातूपासून सोनं बनवणं आणि माणसाला अजरामर होता येईल असं ‘अमृत’ बनवणं यासाठी हे ‘अल्केमिस्ट’ वाट्टेल ते करायचे.

‘अल्केमिस्ट्स’ हा काळ मोठा गंमतशीरच होता. कोलंबस अमेरिकेला पोहोचला तोपर्यंत सोनं बनवण्याचा वायफळ खटाटोप करण्यापेक्षा दीर्घायुष्य किंवा अमरत्व कसं मिळवता येईल याकडे अल्केमिस्ट्सनी आपलं लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. त्यासाठी मग वेगवेगळी प्रायोगिक औषधं बनवणं सुरू झालं. ‘मीठ, गंधक आणि पारा यांचं शरीरात संतुलन असेल, तर प्रकृती चांगली राहाते’ असा दावा थिओफ्रॅस्ट्स बॉम्बस्टस या स्विस माणसानं केला होता. हे इथपर्यंत ठीक होतं; पण सोनं, सिंहाच्या काळजाचे बारीक तुकडे, गांडूळ, कांदे आणि चित्रविचित्र वनस्पती अशांसारख्या विचित्र गोष्टींचं मिश्रण करून (अरे देवा !!) शिजवायचं आणि त्यातून वेगवेगळी ‘औषधं’ तयार करायची असे भयानक विचित्र उपचारही त्याकाळी सांगितले जायचे. यामुळे एक प्रकारची चक्क ‘फार्मास्युटिकल इंडस्ट्री’च तयार व्हायला लागली होती. हे औषध घेऊन एखादा योगायोगानं जास्त काळ जगला की ते औषध सुचवणारा अल्केमिस्ट भावही मारायचा !! मग काही काळ त्या औषधासाठी लोकांची रीघ लागायची.

अमरत्व/दीर्घायुष्यासाठी अनेक शतकं चाललेले प्रयत्न यशस्वी ठरले नसले तरी आजच्या विज्ञान युगात कदाचित माणसाला अमरत्व नसलं, तरी खूप मोठं दीर्घायुष्य लाभण्याची  शक्यता आता निर्माण व्हायला लागली आहे. ती कशी ते आपण पुढच्या लेखात (३० एप्रिल) बघूच !godbole.nifadkar@gmail.com