शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

नर संसारी उपरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:52 IST

कोणी म्हणेल, नराची जर, जोरू, जमिनीवरील अधिकाराची भावना या आमिषासाठी अधिक जबाबदार आहे. तशी ती असेलही, पण नीट विचार करता, यातील जर वा जमिनीवरील अधिकाराची भावना फार विकसित अवस्था दाखविते.

- डॉ. नीरज देवकोणी म्हणेल, नराची जर, जोरू, जमिनीवरील अधिकाराची भावना या आमिषासाठी अधिक जबाबदार आहे. तशी ती असेलही, पण नीट विचार करता, यातील जर वा जमिनीवरील अधिकाराची भावना फार विकसित अवस्था दाखविते. प्रथमत: जोरूवरील अधिकार आला असला पाहिजे आणि जोरूवरील हा अधिकार सर्वप्रथम एखाद्या अतिशय बुद्धिमान व संवेदनशील स्त्रीनेच पुढे आणला असावा. यामागे तिची जोडून अन् जुळवून घेण्याची नैसर्गिक स्त्रैण भावना व इतर नरांपासून स्वसंरक्षणाची गरज, याच बाबी मुख्य असाव्यात, असो!स्त्रिया जशा संसारात रममाण होतात, तसे पुरुष होत नाहीत, असा सरसकट आरोप बहुतेक स्त्रियांकडून होत असतो. एवढेच नव्हे, तर पुरुष फारसे जबाबदारीने वागत नाहीत, असेही त्यांचे म्हणणे असते. स्त्रियांच्या या आरोपात तथ्य नसते, असे म्हणणे अशास्त्रीयच ठरेल. जेव्हा शास्त्रीयतेची गोष्ट निघते, तेव्हा साहजिकच प्रश्न उभा राहतो, असे का बरे असावे? पुरुषप्रधान म्हणविल्या जाणाºया संसारात पुरुषच असा उपरा अन् बेजबाबदार का सापडावा?पटत नाही? बघा नं! पुरुषप्रधान संसारात मातृप्रेमाची महती वर्णन करणाºया आईवरील खंडोगणती कविता पानोपानी आढळत असताना, पित्यावरील एखाद-दुसरी कविता अपवादाने आढळावी, हे त्याचे संसारातील उपरे, परकेपण नाही, तर काय दर्शविते?मला वाटते, याचे मूळ पुरुषाच्या पूर्वेतिहासात अर्थात, नरत्वात पडलेले असावे. पशुत्वाकडे वा कधी-कधी पाशवी वृत्तीकडे पाहावे, तसे नरत्वाकडे पाहिले जाते, हीन लेखले जाते. पुरुषाचे नरत्वच त्याला संसारापासून दूर सरकवत असते.तुम्ही नीट बघा! मनुष्यप्राणी वगळता विश्वातील सारी प्राणिसृष्टी केवळ आई व पिल्लांनीच भरलेली तुम्हाला आढळेल. अपवाद एखाद-दुसºया कसरीसारख्या कृमी-किटकाचा. गाय-वासरू, हरिणी-पाडस, सिंहीण-शावक अगदी चिमणी व चिमणीचे पिल्लू अशा जोड्या तुम्हाला कथा-कहाण्यातूनही पाहायला मिळतील.अगदी डझनभर पिल्लांचा भार डुकराच्या मदतीशिवाय समर्थपणे वाहणारी डुकरीण, पिल्लाला पोटाशी कवळून या झाडावरून त्या झाडावर अलगद वावरणारी माकडीण वा पिल्लाला पोटाच्या पिशवीत ठेवून उड्या मारत जाणारी कांगारू माता तुमच्या नजरेसमोर तरळून जाईल. आपल्या पिल्लाला चोचीने दाणा भरविणारी चिमणीही तुम्हाला आठवेल, तर बोक्यापासून आपल्या पिल्लाला वाचवून नेणारी मांजरसुद्धा नित्याचीच वाटेल.मला सांगा, कधी कुत्रा व कुत्र्याचे पिल्लू सोबत जाताना तुम्ही पाहिलेय का? बैल आणि वासरू, घोडा अन् शिंगरू खेळीमेळीने रमतगमत जाताना तुम्ही कधी पाहिलेय का? नाही, आपण ही कल्पनाच नाही करू शकत. आपल्याला ती कल्पनाही हास्यास्पद वाटते. अहो, मनुष्यप्राण्याचे तान्हे तर सोडूनच द्या, पण वर्षभराचे बाळही केवळ एकट्या पित्यासोबत कोठे दूर एकटे जात असेल, तर ही कल्पनाही आपल्याला करवत नाही आणि तसे दिसले, तर आपण विचारात पडतो, आईविना हे बाळ राहील कसे? बहुतेक वेळा तर आपण नरापासून त्याच्याच पिल्लाला वाचवित असतो. प्राणिसृष्टीत नर जसा दाता असतो, तसाच संहारकही असतो. त्याची नजर मादीवर केवळ उपभोगातूनच पडते. नराच्या नरत्वाचा हा त्रास केवळ मादीलाच जाणवतो, असे नाही, तर तिच्या पिल्लांना अन् इतर नरांनाही जाणवत असतो. मानवी नारीला नराच्या पशुत्वाचा एकविसाव्या शतकात होणारा त्रास ध्यानात घेतला, तर त्या काळी होणारा त्रास कितीतरी भयानक असावा, याचा सहज अंदाज बांधता येतो.समस्त प्राणिसृष्टीतील तुरळक अपवाद वगळता, इतर सगळे नर, संसारातील जबाबदारीतून पूर्णपणे मुक्त असताना, हुशार व धूर्त म्हणविणारा मानवी नर संसारात कसा गुरफटला असावा? मला वाटते, नराला संसारात गुंतविण्याचे अप्रतिम कसब एखाद्या कुशाग्र ललनेनेच केले असावे.यासाठी तिने व तिला वश नरांनी समस्त नरजातीला अनेक आमिषे दिली असली पाहिजेत. ‘बघ, ही तुझी हक्काची बायको आहे. ही आता तुझी एकट्याचीच राहील. तू तिचा मालक असशील. ती तुझे नाव लावील. तिच्यापासून होणारी मुले तुझाच वंश चालवितील. आणि हो, तुला एकट्याने नाही राहावे लागणार, ही व हिची मुले तुझीच सेवा करतील. मादीला जसा मातेचा दर्जा निसर्गत: मिळाला, तसा तुला - नराला पित्याचा लाभेल,’ अशी एक ना अनेक आमिषे दिली गेलेली आढळतात. अगदी आरंभीच्या काळात तर ‘तू एक नाही, तर अनेक बायका करू शकतोस’ अशीही लालूच त्याला दिली गेली असेल. या बदल्यात त्याने फक्त तिचे अन् तिच्या पिल्लांचे संरक्षण व पालन पोषण करायचे, एवढेच ठरलेले असावे.मानवी नराला इतर प्राण्यांहून थोडी अधिक बुद्धिमत्ता असल्याने व तो बराच भावनिक असल्याने, त्यानेही विचार केला असावा. तिच्या कथनांत तथ्यांश तर आहेच. जर ती म्हणते, तसे मी केले तर माझाच फायदा होणारा आहे. माझे संख्याबळ वाढेल. संख्याबळ वाढेल, तसे माझे सेवक व सामर्थ्यही वाढेल. बरे तशी जबाबदारी फारशी नाही अन् तो तिच्या आमिषाला बळी पडला असावा.कोणी म्हणेल, नराची जर, जोरू, जमिनीवरील अधिकाराची भावना या आमिषासाठी अधिक जबाबदार आहे. तशी ती असेलही, पण नीट विचार करता, यातील जर वा जमिनीवरील अधिकाराची भावना फार विकसित अवस्था दाखविते. प्रथमत: जोरूवरील अधिकार आला असला पाहिजे आणि जोरूवरील हा अधिकार सर्वप्रथम एखाद्या अतिशय बुद्धिमान व संवेदनशील स्त्रीनेच पुढे आणला असावा. यामागे तिची जोडून अन् जुळवून घेण्याची नैसर्गिक स्त्रैण भावना व इतर नरांपासून स्वसंरक्षणाची गरज, याच बाबी मुख्य असाव्यात, असो!सारांशत: माता नैसर्गिक असते, तर पिता नैसर्गिकपेक्षा सामाजिकच अधिक असतो. समाजीकरणाची ही संकल्पना उत्तरोत्तर विकसित होत, पुढे-पुढे जाणारी असली, तरी कधी-कधी जबाबदारी टाळण्यातून म्हणा वा संसारातील हलगर्जी वागण्यातून म्हणा, पित्यातील नैसर्गिक नर उसळी मारून वर येत असावा.(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत.)