शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

‘मेकिंग आॅफ पंढरीची वारी’

By admin | Updated: January 31, 2015 04:45 IST

गुरू ठाकूर यांचे शब्द, अजय-अतुलच्या संगीताचे सूर व टाळ-मृदंगाची साथ राजपथावर घुमली आणि ‘पंढरीच्या वारी’ने प्रजासत्ताकदिनी लाखो

रघुनाथ पांडे -

तुला साद आली, तुझ्या लेकराची, अलंकापुरी आज भारावली..वसा वारीचा घेतला पावलांनी,आम्हा वाळवंटी तुझी सावली..गुरू ठाकूर यांचे शब्द, अजय-अतुलच्या संगीताचे सूर व टाळ-मृदंगाची साथ राजपथावर घुमली आणि ‘पंढरीच्या वारी’ने प्रजासत्ताकदिनी लाखो दर्शकांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले. देहू ते पंढरपूर हा २०५ किलोमीटरचा प्रवास ५० फूट लांब, १४ फूट रुंद व १६ फूट उंच अशा मोजक्या जागेत चित्ररथातून मांडणे नक्कीच आव्हान होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने हे आव्हान लीलया पेलले आणि विठ्ठलाच्या पदस्पर्शाने राजपथच नव्हे, तर अवघा देश भारावला. सहा गोल रिंगणांपैकी एक रिंगण, डोईवर तुळस घेतलेली वारकरी महिला, कोरलेल्या डोंगरावर वारकऱ्यांच्या ३०० प्रतिमा, ज्ञानेश्वर- तुकोबारायांची लोभस मूर्ती, माउली व सेवकाचे दोन अश्व, इंद्रायणीकाठचे मंदिी.. सारेच मंत्रमुग्ध! माती, फायबर ग्लास व प्लास्टर आॅफ पॅरीसने या कलाकृती अवतरल्या होत्या. ही कलाकृती कोठली, त्यामागील कारणे आणि वारी म्हणजे काय हे वर्णन निवेदक करत होते, तेव्हा उपस्थित लाखो भारतीयांची टाळ्यांची साथ होती. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्रासह गुजरातेतील केंद्रीय मंत्र्यांनी आसनावरून उठून या चित्ररथाला दाद दिली.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहुणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना वारीची माहिती दिली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही बारकावे सांगितले.. तेव्हाच ही कलाकृती देश डोक्यावर घेईल याचा अदमास आला होता. झालेही तसेच.! पांडुरंगाच्या पंढरीच्या वारीने देशात पहिला क्रमांक मिळवला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा हा गौरव आहे. हा विषय धार्मिक असल्याचा समज होता, त्यामुळे संरक्षण विभागाच्या संकल्पना निवड समितीने त्यातील अनेक बारकावे तपासल्यावर या संकल्पनेत जीव ओतायला चार महिने लागले. दिल्लीत येऊन कलाकृती निर्मितीसाठी कष्ट पडतात, ते कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे, नृत्यदिग्दर्शक संतोष भांगरे, सांस्कृतिक कला संचालक अजय अंबेकर, सहसंचालक मनोज सानप या साऱ्यांनी घेतले आणि मुत्सद्देगिरीच्या राजकीय कंगोऱ्यांनी जगाचे लक्ष वेधलेल्या प्रजासत्ताकाच्या यंदाच्या सोहळ्यावर ‘वारी’च्या यशाने मराठी मुद्रा कोरली गेली. दहा वर्षांची तीन मुले या वारीत होती. दिल्लीतील थंडी मी-मी म्हणत असताना हे सारेच सराव अनवाणी पायाने करायचे. एक-दोन नव्हे तब्बल १५ दिवस सकाळी सात वाजतापासून त्यांनी सराव केला. कडाक्याच्या थंडीची सवय पायाला व्हावी व वारकऱ्यांच्या भावनेला कोणत्याही स्थितीत तडा जाऊ नये म्हणून तंतोतत परिणाम साधणारे कष्ट त्यांनी उपसले. त्याचे चीज झाले!!गडकरींची झणझणीत दही मिसळ!नितीन गडकरींचे आदरातिथ्य प्रसिद्ध आहे. बिल व मिलिंडा गेट्स यांनाही त्यांनी दही मिसळ, पोहे, मक्याचे वडे खाऊ घातले. गडकरींच्या पत्नी कांचन यांनी तयार केलेले हे पदार्थ गेट्स दांपत्यानी हाश हुश करीत खाल्लेही!! जगाच्या पाठीवर आपली नाममुद्रा कोरणाऱ्या या दांपत्यासंदर्भातील हा प्रसंग आठवण्याचे कारण म्हणजे यंदा बिल दांपत्याला भारत सरकारने पद्मभूषण किताब जाहीर केला. हे दांपत्य भारतात अनेकदा आले. राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या भेटीही घेतल्या. सरकारी योजनांसाठी अब्जावधींची मदत केली. पण त्यांच्या दातृत्वाची कदर गडकरींनी केली. पंतप्रधानांनी जेव्हा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जागतिक पातळीवरील नावांची चर्चा केली, तेव्हा गडकरींनी गेट्स दांपत्याचे नाव सुचविले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोसला गेले होते. तिथे गेट्स फाउंडेशनने महाराष्ट्रात पुणे येथे काही उपक्रम सुरू करण्यासाठी पाऊल उचलले.. आणि विकासाची नवी खिडकी किलकिली झाली. पण सुरुवात होती नागपुरी झणझणीत दही मिसळपासून.