शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

...तुम्हीच बनवा तुमचे डम्पिंग ग्राऊंड

By चंद्रशेखर कुलकर्णी | Updated: September 25, 2017 01:21 IST

विलक्षण वेगाने सुरू असलेल्या नागरीकरणातून काही नव्या समस्या आ वासून उभ्या ठाकल्या आहेत. महानगरांच्या उंबरठ्यावरून नागरी व्यवस्थापनाला एकप्रकारे आव्हान देणा-या समस्या केवळ प्रशासनासाठीच नव्हे

विलक्षण वेगाने सुरू असलेल्या नागरीकरणातून काही नव्या समस्या आ वासून उभ्या ठाकल्या आहेत. महानगरांच्या उंबरठ्यावरून नागरी व्यवस्थापनाला एकप्रकारे आव्हान देणा-या समस्या केवळ प्रशासनासाठीच नव्हे, तर सर्वसामान्यांसाठीही डोकेदुखी बनल्या आहेत. कचरा ही त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची समस्या. मुंबई-ठाणे यासारख्या शहरांसाठी ही आटोक्यात न राहिलेली बाब बनली आहे. भरमसाट लोकसंख्या, बकाल वस्त्या आणि बेशिस्त जनता यामुळे निर्माण होणारा कचरा आणि त्याची विल्हेवाट हा प्रश्न गंभीर बनला नसता तरच नवल! रोजच्या रोज निर्माण होणारा प्रचंड कचरा टाकायचा कुठे, या चिंतेवरचे उपाय आता खुंटल्यात जमा आहेत. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मुंबईत एक नवी सुरुवात करण्याचे पुढचे पाऊल मुंबई महापालिकेने उचलले आहे. तुम्ही निर्माण केलेल्या कच-याची विल्हेवाटही तुम्हीच लावा, हे त्याचे सूत्र असणार आहे. थोडक्यात सांगायचे, तर तुम्हीच बनवा तुमचे डम्पिंग ग्राऊंड, असा स्पष्ट संदेश मुंबई महापालिकेने नागरिकांना दिला आहे.ही काही विनंती नाही. आवाहनही नव्हे. त्यासाठी ताकीदवजा आदेशच जारी करण्यात आला आहे. काही जण याच्या विरोधात सूर लावतीलही, पण कचºयाच्या विषयात यापूर्वी पालिकेने बरेच प्रयत्न करून पाहिले आहेत. प्लास्टिकचा वापर टाळण्यापासून ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याच्या आवाहनापर्यंत आणि रस्त्यावरच नैसर्गिक विधी करण्याला प्रतिबंध करण्यापासून डम्पिंग ग्राऊंडसाठी नव्या जागा शोधण्यापर्यंत खूप काही करून झाले. पण एरवी पाणी तुंबले की महापालिकेच्या नावाने बोटे मोडणारे नागरिक महापालिकेच्या अशा आवाहनांना नीट प्रतिसाद कुठे देतात? कच-याची विल्वेवाट निवासी सोसायट्यांनी स्वत:च लावण्याच्या नोटिशीच्या बाबतीतही हाच अनुभव येत आहे. पालिकेच्या आदेशाला एव्हाना फक्त चार-पाच टक्के सोसायट्यांनीच प्रतिसाद दिला आहे. ज्या सोसायट्या शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करतात, त्यांनी स्वत:च या कचºयाची विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. म्हणजे आपला कचरा नकळत दुसºयाच्या दारात नेऊन टाकणे, यात अपेक्षित नाही.खरा प्रश्न असतो, तो ओल्या कच-याची वासलात लावण्याचा. ती कशी लावायची, याचे प्रशिक्षण याच महानगरात मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने गेली २५ वर्षे दिले जात आहे. पण गळ्याशी आल्याखेरीज असे ज्ञान आत्मसात करण्याची बुद्धी बहुसंख्य लोकांना होत नाही. डम्पिंग ग्राऊंडला असलेल्या मर्यादा लक्षात घेता, सोसायट्यांनी आपापल्या आवारात शहरी शेती करण्याचा मार्ग भविष्यात अधिक सुखकर आणि व्यवहार्य ठरणार आहे. भाभा अणु संशोधन केंद्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ शरद काळे यांनी निसर्गऋणाची परतफेड करण्याच्या मनीषेतून पर्यावरणाला पोषक ठरेल अशी कच-याच्या विल्हेवाटीचा प्रकल्प सिद्ध केलेला आहे. आजमितीस अनेक ठिकाणी हा वस्तुपाठ गिरविला जात आहे, पण मुंबईकरांनी अजून तो कित्ता म्हणावा तसा गिरवलेला नाही. विज्ञान आणि समाज यांच्यातील नात्याची वीण घट्ट करण्याची ही एक संधी आहे, या दृष्टीने गांधी जयंतीला कचºयाच्या विल्हेवाटीची नवी सुरुवात झाली तर ते पुढचे पाऊल ठरेल!