शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

मेक इन सोलापूर

By admin | Updated: February 19, 2016 02:59 IST

देशात सध्या ‘मेक इन इंडिया’ची जोरदार हवा आहे. या हवेवर स्वार होताना आपल्या परिसरातील मूलभूत क्षमतांचा वापर झाल्यास ‘मेक इन सोलापूर’ देखील

देशात सध्या ‘मेक इन इंडिया’ची जोरदार हवा आहे. या हवेवर स्वार होताना आपल्या परिसरातील मूलभूत क्षमतांचा वापर झाल्यास ‘मेक इन सोलापूर’ देखील चळवळ म्हणून गतिमान होऊ शकते. देशाच्या स्मार्ट सिटीजच्या पहिल्या यादीत नवव्या क्रमांकावर आपले नाव कोरण्याचा मान सोलापूर शहराला मिळाला. पिण्याचे पाणी, नागरी सुविधा आणि स्वच्छता या आघाडीवर शहराच्या समस्या कमी झालेल्या नसल्या तरी स्मार्ट सिटी बनण्याची संधी मात्र शहराला प्राप्त झाली. महापौर प्रा. सुशीला आबुटे, आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, उपमहापौर प्रवीण डोंगरे, उपआयुक्त अमिता दगडे व त्यांच्या टीमची जबरदस्त इच्छाशक्ती आणि पालक सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी, नगरसचिव मनीषा म्हैसकर यांच्या मार्गदर्शक प्रयत्नांमुळे शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट बनण्याची संधी मिळाली आहे. केवळ इच्छाशक्तीवर कामे मार्गी लागत नाहीत, त्याला कृतिशील लोकसहभागाची जोड मिळणे गरजेचे असते. या वास्तवाचे भान मात्र ठेवायला हवे. स्मार्ट सिटीसाठी अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद करून भागणार नाही तर त्या ५० कोटींबरोबरच इतर गरजा भागविण्यासाठी महापालिकेचे उत्पन्नही वाढवावे लागणार आहे. वस्त्रोद्योगाची खूप मोठी परंपरा या शहराला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या युनिफॉर्मपासून ते राज्यातील ५० टक्के शालेय विद्यार्थ्यांच्या युनिफॉर्मपर्यंत उत्पादन करण्याची क्षमता या शहराने सिद्ध केली आहे. राज्यात कौतुकाचा विषय ठरावा असा पुणे-सोलापूर हा चौपदरी महामार्ग, होऊ घातलेला सोलापूर-हैदराबाद महामार्ग तसेच विजयपूर महामार्ग यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनी या शहराची सुविधा-प्रतिष्ठा वाढलेली आहे. देशातील प्रमुख शहरांना जास्तीत जास्त गतीने जोडणारी रेल्वे सेवा देखील येथे उपलब्ध आहे. उजनी धरण ओसंडून वाहत असो अथवा कोरडे पडण्याच्या दिशेने धावत असो, या शहराला मिळणाऱ्या पाण्यात मात्र कधी खंड पडत नाही, हा इतिहास आहे. या बलस्थानांचा नियोजनबद्ध वापर करण्याची संधी स्मार्ट सिटीच्या मान्यतेने उपलब्ध झाली आहे. या संधीचे सोने करणे म्हणजे नक्की काय, या प्रश्नांच्या मुळाशी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पोहोचायला हवे. तो प्रयत्नच ‘मेक इन सोलापूर’चा महामार्ग तयार करणार आहे. देशात सर्वाधिक साखर कारखाने आणि साखर उत्पादन असणाऱ्या या जिल्ह्यात त्या कारखान्यांमार्फत वीज उत्पादन कसे वाढेल, यावर भर देण्याची गरज आहे. तो भरच जागतिक बाजारपेठेतील साखरेच्या भावांच्या चढ-उतारावर नामी औषध ठरू शकतो.मोठे उद्योग सोलापुरात यावे यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्या वातावरणाची महती सरकार दरबारी वाढविण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधींनी अधिक गतीने करण्याची गरज आहे. अक्कलकोट मार्गावर नवी औद्योगिक वसाहत व्हावी, ही उद्योजकांची मागणी तातडीने पूर्ण व्हायला पाहिजे. सध्या येथे सुरू असलेल्या मोठ्या उद्योगांना विस्तारासाठी मदत करणे, मोठ्या उद्योग परिवारांना बदललेल्या सोलापूरची उपयुक्तता पटवून देणे आणि स्मार्ट सिटी म्हणून होत असलेल्या शहरातील परिवर्तनाला राज्य पातळीवर पोहोचविणे या मूलभूत गोष्टींकडे सर्वांनीच लक्ष द्यायला हवे. यतीन शहा व सुहासिनी शहा यांच्या प्रिसिजन उद्योगसमूहाने पाहता पाहता जागतिक बाजारपेठेबरोबरच चीनसारख्या देशात आपला उद्योग सुरू केला ही सोलापूर उद्योग क्षेत्रासाठी भूषणाची बाब आहे. सुहास आदमानेसारख्या तरुणाचा ‘स्पेन्का’ मिनरल वॉटर प्रकल्प भल्याभल्यांशी स्पर्धा करतो. सोलापूरची शेंगा-चटणी आणि मालदांडी ज्वारी जागतिक प्रतिष्ठा मिळविते; पण तिला उद्योगाचे स्वरूप मात्र आपण देऊ शकलेलो नाहीत. कापड उद्योगापासून शेंगा-चटणीपर्यंतच्या आपल्या सामर्थ्याला जगाच्या गळी उतरविणे हेच खरे ‘मेक इन सोलापूर’ ठरू शकते. ते ठरविण्यासाठी सर्वांचीच मानसिकता बदलायला हवी.- राजा माने