शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

इंटरनेटला सांभाळा

By admin | Updated: November 6, 2016 01:44 IST

इंटरनेट अथवा वेबसाइट्सवरती होणाऱ्या पारंपरिक हल्ल्यांना छेद देत या वेळी एक वेगळाच हल्ला अमेरिकेन इंटरनेट क्षेत्राला अनुभवायला मिळाला. ‘डिस्ट्रीब्यूटर डिनायल आॅफ

-प्रसाद ताम्हनकर नवा सायबर हल्ला :- इंटरनेट अथवा वेबसाइट्सवरती होणाऱ्या पारंपरिक हल्ल्यांना छेद देत या वेळी एक वेगळाच हल्ला अमेरिकेन इंटरनेट क्षेत्राला अनुभवायला मिळाला. ‘डिस्ट्रीब्यूटर डिनायल आॅफ सर्विस’ अर्थात डीडीओएस पद्धतीनेच हा हल्ला केला गेला असला, तरी याआधी या डीडीओएसच्या मदतीने एखाद्या विशिष्ट वेबसाइटलाच लक्ष्य करून तिच्यावरती हल्ला केला जात असे. मात्र ह्या वेळी विविध वेबसाइट्सना सेवा पुरवणाऱ्या डाइन या सेवा पुरवठा करणाऱ्या मुख्य कंपनीलाच हल्ल्याचे लक्ष्य बनवले गेले आहे. या प्रमुख सर्व्हरवरतीच हल्ला झाल्याने टिष्ट्वटर, रेडिट, साउंडक्लाऊड यांसारख्या अनेक मातब्बर वेबसाइट्स पाहणे ग्राहकांना काही तासांसाठी कठीण होऊन बनले. पेपालसारख्या पेमेंट गेटवेला तर याचा चांगलाच फटका बसला असून, त्याचे अनेक ग्राहक विविध सेवादात्यांची बिले आॅनलाइन भरू शकले नाहीत. एकाच दिवशी लागोपाठ दोनदा हे हल्ले झाल्याने स्थिती अधिकच नाजूक बनल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेचा होमलँड सुरक्षा विभाग आणि गुप्तचर यंत्रणा एफबीआय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. या अनोख्या हल्ल्यानंतर आता जगभरातील सर्वच इंटरनेट सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या असून, असे हल्ले यापुढे मोठ्या प्रमाणावरती केले जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.टेस्लाचे सौरछत :सौरऊर्जा ही आता काळाची गरज बनत चालली आहे. अनेक लोक आपापल्या घरांवरती सौरपॅनेल्स बसवून ऊर्जेची गरज भागवत आहेत. पण आता जर तुम्हाला सरळ सौरछतच उपलब्ध झाले तर? गोष्ट अद्भुत वाटते, पण टेस्ला कंपनीने ही गोष्ट सत्यात उतरवली आहे. टेस्ला ही खरेतर इलेक्ट्रॉनिक वाहनांची उत्पादन कंपनी. मात्र नुकतीच टेस्लाने ‘सोलर सिटी’ ही कंपनी टेकओव्हर केली; आणि या अद्भुत योजनेच्या बांधणीला सुरुवात झाली. हे सौरछत म्हणजे, सरळ सरळ सौरपॅनल्स बसवलेली कौले किंवा टाइल्स असणार आहेत. विविध रंगांत ही कौले उपलब्ध होणार असून, त्यांच्याद्वारे मिळणाऱ्या ऊर्जेतून घरातील विजेची मागणी सहजतेने पूर्ण होऊ शकणार आहे. ही कौले काचेची बनवलेली असणार आहेत. या यंत्रणेची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नसली, तरी पारंपरिकपणे बनवलेली छते आणि त्यावर बसवले जाणारे सौरपॅनेल यांच्या एकूण खर्चापेक्षा ती कमीच असणार आहे. याबरोबरच कंपनीतर्फे बॅटरी पॉवरवॉल-२देखील सादर करण्यात आली आहे. या सौरछतापासून निर्माण झालेली अतिरिक्त ऊर्जा ह्या बॅटरीद्वारे साठवली जाणार आहे. या बॅटरीची किंमत ५५०० डॉलर्स असणार आहे.गूगल प्ले स्टोअरमध्ये बदल :जगातील जवळजवळ ८०% स्मार्टफोन्स हे अँड्रॉइड प्रणालीवरती चालतात. सध्या गूगल प्ले स्टोअरवरती तब्बल २० लाख विविध प्रकारचे अ‍ॅप्स डाऊनलोडसाठी उपलब्ध आहेत. आता ग्राहकांची व्हॉईस सर्च वापरण्याची वाढती व्याप्ती बघता, गूगलने या अ‍ॅप स्टोअरमध्ये काही मोठे बदल करण्याचे ठरवले आहे. सर्वांत आधी सर्च बारची जागा बदलून त्याला प्ले स्टोअरऐवजी स्क्रीनच्या वेगळ्या भागात दाखवले जाणार आहे. गूगल प्ले स्टोअरचे बॅनरदेखील नव्या स्वरूपात दिसणार आहे. मूव्हीज, गाणी, पुस्तके ह्यांचे सेक्शन्सदेखील आता नव्या आधुनिक रूपात सादर केले जाणार आहेत. या सर्वांना एकत्र करून एंटरटेन्मेंट सेक्शनच्या आत समाविष्ट केले जाणार आहे. गूगल पहिल्यांदाच आपल्या प्ले स्टोअरमध्ये एकाच वेळी एवढे सारे बदल करत असून, सध्या ह्या सर्वच बदलांची टेस्टिंग सुरू करण्यात आलेली आहे. ह्यातील काही बदल हे काही ग्राहकांच्या प्ले स्टोअरमध्ये दिसायलादेखील सुरुवात झालेली आहे. अर्थात हे ग्राहक ह्या बदलांना कसा प्रतिसाद देतात, यावरदेखील हे बदल कायमस्वरूपी टिकतील का नाही हे गूगलतर्फे ठरवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.