शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लाखो मतं खाणारी ‘नावं’ आणि ‘चिन्हं’

By श्रीनिवास नागे | Updated: June 8, 2024 09:40 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: सारखी नावं आणि सारखीच दिसणारी चिन्हं यातून संभ्रम निर्माण करायचा आणि मातब्बरांची मतं खाऊन त्यांची कोंडी करायची, हे याहीवेळी झालंच!

- श्रीनिवास नागे(वरिष्ठ वृत्तसंपादक, लोकमत, पिंपरी-चिंचवड’)

‘नावात काय आहे’ या ऐवजी ‘नावातच सगळं आहे’ असं आता म्हणावं लागतंय! निवडणुकीच्या राजकारणात मतदान यंत्रावरची नावंच कळीचा मुद्दा ठरताहेत. निवडणूक कोणतीही असो, मातब्बर उमेदवारांच्या विरोधकांची पहिली खेळी असते, मातब्बरांच्या नामसाधर्म्याचे मतदार शोधून त्यांना  रिंगणात उतरविण्याची. ‘डमी’ उभे करायचे, मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि मातब्बरांच्या मतांचं विभाजन करून त्यांची कोंडी करायची, अशी ही खेळी! महाराष्ट्रात हा ‘रायगड पॅटर्न’ म्हणून ओळखला जातो. १९९१ पासून  काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षानं हा ‘पॅटर्न’ सुरू केला.  १९९६ मध्ये तर चार ‘डमी’ दत्ता पाटील मैदानात उतरले होते.

यंदा रायगडमध्येच शिवसेनेच्या अनंत गितेंसोबत आणखी तीन ‘अनंत गिते’ रिंगणात होते! २०१४ मधल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरेंच्या नामसाधर्म्याचे उमेदवार सुनील श्याम तटकरे यांना अपक्ष म्हणून उतरवलं गेलं. त्यांनी दहा हजार मतं खाल्ली आणि  तटकरेंचा अनंत गितेंकडून दोन हजार मतांनी पराभव झाला. २०१९ मध्येही तीन ‘सुनील तटकरे’ उभे होते. त्यातले राष्ट्रवादीचे तटकरे निवडून आले, पण इतर दोघांनी १३ हजार मतं खाल्ली.

लोकसभेच्या २०१४ मधल्या निवडणुकीत छत्तीसगडच्या महासमुंद मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते चंदुलाल साहू आणि काँग्रेसचे तेव्हाचे सर्वांत मातब्बर नेते अजित जोगी लढत होते. चंदुलालना हरवण्यासाठी जोगींनी त्यांच्या नावाशी मिळत्याजुळत्या तब्बल १० चंदुलाल साहूंना अपक्ष उभं केलं! या सगळ्यांनी ६८ हजार २९४ मतं खाल्ली. यंदा या कूटनीतीत भर पडली चिन्हातील साधर्म्याची नाशिकमधल्या दिंडोरी मतदारसंघात शिक्षकी पेशातले भास्कर भगरे (सर) महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभे होते. त्यांचं चिन्ह होतं, ‘तुतारी वाजवणारा माणूस’. विरोधकांनी चाल खेळली.

तिसरी उत्तीर्ण असणारे अपक्ष बाबू भगरे यांच्या नावापुढं कंसात ‘सर’ लावून ‘तुतारी’ चिन्ह दिलं गेलं. दोन्ही उमेदवारांचं काहीसं सारखं नाव आणि चिन्ह यामुळं मतदार संभ्रमात पडले. खऱ्या शिक्षकाचं मताधिक्य घटलं आणि प्रचारात कुठंही न दिसलेल्या बाबू भगरेंना १ लाख ३ हजार २९ मतं मिळाली. भास्कर भगरे यांच्या काही विरोधकांनीच बाबू भगरेंचा प्रचार करत नवव्या क्रमांकाचं बटण दाबण्याचं आवाहन केलं. यात ज्यांना फारसं लिहिता, वाचता येत नाही, अशा आदिवासी मतदारांनी भास्कर भगरे समजून नऊ नंबरचं बटण दाबलं! या लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्रावर उमेदवारांचं नाव, पक्ष, निवडणूक चिन्ह आणि फोटोही होता, तरीही समान नावांचा आणि चिन्हांचा हा ‘फंडा’ चालवला गेलाच.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं चिन्ह आहे, ‘तुतारी वाजवणारा माणूस’. मात्र निवडणूक आयोगानं दिलेल्या चिन्हांच्या यादीत ‘ट्रम्पेट’ या वाद्याचा उल्लेखही ‘तुतारी’ असा केलाय. त्याचा फायदा उठवत शरद पवार गटाचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांत विरोधकांनी जाणीवपूर्वक उमेदवार उभे करून त्यांना ‘तुतारी’ चिन्ह मिळण्याची तजवीज केली. मतदारांचा गोंधळ उडाला आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ऐवजी ‘तुतारी’वर मतं गेली. महाराष्ट्रातल्या दहा मतदारसंघांत या चिन्हानं चार लाखांवर मतं खाल्ली! निवडणुकीचं तंत्र बदललं, प्रचाराची पद्धत बदलली, तरी प्रबळ विरोधकांच्या नावांचं भांडवल करून (आणि आता तर चिन्हाचा गोंधळ उडवून) एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण मात्र तेजीतच राहणार, हे मात्र निश्चित. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४