शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

महाराष्ट्र वनात इव्हेन्ट जोरात!

By admin | Updated: July 27, 2016 03:41 IST

काहीही असो, १ जुलैचा इव्हेंट जोरात झाला. सध्या जमाना इव्हेंटचाच आहे. कुठले काम करा वा न करा त्याचा गाजावाजा जोरात व्हायला हवा. इथे काल काय झाले याच्याशी फारसे देणेघेणे नसलेला

- सुधीर महाजन

काहीही असो, १ जुलैचा इव्हेंट जोरात झाला. सध्या जमाना इव्हेंटचाच आहे. कुठले काम करा वा न करा त्याचा गाजावाजा जोरात व्हायला हवा. इथे काल काय झाले याच्याशी फारसे देणेघेणे नसलेला समाज काही वर्षांपूर्वीची वृक्षलागवड थोडीच लक्षात ठेवेल? मराठवाडा, विदर्भात भले तुम्हाला उघडे-बोडखे डोंगर दिसतील, पाण्यासाठीची वणवण दिसेल, पावसाअभावी शेतातील पिके माना टाकलेली दिसतील पण राज्य शासनाच्या वन विभागाच्या संकेत स्थळावर मात्र हिरवेगार वातावरण दिसेल. राज्यातील भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनाच्छादन करण्याचे या सरकारचे धोरण आहे. त्याचाच भाग म्हणून एक जुलैला राज्यभर वृक्ष लागवडीचा मोठा इव्हेंट झाला. तब्बल दोन कोटी झाडे लावण्यात आली. कायम दुष्काळात जगणाऱ्या मराठवाड्यात तब्बल ४८ लाख झाडांची लागवड करण्यात आली. जादूगाराने जादूची कांडी फिरवून माळरानावर नंदनवन फुलवावे, अशी किमया वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी एका दिवसात केली. दोन कोटी झाडे राज्यात कुठून उपलब्ध करून देण्यात आली हा मोठा संशोधनाचा विषय. ३० जूनच्या सायंकाळपर्यंत जिल्ह्यात तीन शासकीय आणि आठ खाजगी रोप वाटिकांमध्ये केवळ एक लाख ८५ हजार ३०० रोपे उपलब्ध होती. जिल्ह्याला टार्गेट होते सात लाख २० हजार वृक्ष लावण्याचे. नवल म्हणजे जिल्ह्याने ते पूर्णही केले. उर्वरित रोपे आली कुठून हे विचारण्याची सोय नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ चार लाख रोपे उपलब्ध होती. तिथे सहा लाख ६ हजार ६१७ झाडे लावली. ती कोठून आली? कुठल्याही जिल्ह्यातील वृक्ष लागवड मोहिमेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला की, मारुतीच्या बेंबीत हात घातल्यानंतर जे होते तेच घडत आहे. बऱ्याच वर्षांनंतर पर्यावरणाबद्दल काहीसे चांगले घडत आहे हा विचार करून साऱ्यांचाच ‘गार गार वाटतंय’ असा जपनाम सुरू आहे. राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्याने किती झाडे लावली याची आकडेवारी जाहीर केली. संख्यानिहाय त्याची ठिकाणेही जाहीर केली असती तर बरे झाले असते; पण ते होणार नाही. लावलेल्या झाडांची जबाबदारी कोण घेणार, हेदेखील सांगितले जाणार नाही. वृक्ष लागवडीवर पैसे किती खर्च केले हेही कळणार नाही. पोरीचे लग्न करायचे म्हटले की, तिच्या जन्मापासून आम्ही तयारी करीत असतो. वर्षभर आधी तर नुसती धामधूम असते. आपल्या वनमंत्र्यांनी दोन कोटी झाडांचा संसार अवघ्या तीन महिन्यांत उभा केला. धडाकेबाज इव्हेंटही करून दाखवला. एखाद्या झाडाचे रोपटे तयार करायचे म्हणजे एक वर्ष आधीपासून तयारी करावी लागते. हजार-दोन हजार रोपटी ऐनवेळी मिळतीलही. दोन कोटी कशी मिळतील? तरीही ती आम्हाला मिळाली. वनमंत्र्यांनी ती मिळविली. कोठून आली, कोणती आणली हे विचारायचे नाही. वड, पिंपळ, चिंच आणि औदुंबर ही झाडे लावणारे कधीच नरकात जात नाहीत, असे आमचे पुराण सांगते. दोन कोटींमध्ये या झाडांची संख्या किती ठाऊक नाही. काहीही करून आम्हाला विकास हवा आहे. वनाच्छादित जमिनीवर नांगर फिरवून हा विकास केला जात आहे. विकास प्रकल्पांच्या नावाखाली दररोज सरासरी १३५ हेक्टर वनाच्छादित जमिनीचे निर्वनीकरण केले जात आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयानेच ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. ही आकडेवारी आहे २०११ सालची. हे सरकार त्यापेक्षाही चार पावले पुढे आहे. कोळसा खाणी, औष्णिक विद्युत, औद्योगिक प्रकल्पांसाठी वन जमिनींचे संपादन केले जात आहे. महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश आणि झारखंडला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. वन हक्क कायद्याखाली सहा वर्षांत एक लाख हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या नकाशावरील ४०० हेक्टर्स जंगल दोन वर्षांत नष्ट झाले आहे. अशा पद्धतीने जंगलांवर कुऱ्हाड चालवायची आणि त्याचवेळी मोठमोठे इव्हेंट घेऊन वृक्षलागवड मोहीम राबवायची. राज्य सरकारच्या या दांभिकतेला तोड नाही.