शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामध्ये निष्ठावानांना बळ

By admin | Updated: January 30, 2015 03:16 IST

केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्याने सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेशासाठी अन्य पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे.

मिलिंद कुळकर्णी - 

केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्याने सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेशासाठी अन्य पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. ‘शतप्रतिशत’चा घोष करीत विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढताना शिवसेनेच्या वाटेला असलेल्या मतदारसंघात झालेली दमछाक भाजपा नेते विसरलेले नाहीत. शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपा वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पाचोरा या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार निवडून आले. तेथील मनसेचे उमेदवार डी.एम. पाटील आणि ऐनवेळी माघार घेतलेल्या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या दोघांचा प्रवेश म्हणजे भाजपाच्या शतप्रतिशत व्यूहरचनेचा भाग आहे. अन्य पक्षातील माजी आमदार, नेते व प्रमुख कार्यकर्ते भाजपाच्या संपर्कात असल्याची जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची घोषणा त्याचेच निदर्शक आहे. एकीकडे भाजपा प्रवेशाचे सोहळे रंगत असताना दोन प्रमुख पदांवर निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे. आयारामांचे स्वागत असले तरी लगेच पद मिळणार नाही, असा संदेश यानिमित्त पक्षाने दिला आहे. एकनाथराव खडसे यांचे निकटचे सहकारी मो. हुसेन खान यांची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. खान हे खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील आहेत. खडसे यांच्याकडे अल्पसंख्याक विकास हे खाते असल्याने त्यांनी समर्थकाला न्याय दिला. खान हे भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. खान यांच्या रूपाने मुस्लीम मते कायम खडसे यांना मिळत असतात. भाजपाविषयी मुस्लिमांना आक्षेप असला तरी जळगाव जिल्ह्यात खडसे यांच्याविषयी ममत्व आहे. त्यालाही कारण आहे. उर्दू शाळांचे प्रश्न, कब्रस्तानची जागा, हज यात्रेकरुंच्या अडचणी सोडविणे यासाठी खडसे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कॅबिनेट दर्जाचे हे पद जिल्ह्यातील समर्थकांसाठी खडसे यांनी खेचून आणले. अर्थात या पदासाठी भाजपामध्ये फारसे पर्याय नव्हते. त्यामुळे चुरस असण्याचा प्रश्न नव्हता. विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मात्र भाजपामध्ये मोठी चुरस होती. शायना एन.सी., माधव भंडारी, सुजीतसिंह ठाकूर यांची नावे चर्चेत असताना अचानक स्मिता वाघ यांचे नाव पुढे आले आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. ही नियुक्ती धक्कादायक असली तरी वाघ या पदासाठी पात्र होत्या, हे निसंशय. भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या वाघ यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. अमळनेर या विधानसभा मतदारसंघात इच्छुक असूनही पक्षाने दोनदा त्यांना डावलले तरी त्यांनी पक्षकार्य सुरू ठेवले. त्यांचे पती उदय वाघ हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात भाजपाचे दोन खासदार, सहा आमदार, एक विधान परिषद सदस्य अशी भक्कम कामगिरी झाली. ही कामगिरीदेखील पक्षश्रेष्ठींनी विचारात घेतली असावी. जिल्ह्यात एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांचे दोन गट कार्यरत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही गटांनी वाघ यांच्या नावाला संमती दिली. पुन्हा वाघ दाम्पत्याला अभाविपची असलेली पार्श्वभूमीदेखील लाभदायक ठरली. वाजपेयी-अडवाणींचा भाजपा ही ओळख पुसून मोदी-शाह यांचा भाजपा ही नवी ओळख रूढ केली जात असली तरी, पक्षकार्याला वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्याचाच भाग म्हणून खान आणि वाघ यांच्या नियुक्तीकडे पाहायला हवे. खान्देशातील एका आमदाराने भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास काही वर्षांपूर्वी असमर्थता व्यक्त केली होती. आता मंत्रिपदासाठी हे आमदार प्रयत्नशील असताना पक्षश्रेष्ठींनी त्यांना या गोष्टीची आवर्जून आठवण करुन दिली. भाजपाची आगामी काळातील दिशा यावरून स्पष्ट होते.