शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Lok Sabha Election 2019 : आपले खासदार दिल्लीत जाऊन करतात तरी काय ?

By सुधीर महाजन | Updated: March 30, 2019 12:28 IST

समाजाची स्मृती अल्पकालीन असते, म्हणूनच प्रत्येक वेळी तेच आश्वासन नव्या आवरणात आपल्यापुढे येते.

- सुधीर महाजन

रखरखत्या उन्हात उकरून ठेवलेल्या रस्त्यावरून धुळीचे लोट उठवत पळणारा वाहनांचा ताफा, कार्यकर्त्यांची लगबग, झेंड्यांची गर्दी, भोंग्यांचा गदारोळ, रंगाची उधळण आणि फसफसणाऱ्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर छप्परफाड आश्वासने देत औट घटकेच्या मतदारराजाची मिनतवारी करणारा उमेदवार हे निवडणुकीचे सार्वत्रिक चित्र सर्वत्र दिसते. उमेदवारांनी जाहीरनामे आणि आश्वासने पाच वर्षात पूर्ण केली, तर कोणत्याही उमेदवाराला मदतारांची एवढी अजिजी करावी लागणार नाही; पण निवडणुकीच्या धुराळ्यात ही आश्वासने विरून जातात. त्याचा सोयीस्कर विसर जसा उमेदवारांना पडतो, तशी ती मतदारांच्या स्मृतिपटलावरूनही पुसली जातात. समाजाची स्मृती अल्पकालीन असते, म्हणूनच प्रत्येक वेळी तेच आश्वासन नव्या आवरणात आपल्यापुढे येते. कंपन्या जसा तोच तो माल वेगवेगळ्या आकर्षक आवरणातून आणत असतात. शेवटी उमेदवारासाठी निवडणूक एक व्यवहारच आहे. एखादे कंत्राट मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या लटपटी-खटपटी आणि निवडणूक जिंकण्यासाठी खेळावे लागणारे राजकारण, या दोन्हीची जातकुळी एकच. कंत्राट मिळाल्यानंतर कंपनी जास्तीत जास्त नफा मिळविण्याचा प्रयत्न करते.

इकडे राजकीय नेत्यांचा विचार केला, तर त्यांच्याही संपत्तीत पाच वर्षांत पाच-पन्नास टक्क्यांनी वाढ होत असते आणि इकडे शेतकरी निसर्गाच्या रुसव्याने फसलेल्या शेतीचा खेळ खेळत कर्जमाफीकडे डोळे लावून बसलेला असतो. नोकरदार महागाई भत्ता, वेतन आयोगाची आकडेमोड करीत असतो, तर व्यापारी जीएसटीतून मार्ग काढत नफा कसा मिळवता येईल ही कसरत करण्यात मग्न असतो. तरुण बेरोजगार नोकरीच्या आशेने फेऱ्या मारताना दिसतो. या सगळ्यांचा व्यवहार जवळपास आतबट्ट्याचा दिसताना नेत्यांचे उत्पन्न मात्र, वाढलेले दिसते. ते कसे वाढते याचे संशोधन कधीच होत नाही. नोटाबंदीचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत नाही. जीएसटीमुळे त्यांच्या व्यापाराचा नफा घटत नाही. हे सगळे प्रश्न निवडणुकीच्या काळात कोणालाही पडत नाहीत.

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील आठ मतदारसंघांचा विचार केला, तर गेल्या पाच वर्षात परिस्थितीत काय बदल झाला याचा विचार केला, तर हातात काय पडते? उदाहरणार्थ बीड-अहमदनगर रेल्वे सुरू होणार, असे आश्वासन पाच वर्षापूर्वी मिळाले होते; पण ही रेल्वे आता कुठे बीड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे पुढील पाच वर्षात ती बीडपर्यंत पोहोचायला हरकत नाही. औरंगाबाद-हैदराबाद रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण ज्या गतीने चालले ते पाहता देशात इतरत्र जेव्हा बुलेट ट्रेन धावतील त्यावेळी इकडे दुहेरीकरण होईल. या कामाचा वेग पॅसेंजरला लाजविण्याइतपत धीमा आहे. मराठवाड्यात औरंगाबादची विमानसेवा सर्वात जुनी, कालानुरूप त्यात वाढ व्हायला पाहिजे होती. शहराचे झालेले औद्योगिकीकरण, पर्यटकांचा ओढा लक्षात घेता औरंगाबाद हे हवाई नकाशावर महत्त्वाचे स्थळ अपेक्षित होते; पण सध्या याठिकाणी केवळ अडीच विमाने येतात. एकही मोठा प्रकल्प मराठवाड्यात नाही. सिंचन वाढले नाही. गेल्या वर्षभरात सगळेच रस्ते खोदून ठेवल्याने रस्त्याचे काम चालू असल्याचे समाधान मिळते. चीनच्या उपाध्यक्षांना गचके बसल्याने अजिंठ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे भाग्य उजळले; पण आता प्रवाशांचे हाल पाहवत नाहीत. मराठवाड्याच्या अडचणींची ही अवस्था आजही कायम आहे. यावरून एक प्रश्न पडतो. आपले खासदार दिल्लीत जाऊन नेमके करतात तरी काय? याचा उलगडा या रणधुमाळीत होईल का?

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Member of parliamentखासदारaurangabad-pcऔरंगाबाद