शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

ही संचारबंदी फळास जावो...

By किरण अग्रवाल | Updated: April 15, 2021 15:12 IST

राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग एकीकडे वाढत असताना व देशात महाराष्ट्र याबाबतीत अव्वल असताना दुसरीकडे पंधरा दिवसांची संचारबंदी जाहीर करतेवेळी तळातल्या घटकांसाठी विविध तरतुदीही ठाकरे सरकारने केल्या आहेत.

- किरण अग्रवालरोजी थांबली तरी, रोटी थांबणार नाही; सरकार काळजी घेईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अखेर हो ना हो ना करीत बुधवारच्या रात्रीपासून राज्यात पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली. यामुळे अनेकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे हे खरेच; परंतु अंतिमतः जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. आता तरी जनतेने समजूतदारी दाखवत प्रशासनाला सहकार्य करून निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, तसे केले तरच कोरोनाच्या संकटाला थोपवणे शक्य होईल.राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून, प्रतिदिनी सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्णांचे निदान होत आहे, त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 35 लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.44 टक्के एवढे झाले असले तरी मृत्युदर 1.66 टक्के इतका आहे. सर्वाधिक एक लाखापेक्षा अधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात असून, त्यापाठोपाठ मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक जिल्ह्यांचा नंबर लागतो. रुग्णसंख्या वाढत आहे तशी रुग्णालये अपुरी पडत असून, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. बेड्स मिळणेही सोडा, आता तर रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा भासू लागल्याने रुग्णांचे नातेवाईक हताशपणे मेडिकलवाल्यांकडे रांगा लावताना दिसत आहेत. शासन प्रशासन आपल्यापरीने उपाययोजना करताना दिसत आहेच; पण परिस्थिती अशी काही हाताबाहेर चालली आहे की भयाचे ढग दाटून यावेत.चालू वर्षाच्या प्रारंभापर्यंत म्हणजे जानेवारीपर्यंत कोरोनाची स्थिती तशी निवळलेली दिसत होती; परंतु फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाने दार ठोठावले आणि गेल्या वर्षापेक्षाही भयावह रूप धारण करीत कहर माजविला आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने एकेक करून काही निर्बंध घातले खरे, परंतु त्याने कसलाही परिणाम होताना दिसून आला नाही. लोकांनीही कोरोना संपल्यात जमा झाल्याप्रमाणे आपले वर्तन ठेवले. मास्क न वापरता व फिजिकल डिस्टन्स न बाळगता सारे व्यवहार होऊ लागल्याने संसर्गाचा वेग वाढून गेला आणि अखेर नाइलाज म्हणून राज्यात कडक निर्बंध आणि पंधरा दिवसांची संचारबंदी पुकारण्याची वेळ आली. अर्थात या संचारबंदीत अत्यावश्यक वा जीवनावश्यक सेवावगळता इतर घटकांनी घरातच सुरक्षितपणे थांबणे अपेक्षित आहे, कारण कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ते गरजेचे बनले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यासाठी  ‘ब्रेक दि चेन’ असा नारा दिला असून, नागरिकांनी सहकार्य केले तर ही साखळी निश्चितच तुटू शकेल.महत्त्वाचे म्हणजे राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग एकीकडे वाढत असताना व देशात महाराष्ट्र याबाबतीत अव्वल असताना दुसरीकडे पंधरा दिवसांची संचारबंदी जाहीर करतेवेळी तळातल्या घटकांसाठी विविध तरतुदीही ठाकरे सरकारने केल्या आहेत. एकूण 5 हजार 476 कोटी रुपयांचे कोरोना पॅकेज घोषित करण्यात आले असून, रोजी थांबली तरी रोटी थांबणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या पॅकेज अंतर्गत 7 कोटी लोकांना एक महिना मोफत गहू व तांदूळ देण्यात येणार असून, तब्बल 12 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांची मदत दिली जाणार आहे. शिवभोजन थाळी महिनाभर गरजूंना मोफत देण्यात येणार असून, 12 लाख परवानाधारक रिक्षाचालक व नोंदणीकृत पाच लाख फेरीवाल्यांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. ही मदत किंवा सहाय्य पुरेसे नाही व सर्वांसाठी नाही हेदेखील खरे; परंतु या संचारबंदीच्या काळात ज्यांची उदरनिर्वाहाची अडचण होऊ शकते अशा लहान घटकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. शेवटी हे संकट सर्वांवरचे आहे त्यास सर्वांनी मिळूनच सामोरे जावे लागणार आहे. त्याचा फटका बहुसंख्य घटकांना थोड्याफार प्रमाणात बसणार असला तरी जिवाची काळजी म्हणून सर्वांनीच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरातच सुरक्षितपणे थांबणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने ही संचारबंदी फळास जावो अशी अपेक्षा करूया...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या