शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

टांग्याचा घोडा आणि सत्तेचे मैदान

By admin | Updated: June 24, 2015 00:34 IST

टांग्याच्या घोड्यावर पैसे लावून त्याला रेसच्या मैदानात उतरविणे, हे साहस करणारा एक तर व्यवहारशून्य असू शकतो, नाही तर परिस्थितीशी दोन हात करून

सुधीर महाजन -

टांग्याच्या घोड्यावर पैसे लावून त्याला रेसच्या मैदानात उतरविणे, हे साहस करणारा एक तर व्यवहारशून्य असू शकतो, नाही तर परिस्थितीशी दोन हात करून ती बदलण्याची धमक असणाराच. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यापैकी नेमक्या कोणत्या गटात बसतात हे काळच ठरवील. दहा-बारा वर्षांपासून बंद पडलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकून तो पुन्हा चालू करण्याची घोषणा बंब यांनी केली. यासाठी त्यांनी नऊ कोटी रुपये गुंतविल्याचीही चर्चा आहे. आज बोलायचे झाले तर बंब हे व्यापारी आहेत. त्यामुळे त्यांना व्यवहारज्ञान नाही, असे म्हणता येणार नाही. गंगापूर साखर कारखाना चालू करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले एवढे मात्र नक्की.सत्तेसाठी साखर कारखाना ताब्यात असावा हे सूत्र त्यामागे आहे. बंद कारखाना हा भाकड जनावराप्रमाणे असतो. त्याचा उपयोग नसतोच. उलट त्याचा सांभाळ करण्यासाठी पदरमोड करावी लागते. बंब हे दुसऱ्यांदा आमदार झाले आणि मराठा लॉबीमध्ये फूट पाडून त्यांनी नवीन समीकरण तयार केले. ही सत्ता टिकविण्यासाठी अशी सत्ता केंद्रे ताब्यात असणे आवश्यक असते. म्हणूनच बंद पडलेल्या अशा कारखान्याची निवडणूक लढणे हे प्रारंभी हास्यास्पद वाटत होते. त्यामुळेच हा मराठवाड्यात चर्चेचा विषय होता. दुष्काळी मराठवाड्यात २३ साखर कारखाने असले तरी त्यातील नफ्यात किती, हा प्रश्नच आहे आणि गेल्या काही वर्षांत तर जगभरातील साखर कारखानदारीच अडचणीत आली आहे. गंगापूरचा कारखाना हा तसा खूप जुना, १९५८ सालचा रघुनाथसेठ धूत यांनी स्थापन केलेला; पण लगेचच तो ब्रॅडी अँड कंपनीने खरेदी केला. पुढे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सहकार चळवळ सुरू झाली आणि त्या काळातील धडाडीचे नेते बाळासाहेब पवारांनी तो सहकारात आणला. १९६८-६९ साली ते अध्यक्ष असताना पहिला गळीत हंगाम झाला.गंगापूर कारखाना हा सर्वांत जुना. खासदार दिवंगत साहेबराव पाटील डोणगावकर यांचे वर्चस्व येथे सर्वाधिक काळ राहिले. अगदी परवाच्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील डोणगावकर यांचे सत्ताधारी पॅनल होते; पण अकार्यक्षम प्रशासन, दूरदृष्टीचा अभाव, गटातटाचे राजकारण आणि भ्रष्टाचार यामुळे डोणगावकरांना सभासदांनी सपशेल नाकारले. कारखाना बंद पडण्याच्या कारणांपैकी राजकारण हा सर्वांत मोठा भाग होता. बंद कारखाना आपल्या ताब्यात असावा यासाठी सारेच इरेला पेटले होते. सदाशिव गायकेंनी न्यायालयीन डावपेचात अडकविले, तर शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी आक्रमक धोरण स्वीकारले. ते एवढे की, एका सर्वसाधारण सभेतून डोणगावकरांना पळ काढावा लागला होता.कारखान्याभोवती तालुक्याचे राजकारण एवढे केंद्रिभूत झाले होते की, डोणगावकरविरोधकांनी या कारखान्याला ऊसच मिळू दिला नाही आणि गाळपाअभावी तो बंद पडला. डोणगावकरांना तो चालवता आला नाही आणि लोकांचा विश्वासही मिळवता आला नाही. कारखाना आज ४१ कोटी रुपये कर्जाच्या गाळात रुतलेला आहे. शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची प्रत्येकी दोन कोटी रुपयांची देणी आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार बंब यांनी कारखाना चालू करण्याचे आश्वासन दिले. सभासदांनी नव्या घोड्यावर पैसे लावतात, तसे बंब यांना कौल दिला. कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणावर नियंत्रण ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. म्हणूनच अध्यक्षपदाची सूत्रे त्यांनी स्वत:कडे ठेवली. कारखान्याच्या मालकीची साडेतीनशे एकर जमीन आहे आणि तिच्यावर बंब यांचा डोळा आहे असा प्रचारही झाला. हा आरोप-प्रत्यारोपांचा उडालेला धुराळा आता पावसासोबत खाली बसला; पण यातून एक गोष्ट स्पष्ट झाली. मराठवाड्यात पाणी नाही, जवळपास कायम दुष्काळी स्थिती आहे. भविष्याचा विचार करताना मराठवाड्यात उसाची लागवड करू नये, अशा मुद्यावर गंभीर चर्चा सुरू असताना बंद कारखान्याची निवडणूक राजकीय धुराळा उडविते, यातच सारे काही आले. राजकारणाचा एक डाव संपला आहे. आता बंब काय करतात एवढेच पाहायचे; कारण राजकारणाची लढाई जिंकण्यासाठी त्यांनी टांग्याच्या घोड्यावर मांड ठोकली आहे.