शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

आता नाही माघार; 'चांद्रयान' उडणार!... ISROच्या माजी अध्यक्षांचा लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 04:43 IST

भारताच्या ‘चांद्रयान २’ या महत्त्वाच्या मोहिमेचे प्रक्षेपण १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी केले जाणार होते.

- सुरेश नाईकभारताच्या ‘चांद्रयान २’ या महत्त्वाच्या मोहिमेचे प्रक्षेपण १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी केले जाणार होते. मात्र, प्रक्षेपणाच्या ५६ मिनिटे ंआधी ही मोहीम तांत्रिक कारणांमुळे स्थगित करण्यात आली. या मोहिमेत चांद्रयान २ हा उपग्रह जीएसएलव्ही मार्क ३ या भारतीय बनावटीच्या प्रक्षेपकाच्या साह्याने अवकाशात पाठविला जाणार आहे. या प्रक्षेपकाच्या ३ स्टेज आहेत. त्यातील शेवटच्या स्टेजमध्ये क्रायोजनिक इंजिन प्रज्वलित केले जाते. या इंजिनात लिक्विड हायड्रोजन व लिक्विड आॅक्सिजनच्या दोन टाक्या असतात. या टाक्यांमधील इंधन आणि आॅक्सोडायझर यांच्या प्रज्वलनामुळे अत्यंत गरम असे वायू तयार होतात. हे वायू इंजिनाच्या नळकांड्यातून वेगाने बाहेर पडल्याने प्रक्षेपकाला जोर मिळतो. त्याच्या साह्याने उपग्रह वर जाण्यास मदत होते. चांद्रयान मोहिमेच्या प्रक्षेपणाला ५६ मिनिटे बाकी असताना द्र्रव रसायनाचा भरणा केला गेला. त्यानंतर, त्याच्यात हेलियम गॅस भरला गेला. हा गॅस भरल्यानंतर टाकीला गळती असल्याचे लक्षात आले. योग्य वेळेत ही बाब लक्षात आल्यामुळे मोहीम स्थगित करण्यात आली.जीएसएलव्ही प्रक्षेपक आणि उपग्रह दोन्ही सुरक्षित आहेत. प्रक्षेपकात दुरुस्ती करून आपण पुन्हा उड्डाण करू शकतो. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी हेलियम गॅसच्या टाकीमधील गळतीची जागा अचूक शोधून काढली, ही चांगली बातमी आहे. भारतीय बनावटीचा जीएसएलव्ही मार्क ३ हा इस्रोचा सर्वांत शक्तिमान प्रक्षेपक आहे. या प्रक्षेपकाच्या जोरावर २०२२मध्ये ‘गगनयान’ मोहिमेंतर्गत पहिल्या भारतीय मानवाला अवकाशात पाठविले जाईल. पुढील वर्षी सूर्याच्या निरीक्षणासाठी ‘आदित्य यान’ याच प्रक्षेपकाच्या साह्याने सूर्याकडे पाठविण्यात येणार आहे. बुध ग्रहावर उपग्रह सोडण्यासाठी २०२३मध्ये याच रॉकेटचा उपयोग केला जाणार आहे. त्यामुळे जीएसएलव्ही मार्क ३ हा प्रक्षेपक अत्यंत महत्त्वाचा आणि त्याचे उड्डाण भरवशाचे असणे आवश्यक आहे.चांद्रयान २ हा उपग्रह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद उतरविला जाणार आहे.

विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर हा बग्गीसारखा रोबोट चंद्राच्या भूपृष्ठावर उतरविला जाईल. चंद्रावर हेलियम ३ या खनिजाचा शोध घेतला जाईल. चंद्रावर हेलियम ३ खनिज मिळाले, तर प्रदूषणमुक्त ऊर्जा तयार करण्यास त्याची मदत होणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे साठे बर्फाच्या स्वरूपात आढळण्याची शक्यता दाट आहे. त्यांचा शोध लागल्यास भविष्यकाळात तेथे मानवी वसाहत प्रस्थापित करण्याचा आणि वेधशाळा स्थापन करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे. आपल्याला चंद्रावरून मंगळावर जायच्या मोहिमा आखायला सोपे जाईल. कारण चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एकषष्ठांश आहे. त्यामुळे इंधनाचा खर्च कमी येईल.२००८मधील चांद्रयान १ मोहिमेच्या यशानंतर चांद्रयान २ मोहिमेचा प्रारूप आराखडा शास्त्रज्ञांनी तयार केला होता. लँडर आणि रोव्हर तयार करण्यासाठी रशिया आणि भारत यांच्यात करार झाला होता. लँडर आणि रोव्हर हे रशिया तयार करणार होता. मात्र, त्याच वेळी रशियाची मंगळ मोहीम सुरू होती. रशियाची ही मोहीम अपयशी ठरली. त्याची कारणे शोधायची होती. त्यामुळे रशियाने लँडर आणि रोव्हर तयार करून देण्यास असमर्थता दर्शविली. रशियाने या मोहिमेतून पाय काढल्याने ही अवघड जबाबदारी भारतीय शास्त्रज्ञांवर आली. चांद्रयान १ मोहिमेसाठी पीएसएलव्ही या प्रक्षेपकाचा वापर करण्यात आला होता. आतापर्यंत पीएसएलव्हीद्वारे ४०हून अधिक अवकाश मोहिमा यशस्वी करण्यात आल्या आहेत. मात्र, चांद्रयान २ या उपग्रहाचे वजन हे ३ हजार ८०० किलोग्रॅम आहे. पीएसएलव्हीची वजन वाहून नेण्याची क्षमता १ हजार ७०० किलोग्रॅम आहे. यामुळे चांद्रयान २ मोहिमेसाठी शक्तिशाली प्रक्षेपकाची गरज होती. आपले जीएसएलव्ही मार्क ३ रॉकेट आॅपरेशनल बनायला वेळ लागला, हे चांद्रयान मोहिमेला उशीर होण्याचे दुसरे कारण आहे. जीएसएलव्हीमधील इंधनाच्या टाकीला लागलेली गळती ही खूप मोठी किंवा गंभीर अडचण नाही. त्यामुळे त्यात दुरुस्ती करून, पुन्हा चांद्रयान २ मोहीम राबविली जाऊ शकते.
मोहिमेपूर्वीच्या रंगीत तालमीत कंपोनंट आणि इंजिन स्तरावर गळती असल्याचे आढळले होते. मोहिमेसाठी गळती असणारी मोटार बसविली जाणार नव्हती. त्याच प्रकारची दुसरी मोटर बसविण्यात येणार होती. द्रवरूप इंधन भरले, तेव्हा गळती नव्हती. हेलियम वायू भरताना ही गळती आढळली. द्रवरूप हायड्रोजन अत्यंत स्फोटक असतो. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविला जाणारा रोव्हर सौरऊर्जेवर काम करतो. चंद्रावरचा एक दिवस हा पृथ्वीच्या १४ ते १५ दिवसांचा मिळून होतो. तेवढ्याच दिवसांची रात्र चंद्रावर असते. चंद्राच्या एका दिवसाचा सूर्यप्रकाश वापरून रोव्हर आणि लँडर यांना काम करावे लागणार आहे. चंद्र आणि पृथ्वीचे अंतर कमी-अधिक होत असते. हे अंतर अधिक झाले, तर इंधनाचा जास्त वापर होतो. परिणामी, उपग्रहाचे आयुष्य कमी होते. आॅर्बिटरचे आयुष्य एक वर्षाचे आणि लँडर व रोव्हरचे आयुष्य प्रत्येकी १४ दिवसांचे आहे. प्रज्ञान हा रोव्हर चंद्रावरील मातीच्या नमुन्यांचे विश्लेषण करून आॅर्बिटरच्या साह्याने ही माहिती इस्रोकडे पाठविणार आहे.(माजी अध्यक्ष, इस्रो.)

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2