शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ही आहे कायरा.. भारतातली पहिली ‘व्हर्चुअल इन्फ्ल्यूएन्सर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 09:13 IST

ही ‘माणसे’ नाहीत, या आहेत संगणकाने बनवलेल्या माणसाच्या ‘व्हर्चुअल’ प्रतिमा! आता या ‘प्रतिमा’च माणसांनी काय खावे-प्यावे, खरेदी करावे हे सांगू लागल्या आहेत!

- साधना शंकर(लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी)

इन्स्टाग्रामवर तुम्ही कायराला फॉलो करता का? ती मुंबईची असून, स्वतःचे वर्णन ‘स्वप्नांचा पाठलाग करणारी, मॉडेल आणि प्रवासी’ असे करते. तिचे २.५ लाख फॉलोअर्स आहेत. देशातील पहिली आभासी इन्फ्लुएन्सर असल्याचा दावाही ती करते. समाजमाध्यमांच्या जगात तिच्यासारखे बरेच जण आहेत.  ही व्हर्चुअल व्यक्तिमत्त्वे त्यांचे अनुभव आपल्याशी शेअर करतात, संवाद साधतात आणि वस्तू खरेदी करायला सांगतात. एफ यू टी आर स्टुडिओज तर्फे हिमांशू गोयल यांनी या ‘कायरा’ची निर्मिती केली आहे. अमेरिकन टुरिस्टर, बडवाइजर आणि एमजी मोटर्स यांच्यासह अनेक ब्रॅन्डबरोबर कायराची व्यावसायिक भागीदारी  आहे. 

व्हर्चुअल इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? कोण असतात हे व्हर्चुअल इन्फ्लुएन्सर? - ती अर्थातच खरीखुरी माणसे नसतात. ॲनिमेटेड बार्बीप्रमाणे मनुष्यसदृश कुणी किंवा संगणकाने बनवलेल्या माणसांप्रमाणे दिसणाऱ्या आकृत्या असतात (सीजीआय - कम्प्युटर जनरेटेड इमेजरी). जगभर प्रसिद्ध पावलेले सीजीआय श्रेणीतील प्रतिमा-व्यक्तिमत्त्व म्हणजे लील मिकेला.  २०१६ साली ती लॉस एंजेल्समध्ये जन्माला आली. नायके, कॅल्विन क्लेन आणि सॅमसंगसारख्या ब्रांडशी भागीदारी करून तिने २.८ दशलक्ष फॉलोअर्स मिळवले. कोरियन ओ रोझी ऑगस्ट २०२० मध्ये विकसित करण्यात आली. तिने १०० पेक्षा जास्त प्रायोजकत्वाचे करार मिळाल्याची माहिती मिळते. तिला आता भावंडेही होऊ घातली आहेत. या सगळ्या संगणकाने निर्माण केलेल्या प्रतिमा आहेत. त्या प्रतिमा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर माणसाप्रमाणे वागता-बोलताना, गाता-नाचताना दिसतात.  त्यांची व्यक्तिमत्त्वे लक्ष्य गटाला आकर्षित करू शकतील अशा पद्धतीने ‘तयार’ केली जातात. हे डिजिटल अवतार पूर्णत:  काल्पनिक असतात. ते त्यांच्या प्रेक्षकांशी समाजमाध्यमातील पोस्ट, व्हिडीओ कॉमेन्टस आणि व्हर्चुअली अवतीर्ण होऊन संवाद साधतात.

खऱ्याखुऱ्या इन्फ्लुएन्सर्सपेक्षाही हे अवतार जास्त फायदेशीर ठरत असल्याचे निर्मात्यांच्या लक्षात आले आहे. व्हर्चुअल इन्फ्लूएन्सर्सची बाजारपेठ २०२८ सालापर्यंत २.८ अब्ज  ते ३.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होईल, असा अंदाज आहे. अधिकाधिक ब्रांड त्यांच्याकडे आकृष्ट होत आहेत. ब्रांड निर्मात्यांसाठी हे अवतार स्वस्त पडतात.  वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर वापरता येतात आणि कोणत्याही वेळी ब्रांडशी जोडता येतात.  शिवाय, हे व्हर्चुअल इन्फ्ल्यूएन्सर म्हातारे होत नाहीत, त्यांना विश्रांतीची गरज नसते, व्यक्तिगत आयुष्यात ते नको त्या भानगडीत सापडत नाहीत, नखरे करत नाहीत.हे व्हर्चुअल इन्फ्लुएन्सर्स आगेकूच करत असल्याने काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. संगणकाने निर्माण केलेल्या या ‘प्रतिमा’ काळजी वाटेल इतक्या ‘खऱ्या’ दिसू लागल्या आहेत. ओह रोझी या व्हर्चुअल इन्फ्लुएन्सरला मानवी स्त्रीचे तब्बल ८०० हावभाव हुबेहूब दाखवता येतात.   अत्याधुनिक होत चाललेल्या तंत्रज्ञानाबरोबर आता हे व्हर्चुअल इन्फ्लुएन्सर्स परस्परांशी संवाद साधू लागले आहेत. ते सोशल मीडियावरील पोस्टना प्रतिसाद देतात. प्रश्नोत्तरांच्या सत्रात सामील होतात.

हे अवतार आणि प्रत्यक्षातील माणसे यांच्यातील फरक ओळखणे दिवसेंदिवस कठीण होत असल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषत: जाहिरात क्षेत्राला ते जास्त सतावत आहेत. भारतात समाजमाध्यमांवरील इन्फ्ल्यूएन्सर्स तसेच वस्तू आणि सेवा ऑनलाइन विकणाऱ्या व्हर्चुअल अवतारांसाठी काही नियम जानेवारीमध्ये घालून देण्यात आले. ‘आम्ही जाहिरात करीत आहोत’ हे त्यांना सांगावे लागते. हे व्हर्चुअल इन्फ्लुएन्सर्स जे लोक तयार करतात त्यांच्यातील पूर्वग्रह माध्यमातून प्रसारित होण्याचा धोका संभवतो. हुबेहूब माणसासारखे देह आणि जीवनशैली यामुळे तरुण वापरकर्त्यांवर त्यांचा अधिक  प्रभाव पडण्याची शक्यता असते. डिजिटल माणसांची ही यादी वाढत जाईल... म्हणजे मग या क्षेत्रातील ‘खऱ्या’ माणसांना पूर्णपणे बाजूला केले जाईल काय?- या प्रश्नाचे उत्तर देणे सध्यातरी कठीण आहे. पण, माध्यमांमध्ये खऱ्याखुऱ्या माणसांबरोबर हे व्हर्चुअल अवतार जागा व्यापत आहेत.  कृत्रिम बुद्धिमत्तेशी माणसांचा लढा आत्ता कुठे सुरू झाला आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान