शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानसंपदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:03 IST

अन्न साधारणपणे दोन प्रकारचे असते.

प्रा. डॉ. संदीप ताटेवारआज व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, गॅजेट्स यांचा वापर करणारे समाजात मोठ्या प्रमाणात लोक आढळतात. काहीतर अक्षरश: त्याचे व्यसनाधीन झाले आहेत. याद्वारे आठवड्याचे सातही दिवस आणि २४ तास माहितीचा भडीमार आपल्यावर होत असतो. आपल्याला मिळणारी माहिती ही आपल्या आत्म्याचे अन्न असते. अन्न साधारणपणे दोन प्रकारचे असते. एक म्हणजे सात्विक अन्न जे आपल्या शरीराची ताकद वाढविते व दुसरे म्हणजे तामसिक अन्न जे आपली ताकद कमी करते. ज्या माहितीमुळे आपली सकारात्मकता वाढीस लागते, ती आपल्या आत्म्याला शक्तिशाली बनविते मात्र ज्या माहितीमुळे आपली नकारात्मकता वाढीस लागते, ती आपल्या आत्म्याला कमजोर बनविते. आपण आपल्या शरीराची ताकद वाढविण्याबाबत जागरुक असतो पण आत्म्याची ताकद वाढविण्याबाबत जागरुक नसतो. आपण एकदा माहिती वाचली की त्याचे मनात चिंतन चालू होते व ती आपल्या मनात शिरकाव करून आपल्या मनाचा भाग बनते मग आपल्याला त्याला मनापासून वेगळे करणे कठीण होते. म्हणूनच फक्त चांगली माहिती ग्रहण करणे अत्यावश्यक असते. एखाद्या भोजन समारंभासाठी आपण गेलो तर विविध जिन्नस आपल्यासाठी उपलब्ध असतात मात्र कोणते खायचे हे आपल्यावरच अवलंबून असते. तसेच उपलब्ध माहितीपैकी कोणती माहिती आपण वाचायची व वाचायची नाही हे आपल्या हातात असते. जी माहिती आपल्याशी संबंधित नसते व बरेचदा ज्या गोष्टीसाठी आपण काहीच करू शकत नाही अशी माहिती आपण वाचत गेलो की उगाचच विचारांची गर्दी आपल्या मनात निर्माण होत असते. आपण चांगली माहिती ग्रहण केली की आपले विचार प्रगल्भ होतात, आत्म्याची शक्ती वाढते व आपोआप चांगले कर्म उदयास येतात. नकारात्मक माहितीमुळे मनात उदासिनता, उद्विग्नता, वासना, क्रोध, इर्षा, मत्सर असे दुर्गुण जागृत होतात तर सकारात्मक माहितीमुळे प्रेम, आनंद, जिव्हाळा असे सद्गुण जागृत होतात. स्वामी विवेकानंद म्हणतात जर तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर ते आपल्या विचारामुळेच शक्य होत असते म्हणूनच चांगले विचार निर्माण करायचे असेल तर चांगलीच माहिती आपल्या मनाला भरवावी लागेल.त्यामुळे आपली आध्यात्मिक व भौतिक स्तरावर प्रगती होईल. यासाठीच ज्ञानसंपदा ही पवित्र असायला पाहिजे म्हणजे आपले अज्ञान, आसक्ती, दु:ख लोप पावतील व आपले दोष क्षीण होऊन आपण आत्मज्ञानाचा साधक बनू शकू !

टॅग्स :foodअन्नspiritualअध्यात्मिक