शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

पतंगबाजी अन् ओऽऽऽ काट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 05:49 IST

रोम जळत असताना निरो फिडल वाजवित होता आणि इकडे पोटनिवडणुकांत भाजपाचे पानीपत होत असताना मोदीसाहेब इंडोनेशियात पतंग उडवित होते.

रोम जळत असताना निरो फिडल वाजवित होता आणि इकडे पोटनिवडणुकांत भाजपाचे पानीपत होत असताना मोदीसाहेब इंडोनेशियात पतंग उडवित होते. मोदीजी तसे मोठे पतंगबाज. गेल्या चार वर्षांत त्यांनी आपल्या सर्व विरोधकांची ‘ओ ऽऽऽ काट’ करून २१ राज्यात सत्ता स्थापन केली. त्यांची ही कीर्ती निश्चितच सातासमुद्रापलीकडे गेली. तशी ती इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्या कानावरही आली. मोदीजी त्या देशाचा दौरा करणारच होते. मग जोकोंनी त्यांना फोन लावला....जोको : भाईजी... आपण येत आहात ना...?भाईजी (अर्थात मोदीजी) : हे काय विचारणे झाले! निघतोच आहे मी...!जोको : मी ऐकलेयं... तुम्ही मोठे पतंगबाज आहात. विरोधी पक्षांच्या पतंगा कापण्यात एक्स्पर्ट आहात!भाईजी : यु आर राईट...! पण माझ्या दौऱ्याचा आणि पतंगाचा संबंध काय?जोको : नाही म्हणजे...आमच्या येथे पतंग महोत्सव आहे. योगायोगाने तुमच्यासारखा एक महान पतंगबाज येतो आहे. म्हटले मज्जा येईल.भाईजी : अस्स् होय...! मग मी अमितभार्इंनाही घेऊन येतो...जोको : अमितभाई...! तेही एक्स्पर्ट आहेत यातले?भाईजी : बिल्कुल...! मीच शिकवलं त्यांना. (मग...‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’च्या थाटात भाईजी म्हणाले, माझ्या हाती पतंगाची दोरी आणि अमितजीच्या हाती चक्री. मग ही जोडी भाजपाला उद्धारी’). जोकोंना हा जोक वाटला पण त्यांना तो समजला नाही.एव्हाना भाईजींचीच कळी खुलली होती. आपले पतंगशास्त्रातील बारकावे ते जोकोंना समजावून सांगू लागले.भाईजी : त्याचे काय आहे, जोकोजी...! पतंगाचा पेच टाकल्यावर लोक साधारणत: ढील देतात. पण माझी खासियत आहे... मी कधीच ढील देत नाही.... नेहमीच ताणून धरतो. आणि अमितजी तर लपेटण्यात तरबेज आहेत. अशी काही चक्री फिरवतात की, समोरचा चक्रावून जातो. गोवा, मेघालय, मणिपूरचेच उदाहरण घ्या...तेथे आमची ‘कटली’ होती पण या अमितभार्इंनी बरोबर पेच लढवला. म्हणून म्हणतो, आम्ही दोघे मैदानात असलो की बाकी सर्व ‘ओऽऽऽकाट’जोको : ऽऽऽअरेऽऽऽ बापरे...! मग अमितभार्इंचे राहूच द्या...! आम्हाला इथं काटा-काटी करायची नाही.आणि हो...येताना काही ‘मेड इंडिया’ पतंगा आणि मांजा घेऊन या!भाईजी : पतंग ठीक आहे, पण मांजा ‘मेड इन चायना’ आणला तर चालेल ना!जोको : (आश्चर्याने) तुमच्याकडे तर चिनी मांज्यावर बंदी आहे! आणि तसंही चीनशी तुमचं वाकडं आहे. मग या चिनी मालाचं तुम्हीच मार्केटिंग कसं करता?भाईजी : जोकोभाई तस वाकडं तर बºयाच जणांशी आहे. पण बोलाव लागतं तसे. केलंच पाहिजे असे थोडेच आहे. आता आम्ही पाकिस्तानशी ‘टक्कर’ घेण्याची भाषा करतो आणि ‘शक्कर’ मात्र आणतो त्यांचीच. ग्लोबल डिप्लोमसी म्हणतात याला.बरं जाऊ द्या! चिनी मांज्या तर तुमच्याकडेही मिळेल. मी आपला पतंग घेऊन येतो.पोटनिवडणुकीत विरोधकांच्या पतंगा कशा काटतो याचे प्रात्याक्षिक जोकोंना दाखविण्यासाठी भार्इंनी मग १५ पतंगा जाताना सोबत घेतल्या. यातल्या चार थोड्या मोठ्या (बहुतेक लोकसभेच्या) आणि ११ लहान (अर्थात विधानसभेच्या) असाव्यात. आता, इंडोनेशियात प्रात्याक्षिकांत काय झाले ते माहीत नाही पण येताना भाईजींजवळ केवळ दोनच पतंग उरल्या होत्या. बाकी १३ ओऽऽऽकाट...!- दिलीप तिखिले