शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

‘ख्वाब अपने हुए दुनिया के हवाले’

By admin | Updated: July 9, 2015 22:19 IST

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उर्दू गझलकार बशर नवाझ साहेब यांचे गुरुवारी औरंगाबाद येथे निधन झाले.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उर्दू गझलकार बशर नवाझ साहेब यांचे गुरुवारी औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या काव्यप्रतिभेचा साक्षात्कार घडवून देण्यासाठी लोकमतच्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकात प्रदीप निफाडकर यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखाचा हा आदरांजलीपर संपादित अंश ----------------------औरंगाबाद म्हणजे उर्दू साहित्याची मक्का असे म्हटले तर वावगे ठरू नये. भडकल दरवाजाजवळ जुन्या काळातल्या दुमजली घरात बशरसाहेबांचा निवास. भूपेंद्र यांनी बाजार चित्रपटात गायिलेली कविता ‘करोगे याद तो याद बहोत आओगे’ ही त्यांची ओळख ठरली; पण त्या पलीकडे बशरसाहेब अजून खूप होते. सर्वसाधारण उर्दू गझलकार गाऊन गझला म्हणतात. कधी कधी हे ऐकवणे ओरडण्याची जागा घेते व ते शायरलाही कळत नाही. बशरसाहेबांचं तसं नव्हतं. ते तहदमध्ये (सरळ वाचल्यासारखे) ऐकवीत, तरन्नुम (गाऊन) मध्ये नाही. पण शब्द इतके चपखल व अर्थवाही की, ऐकणारा मुग्ध झालाच पाहिजे. सत्तरी पार केल्यानंतरही बशरसाहेबांचे न थकता मैफिली रंगविणे सुरुच होते. जेमतेम इंटर पास केलेल्या बशरसाहेबांनी पहिली गझल वयाच्या १३-१४ व्या वर्षी लिहिली आणि अलिगढला आता प्राध्यापक असलेल्या याकूब उस्मानी या मित्राला दाखविली. त्याने आश्चर्र्य व्यक्त केले. कारण साधारणत: पहिली दुसरी गझल वृत्तात चुकते; पण बशर यांची गझल वृत्तात जराही चुकली नव्हती.जब शब के भयानक सन्नाटे मेंआलम सारा सोता हैए ऐशो-तलब के मालिक सुन,एक दर्द का मारा रोता है।औरंगाबादच्याच एका मुशायऱ्यात बशरसाहेबांनी आपली ही पहिली गझल सादर केली होती.ये एहतमामे-चरागाँ बजा सही लेकिन सहर तो हो नही सकती दिये जलाने सेहा शेर स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर गेला. तेव्हाची प्रसिद्ध मासिके, साप्ताहिके पत्ता शोधत बशर यांच्या गझला मागवून घेऊ लागली. बशर यांना मुशायऱ्याची निमंत्रणे येऊ लागली. लखनौ, हैदराबाद, दिल्ली... रसिकांचे एकही गाव सुटले नाही. सर्वत्र बशर नवाज नावाजू लागले.बशरसाहेबांना डाव्या चळवळीने भुरळ घातली. रुमानी (रोमँटिक) लिहिणारे बशरसाहेब तरक्कीपसंद (सुधारणावादी) शायरी लिहू लागले. रूमानी व तरक्कीपसंदचा सुंदर गोफ त्यांनी विणला. स्वत:च्या अनुभवांना, स्वत:च्या वाचनाला बशरसाहेबांनी गुरू केले. शायरीत सर्व गोष्टी स्वच्छ आल्या पाहिजेत. सरलता हवी, सहजता हवी, वास्तवता सौंदर्य असेल तर ती सोपेपणाने सांगू शकू, असे एकेक धडे ते गिरवू लागले. डाव्या चळवळीत काम केले; पण पदांची लालसा बाळगली नाही. आपल्या शायरीच्या राज्यात मस्त फकीर! कधी कुणी ‘बाजार’साठी ‘करोगे याद’ नज्म घेतली, तर कधी कुणी ‘इश्क चाँदी है, इश्क सोना है, है जवानी तो इश्क होना है’ किंवा ‘जिये तो जिये कैसे बिन आपके’ असे बशरसाहेबांच्या शायरीचे तुकडे घेऊन गाणे रचले. साहेब स्वत:हून कुणाच्या मागे फिरले नाहीत; पण ते सांगण्यातही मस्ती नव्हती. लतादिदींनीच नव्हे, तर गुलाम अलीसारख्या गझल गायकानेही-जब तेरी राहसे होकर गुजरेआँखोसे कितने मंजर गुजरेउम्र यूँ गुजरी है, जैसे सरसेसनसनाता हुआ पत्थर गुजरेबशर साहेबांच्या अशा गझलांनी आपला अल्बम सजविला आहे.जुल्फे खुली तो मस्त घटा घीर के छा गई आँचल उडा तो एक कयामतसी आ गईअशा गझला मेहंदी हसन यांनी गायल्या. ‘स्वत:ला पूर्णपणे व्यक्त करता येईल, अशी कविता लिहिण्याची अखेरची इच्छा आहे,’ असे सांगतानाच पुनर्जन्म मानण्याच्या गोष्टी होतात; पण स्वत:ला पुनर्जन्म मिळणार नाही व मिळाला तर आपण घेणार नाही हे ठामपणे सांगणे असते आणि त्याचे कारण विचाराल तर ‘फिर आके ये फंक्शन क्यूँ करे’ असे साधे मिश्किल उत्तर असते.ख्वाब अपने हुए दुनिया के हवाले कितने खो गए इन्ही अंधेरो मे उजाले कितनेयाच अंधारात अनेक प्रकाशमान गोष्टी हरवल्या. अनेक स्वप्ने जगाच्या हवाली केली. त्या प्रवासासाठी... जो आता अखेरचा टप्पा पार करुन पल्याड गेला आहे.