शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

जरा जपूनच बोला..

By admin | Updated: June 9, 2014 09:33 IST

जी-७ राष्ट्रांची शिखर परिषद ब्रुसेल्स या बेल्जियमच्या राजधानीत भरली असताना वॉशिंग्टनमधून हिलरी क्लिंटन आणि मॉस्कोतून व्लादिमीर पुतीन यांच्यातील शीतयुद्धाने भडका घेतला आहे.

जी-७ राष्ट्रांची शिखर परिषद ब्रुसेल्स या बेल्जियमच्या राजधानीत भरली असताना (या परिषदेतून रशियाची हकालपट्टी झाल्यामुळे तिच्या सदस्य राष्ट्रांची संख्या ८ वरून ७ वर आली आहे.) वॉशिंग्टनमधून हिलरी क्लिंटन आणि मॉस्कोतून व्लादिमीर पुतीन यांच्यातील शीतयुद्धाने भडका घेतला आहे. हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री आहेत. शिवाय त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला नागरिकही राहिल्या आहेत. बराक ओबामा यांच्या मते अमेरिकेच्या इतिहासात परराष्ट्रमंत्री म्हणून हिलरींएवढे यश दुसर्‍या कोणालाही मिळविता आले नाही. हिलरींचा प्रवास थांबला मात्र नाही. २0१६ मध्ये येऊ घातलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत त्या डेमॉक्रेटिक पक्षाच्या उमेदवार होण्याची शक्यता मोठी आहे आणि त्यांना आव्हान देऊ शकेल, असा प्रतिस्पर्धी त्या पक्षात अद्याप पुढे आल्याचे दिसले नाही. रिपब्लिकन नेतृत्वही बरेचसे दिशाहीन व दुबळे आहे. माजी परराष्ट्रमंत्री कोंडोलिसा राईस या त्या पक्षाची उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात गुंतलेल्या दिसत आहेत. त्यांचे प्रयत्न यशस्वी झाल्यास पुढली निवडणूक हिलरी विरुद्ध कोंडोलिसा अशी होईल. अर्थात, तिला अजून बराच काळ आहे. सध्याचा वाद हिलरी आणि पुतीन यांच्यातला आहे. पुतीन यांनी युक्रेनचा क्रिमिया हा प्रांत त्या देशापासून तोडून रशियाला जोडून घेतल्याचा सार्‍या युरोपात व अमेरिकेत संताप आहे. पुतीन हे अघोरी महत्त्वाकांक्षेने पछाडलेले आधुनिक हिटलर आहेत, अशी टीका त्यासाठी त्यांच्यावर होत आहे. हिलरी क्लिंटन यांनी एका जाहीर सभेत त्यांचा हिटलर असा उल्लेख केला आहे व तो त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्या घटनेला बरेच दिवस लोटले असले, तरी ती जखम ताजी आहे आणि हिलरींनी पुतीन यांच्यावर त्यांच्या महत्त्वाकांक्षेबाबत केलेल्या नव्या आरोपामुळे ती नव्याने वाहू लागली आहे. एवढे दिवस हिलरींची टीका मुकाट्याने ऐकून घेतल्यानंतर पुतीन यांनाही आता वाचा फुटली आहे आणि पहिल्याच दमात त्या पहिलवान पुढार्‍याने ‘बायकांच्या तोंडी लागणे नको,’ असे हिलरींना ऐकविले आहे. परराष्ट्रमंत्री असताना हिलरीबाई चांगले बोलायच्या, चांगलेच वागायच्या आणि त्यांचे संबंधही आपल्याशी चांगले होते, असे सांगून पुतीन यांनी हिलरी यांच्यात अलीकडे आलेल्या आक्रमकतेविषयी आपला आक्षेप असा नोंदविला आहे. तो नोंदविताना बायका तशाही दुबळ्या असल्याने मी त्यांच्याशी फार वाद घालत नाही, असे पुरुषी विधानही त्यांनी उच्चारले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातला वाद एकदम स्त्री-पुरुष संबंधातील विवादावर असा उतरला आहे. हिलरी क्लिंटन या गप्प बसणार्‍या बाई नाहीत. पुतीन यांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, की दुबळे असणे हे स्त्रीचे सार्मथ्यच आहे. त्यामुळे पुतीन यांची टीका मी मनावर घेत नाही. हिलरी क्लिंटन या दुबळ्या नाहीत. त्यांचे चरित्र व आजवरचे राजकीय जीवन ठाऊक असणार्‍यांना त्यांच्या सार्मथ्यशाली मनाची व जीवनाची चांगली कल्पना आहे. त्या पुतीन यांना ओळखून आहेत आणि त्यांच्याशी यापूर्वी त्यांचे दोन हात झडलेही आहेत. पुतीन यांचे स्त्रीविषयक मत सगळ्याच स्त्रियांनी मात्र हिलरींसारखे घेतले नाही. त्यांच्या मनातील स्त्री-पुरुष भेद व त्यातील विषमता ही स्त्रियांना कमालीची संतापजनक व निषेधार्ह वाटली आहे. जी-७ राष्ट्रांच्या परिषदेला फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्क्वा होलंड हे हजर आहेत. त्यांच्यासोबत त्यांची नवी मैत्रीण व्हॅलेरी ट्रायरविलर हीदेखील त्या परिषदेला हजर आहे. पुतीन या परिषदेला सदस्य म्हणून हजर राहिले असते, तर कोणत्या ना कोणत्या प्रसंगी या व्हॅलेरीला त्यांच्याशी हस्तांदोलन करावे लागले असते. मात्र, आताचे पुतीन यांचे स्त्रीविषयक उद्गार ऐकल्यानंतर ही व्हॅलेरी म्हणाली, बरे झाले त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याची आपत्ती माझ्यावर आली नाही. स्त्रियांच्या सबलीकरणाच्या चळवळी सुरू झाल्यापासून सार्‍या जगात स्त्रियांविषयी जपून बोलणे व जपून व्यवहार करणे ही सगळ्या पुरुष जमातीची जबाबदारी झाली आहे. या जबाबदारीपासून राज्यकर्तेही मुक्त नाहीत. रशियाचे अध्यक्ष हे त्या देशाचे सर्वाधिकारी तर आहेतच, शिवाय उत्तर आशियातील एक श्रेष्ठ मुष्टियोद्धे म्हणूनही ते ख्यातनाम आहेत. याउलट हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याच्या तयारीत गुंतलेल्या सामान्य गृहिणी आहेत. तरीही त्यांनी व त्यांच्या चाहत्या स्त्री-पुरुषांनी पुतीन यांचा शब्द खाली पडू तर दिला नाहीच उलट तो वरचेवर टोलवत त्यांच्याशी जगभरच्या स्त्रियांच्या वतीने एका नव्या लढाईला सुरुवात केली आहे. तात्पर्य, स्त्रियांविषयी चांगले बोला.