शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 04:35 IST

सामाजिक शांतता राहण्यासाठी न्यायालयांची नितांत आवश्यकता आहे; पण जर न्याय मिळण्यासाठी अक्षम्य विलंब होत असेल तर ती जरूर चिंतेची बाब आहे.

अ‍ॅड. नितीन देशपांडेसामाजिक शांतता राहण्यासाठी न्यायालयांची नितांत आवश्यकता आहे; पण जर न्याय मिळण्यासाठी अक्षम्य विलंब होत असेल तर ती जरूर चिंतेची बाब आहे. आपल्या देशातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या छाती दडपणारी आहे. अतिरेक्यांचा हल्ला, पूर, भूकंप हे जसे गंभीर प्रश्न आहेत, तसेच न्यायालयातील विलंब ही बाह्यत्कारी वेदना न देणारी; पण रक्तातील वाढलेल्या साखरेप्रमाणे त्रासदायक ठरणारी समस्या आहे.न्यायालयीन विलंब या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात देणे अवघड आहे. ही एक विलक्षण गुंतागुंतीची समस्या आहे. वकिलांनी तारखा मागू नयेत, हा एक सोईस्कररीत्या पुढे केला जाणारा उपाय; पण यात तथ्य नाही. कारण एखाद्या दिवशी जरी काही प्रमाणात तारखा पडल्या म्हणून न्यायाधीश महोदय काही रिकामे बसत नाहीत. त्यांच्या पुढे इतर खटले चालतात. न्यायाधीशांनी नेमून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त बसून हा प्रश्न सुटेल का? याबाबत दोन्ही बाजूने बोलता येईल.प्रशांत भूषण यांनी इंदिरा गांधी वि. राजनारायण या खटल्यावर लिहिलेल्या ‘द केस दॅट शूक इंडिया’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत न्या. हिदायतुल्ला म्हणतात, ‘निवडणुकीच्या खटल्यात दोन्ही पक्षांनी शपथेवर सांगितलेल्या ‘असत्या’मधून बिचाऱ्या न्यायधीशाला सत्य शोधावे लागते.’ माझ्या मते बºयाच खटल्याविषयी असे म्हणता येईल. आपण उच्च संस्कृतीची परंपरा असणारे खोटारडे आणि ढोंगी लोक आहोत. ज्या समाजात साधू-संन्याशी गाद्या गिरद्यावर लोळतात आणि स्त्रीलंपटगिरी करताना सापडतात, शासकीय कारभारात हस्तक्षेप करतात, शिक्षण हा धंदा मानला जातो, असा समाज न्यायालयात प्रामाणिकपणे कसा वागेल? साधा समन्स बजावताना वादाची त्रेधातिरपीट उडते, कारण बजावणारी यंत्रणा आणि प्रतिवादी यांचा अक्षम्य अप्रामाणिकपणा. मुंबई उच्च न्यायालयातील एक न्यायमूर्ती म्हणाले, ते रजिस्टर्ड पत्र मिळाल्याच्या पावतीवर किंवा त्यावरील शेºयावर विश्वास ठेवेनासे झाले आहेत. कारण एकदा पोस्टाने ‘मृत’ असा शेरा मारलेली व्यक्ती त्यांच्या न्यायालयात प्रगट झाली होती.आपल्या न्यायालयात केवळ त्रास देण्याच्या हेतूने दाखल केलेल्या खटल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात छळवणूक कायद्याखालील महिलांनी लावलेले खटले असोत की राजकीय लाथाळ्या असो, अशा खोट्या खटल्यांचा ताण न्यायालयावर असतो.अप्रामाणिक पक्षकारांना जरब बसविणारा कायदा करून खोट्या खटल्यांना आळा घातला, तर बºयाच प्रमाणावर खटले कमी होतील; पण तसे कायदे करण्याची मानसिकता पाहिजे कारण न्यायालयाचे दरवाजे ठोठावणारे लोकही काही ‘व्होट बँक’ नव्हे.