शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

जो जिता वही सिकंदर...

By admin | Updated: February 3, 2017 06:54 IST

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील पारंपरिक बालेकिल्ले केव्हाच ढासळले आहेत. दिग्गजांच्या या जिल्ह्यात निवडणुकीनंतरच्या आघाड्याच राजकारण स्थिर करू शकतात. कारण ‘जो जिता वही सिकंदर...’

- राजा मानेसोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील पारंपरिक बालेकिल्ले केव्हाच ढासळले आहेत. दिग्गजांच्या या जिल्ह्यात निवडणुकीनंतरच्या आघाड्याच राजकारण स्थिर करू शकतात. कारण ‘जो जिता वही सिकंदर...’राजकारणात विजयाच्या व्याख्या काळानुसार बदलत राहतात. बदलाचे हे रंग मात्र आता विद्युतगती घेऊ लागले आहेत. एका जमान्यात गांधीवादी नेते स्व. बाळासाहेब भारदे काँग्रेसजनांचे कान धरण्यासाठी ‘काँग्रेसमध्ये निष्ठेपासून निसटलेल्यांची संख्या वाढत आहे’ असे म्हणायचे. त्यांच्या त्या उद्गाराची चर्चा खूप गांभीर्याने घेतली जायची. आज मात्र काळ बदलला आहे. राजकारणात काहीही गांभीर्याने घ्यायचे नसते, जणू असाच अलिखित नियम बनला आहे. त्याच कारणाने अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि मुंबईपासून चावडीपर्यंत निष्ठा हा शब्द तकलादू आणि कालानुरूप रंग धारण करणारा ठरतो आहे. त्याच कारणाने कोणी, कधी, का आणि कुठल्या पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घ्यावा याचे मापदंड उरलेले नाहीत. या वातावरणाला एका जमान्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांचा बालेकिल्ला म्हणविला गेलेला सोलापूर जिल्हा अपवाद कसा राहणार? याचा प्रत्यय प्रत्येक निवडणुकीत येऊ लागला आहे. लोकशाहीत कोणत्या पक्षाला आपले मत द्यावे; अथवा कोणत्या विचाराला सत्तेवर बसवावे हे सर्वस्वी लोकांचा अधिकार आहे. या अधिकाराचे माहात्म्य प्रत्येक मतदाराला कळते हीदेखील आपल्या सर्वांची समजूत आहे. २०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनी प्रत्येक जिल्ह्याची राजकीय ठेवण आणि चेहराच बदलून टाकला. तो बदल होताना नेते आणि कार्यकर्ते यांच्या दृष्टिकोनातही कमालीचा बदल घडवून गेला. त्याच बदलाची छाया सोलापूर जिल्ह्यात त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत झाल्याचे दिसून आली. स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादी व काँग्रेसचे मजबूत संख्याबळ असूनही राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांचा पराभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार व भाजपाचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे मित्र प्रशांत परिचारक यांनी सहज केला. कागदावरचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ भुईसपाट झाले. आपली बारामती आपल्या कन्या सुप्रिया यांच्याकडे सोपवून शरद पवारांना आपण स्वत: सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातून लोकसभेत जावे असे त्यांना हक्काने वाटावे, एवढे त्यांचे सोलापूर जिल्ह्यावर प्रेम ! देशातील अनेक मानाच्या पदांवर विराजमान होऊन सोलापूरची ‘ओळख’ ठरलेले सुशीलकुमार शिंदे, विधिमंडळात ५० वर्षांहून अधिक काळ सदस्य म्हणून राहण्याचा जागतिक विक्रम नोंदविणारे शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख, देशाच्या राजकारणात कॉम्रेड म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख होतो ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्तर अशी दिग्गजांची नामावली लाभलेल्या जिल्ह्यातील सध्याच्या राजकारणाचे रंग मात्र वेगळेच दिसताहेत. मावळती जिल्हा परिषद व महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या ताब्यात होती. आता तो ताबा राखणे मुश्कील बनलेले आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा परिषदेची मोट बांधण्यात पुढाकार घेतला आहे. कुणी संधीसाठी, कुणी मोहिते-पाटील घराण्याला विरोध म्हणून तर कुणी राष्ट्रवादी पक्षाला संपविण्यासाठी महाआघाडीच्या प्रयत्नाला लागला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात या प्रयत्नाला अनुकूलता दिसते. इकडे स्मार्ट सिटी सोलापूरची महापालिका ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख गळ लावून बसले आहेत. महापालिकेच्या सत्ताकारणाचा तगडा अनुभव असलेल्या स्व. विष्णुपंत कोठे यांचे वारसदार महेश कोठे आपल्या सैन्यासह शिवसेनेत दाखल झाले आहेत. ‘किमान २५ जागा मिळवीन, नाहीतर राजकारण सोडेन’ अशी भीष्मप्रतिज्ञा करत त्यांनी सेनेचे शिवबंधन स्वीकारले. त्यामुळे काँग्रेसची पारंपरिक मते आणि सुशीलकुमार व आ. प्रणिती शिंदे यांचे राजकीय बळ या भांडवलावर काँग्रेसला लढावे लागणार आहे. या सर्व लढतींमध्ये ‘एमआयएम’ फॅक्टरही रंग भरणार आहे. भाजपचा ‘इनकमिंग रेट’ चांगला राहावा यासाठी मुख्यमंत्री व सुभाष देशमुख प्रयत्नशील दिसतात. एकूणच काहीही असलेतरी शेवटी आघाड्याच राजकारण स्थिर करणार, कारण ‘जो जिता वही