शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जेटलींच्या बजेटला १० पैकी ९ गुण

By admin | Updated: February 2, 2017 00:39 IST

या अर्थसंकल्पाला मी १० पैकी ९ गुण देईल. जेम्स बॉण्डच्या धर्तीवर नवा निवडणूक बॉण्ड आणला आहे. देशातील गत ७० वर्षांच्या राजकीय इतिहासात प्रथमच मोठ्या सुधारणा घडवून

- खा. राजकुमार धूत या अर्थसंकल्पाला मी १० पैकी ९ गुण देईल. जेम्स बॉण्डच्या धर्तीवर नवा निवडणूक बॉण्ड आणला आहे. देशातील गत ७० वर्षांच्या राजकीय इतिहासात प्रथमच मोठ्या सुधारणा घडवून आणल्या आहेत. भारताला इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे ‘ग्लोबल हब’ बनविण्यासाठी पावले उचलली जात आहेत. फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड (एफआयपीबी) रद्द करण्यात आले आहे, ही एक मोठी आर्थिक सुधारणा आहे. भीम अ‍ॅपवरील कॅश बॅक स्कीम आणि तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांवरील कॅशची बंदी या स्वागतार्ह घोषणा आहेत. कें्रद्रीय अर्थसंकल्प अतिशय संतुलित आहे. समाजातील आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्वांचे हित लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. देशाच्या डिजिटायझेशनला यात प्रोत्साहन देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पाला मी १० पैकी ९ गुण देईल. कृषी क्षेत्र, लहान कर भरणारे, लघु व मध्यम उद्योजक यांना प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प आहे. ग्रामीण भागाच्या विद्युतीकरणालाही यात प्राधान्य देण्यात आले आहे.अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जेम्स बॉण्डच्या धर्तीवर नवा निवडणूक बॉण्ड आणला आहे. देशातील गत ७० वर्षांच्या राजकीय इतिहासात प्रथमच मोठ्या सुधारणा घडवून आणल्या आहेत. राजकीय पक्षाला दिल्या जाणाऱ्या निधीत यामुळे अधिक पारदर्शकता येणार आहे. घोषणांचे स्वागत पायाभूत सुविधांसाठी ३.९ लाख कोटींचा खर्च करण्यात येत आहे, तर बँकांचे कमी होणारे व्याजदर अर्थव्यवस्थेसाठी मोठा आधार ठरणार आहेत. लघु व मध्यम उद्योगांना दिला जाणारा के्रडिट सपोर्ट आणि कॉर्पोरेट टॅक्समध्ये होणारी कपात स्वागतार्ह आहे. ज्या कंपन्यांची उलाढाल ५० कोटी रुपयांपर्यंत आहे, अशा कंपन्यांना करात सवलत मिळणार आहे. एकूण कंपन्यांपैकी ९६ टक्के कंपन्यांचा या वर्गवारीत समावेश आहे. भारताला इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे ‘ग्लोबल हब’ बनविण्यासाठी पावले उचलली जात आहेत. तसेच, विशेष प्रोत्साहन पॅकेज स्कीमच्या माध्यमातून देशाची एकूणच आर्थिक स्थिती उंचावणार आहे. समाजाच्या खालच्या स्तरावरही या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहेत. फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड (एफआयपीबी) रद्द करण्यात आले आहे, ही एक मोठी आर्थिक सुधारणा आहे. विदेशी गुंतवणुकीबाबतचे हे एक सकारात्मक पाऊल आहे. शेती आणि शेतकऱ्यांसाठीही प्रोत्साहन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे ६० दिवसांपर्यंतचे व्याज माफ करण्यात आले आहे. हे स्वागतार्ह पाऊल आहे. २०१८पर्यंत शंभर टक्के गावात वीज पोहोचविण्याचे उद्दिष्टही कौतुकास्पद आहे. बांधकाम क्षेत्रात ‘कार्पेट एरिया’ची बदललेली व्याख्या या क्षेत्राला साह्यभूत ठरणार आहे.रेल्वेने सुरक्षा आणि अन्य कामांसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. ई-रेल्वे तिकिटासाठी सेवाकर माफ करण्यात आला आहे. भीम अ‍ॅपवरील कॅश बॅक स्कीम आणि तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांवरील कॅशची बंदी या स्वागतार्ह घोषणा आहेत. पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील टॅक्स पाच टक्क्यांनी कमी करून आता पाच टक्केच ठेवण्यात आला आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

(लेखक व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक आणि ‘असोचेम’चे माजी अध्यक्ष आहेत.)