शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

इवल्याशा बुद्धीचा सांगकाम्या..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 05:15 IST

प्लास्टिक बंदीसाठी आपले अभिनंदन. आपण पुतण्याच्या बोलण्याचा काकांना का राग यावा असा जो थेट आपल्या वाघाचा पंजा मारला ते चांगले केले. मातोश्रीवर आपली कॉलर टाईट झा

प्रिय भाई,प्लास्टिक बंदीसाठी आपले अभिनंदन. आपण पुतण्याच्या बोलण्याचा काकांना का राग यावा असा जो थेट आपल्या वाघाचा पंजा मारला ते चांगले केले. मातोश्रीवर आपली कॉलर टाईट झाली असेल. नोटाबंदीसारखा तयारी न करता तुम्ही हा निर्णय घेतला नाही, त्यासाठी बराच विचार केला, असे सांगून आपण थेट दिल्लीला हात घातला! क्या बात है... कुणाला काय म्हणायचे ते म्हणू दे, पण तुम्ही विचार करून निर्णय घेतला. आता मला सांगा, रामदेवबाबा एवढा मोठा माणूस. त्यांच्याकडचे धान्य प्लास्टिक बॅगमध्ये विकले तरी त्याचे महत्त्व वेगळे आहे. त्यावर कशी बंदी आणणार? उगाच बाबांचे भक्त नाराज झाले तर आपल्या साहेबांचे स्वतंत्र लढण्याचे स्वप्न अडचणीत येईल. त्या मीडियावाल्यांना काय लागते बोलायला. चिवडे, चिप्स बनविणाऱ्या बड्या कंपन्या दोन दोन वर्षांचे पॅकिंगचे प्लास्टिक बनवून ठेवतात. त्यांचे निवडणुकीच्या तोंडावर नुकसान कसे करायचे? असेही ते छोटे व्यापारी, उद्योजक भाजपावाल्यांनाच साथ देतात. त्यामुळे त्यांना थोडे फटके बसले तर काही बिघडत नाही. उलट तुमच्या या निर्णयामुळे सगळ्या बड्या कंपन्यांमध्ये आपल्याला युनियन स्थापन करण्याची आयती संधी मिळालीय. आपला हा प्लॅन अजून भाजपावाल्यांच्या लक्षात आला नाही. भाजपाने नोटाबंदी केली त्यात प्रॉब्लेम, कर्जमाफी केली त्यात प्रॉब्लेम, आपण प्लास्टिक बंदी केली त्यात प्रॉब्लेम नाही म्हणून हा जळफळाट आहे. निवडणुका लढवायच्या तर आपल्या पक्षाला निवडणूक निधी याच बड्या कंपन्यांकडून घ्यावा लागणार ना. मग त्यांना थोडी सवलत दिली तर कुठे बिघडले? भाई, सरकार भेदभाव करू शकत नाही असे पेपरवाले म्हणत होते. त्यांना काय लागते बोलायला. मंत्री म्हणजे सरकार, आपण ठरवू तसेच होणार. मागे घडलेला किस्सा आठवतो की नाही भाई... पर्यावरण विभागाच्या सुनावण्या कुणी लावायच्या हा विषय निघाला होता. पर्यावरण विभागाकडे लोक तारीख, वार, वेळ देऊन तक्रार दाखल करतात. त्याच क्रमानुसारच सुनावण्या लावायच्या असा कायदा असल्याचे एक सचिव सांगत होते आपल्याला. त्यावर आपण थेट मुख्य सचिवांनाच पत्र पाठवले होते आणि सरकार म्हणजे कोण? अशी विचारणा केली होती. त्यावर मुख्य सचिवांनी देखील ‘मंत्री म्हणजेच सरकार’ असे उत्तर दिले होते. तेव्हा कायदा बियदा काही नाही, आपण सांगाल त्याच्याच सुनावण्या आधी येणार असे सांगितले होते ना खडसावून. तसेच आता पण करा. भाजपाकडे जाणाºया व्यापाºयांना दंड आणि आपली युनियन करू देणाºया कंपन्यांना प्लास्टिक बंदीमधून मुक्तता. असे जर का जोरात सांगितले ना तर बघा, सगळे कसे शांत बसतात. भाई, ते शिवाजी पार्कातले काका जरा जास्तीचे बोलले. तुम्हाला इवल्याशा बुद्धीचा सांगकाम्या म्हणाले. खरे आहे का हे? असेल तर त्यांना कसे कळाले आणि खरे नाही तर ते असे का म्हणाले? एक आयडिया भाई, दिल्लीवाले म्हणाले होते, प्रत्येकाला १५ लाख देतो म्हणून. तेव्हा ज्यांना ज्यांना दंड होईल त्यांच्या दंडाच्या पावत्या पाठवून द्या दिल्लीला. वळते करून घ्या म्हणावं त्या १५ लाखातून. पब्लिक खूश आणि परस्पर कमळाबाईचाही काटा निघेल... कसं काय?- अतुल कुलकर्णी