शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
3
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
4
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
6
श्रावनात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
7
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
8
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
9
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
10
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
11
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
12
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
13
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
14
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
15
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
16
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
17
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
18
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
19
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
20
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण

बालरंगभूमीला उभारी देणं ही आपलीच जबाबदारी आहे, विसरू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 08:43 IST

पुणे येथे सुरू असलेल्या बालरंगभूमी संमेलनात ख्यातनाम रंगकर्मी प्रतिभा मतकरी यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रतिभा मतकरी, ख्यातनाम रंगकर्मी

साठच्या दशकातील बालनाट्य चळवळीच्या तुम्ही साक्षीदार आहात, त्या काळाबद्दल काय सांगाल?

- लहान मुलांची भूमिका असलेलं नाटक म्हणजे बालनाट्य या समजुतीला छेद देण्याचं काम सुधा करमरकर आणि रत्नाकरने केलं. सुधा एका शिष्यवृत्तीच्या निमित्त अमेरिकेला गेली होती. तिथे तिने ज्या प्रकारची बालनाट्यं पाहिली तशी भव्यदिव्य नाटकं मराठी रंगभूमीवर यायला हवीत, असं तिला वाटलं. तिच्यासाठी रत्नाकरने लिहिलेल्या अस्सल भारतीय बाजाच्या ‘मधुमंजिरी’  नाटकाने बालनाट्य रंगभूमीला ऊर्जा दिली.

सुधा करमरकरने सुरू केलेल्या ‘लिट्ल थिएटर’तर्फे मी आणि रत्नाकरने ‘कळलाव्या...’ हे नाटक  केलं. त्यानंतर मात्र मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारं नेपथ्य असणारी, त्यांच्या भावविश्वाचे विषय असणारी नाटक करावीत असं आम्ही ठरवलं. ‘बालनाट्य’ या स्वत:च्या संस्थेतर्फे ‘राजकन्येची सावली हरवली’, ‘भामटे आणि कावळे’ आणि ‘एक होता मुलगा’ या तीन नाटिका बसवल्या. पहिल्या प्रयोगाला पु. ल. देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. हे प्रयोग मुलांपर्यंत पोहोचावेत यासाठी मी  शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून या नाटिकांचे प्रयोग करण्याची परवानगी मिळवली.चिकित्सक, बालमोहन या शाळा आमचे नाट्यप्रयोग करण्यासाठी तयार झाल्या. मुंबईपाठोपाठ आम्ही पुणे, सांगली या शहरात बालनाट्यांचे प्रयोग केले. सुटसुटीत नेपथ्य आणि हॉलच्या भाड्याचा वाचलेला खर्च यामुळे आम्ही केवळ आठ आण्यांत मुलांना नाटकं दाखवू शकलो. त्या दरम्यान आम्ही ‘निम्माशिम्मा राक्षस’ रंगभूमीवर आणलं. ‘गाणारी मैना’, ‘अचाट गावची अफाट मावशी’, ‘अदृश्य माणूस’, ‘अलबत्या गलबत्या’ ही आम्ही केलेली नाटकं  प्रौढांच्याही पसंतीला उतरली.

एनएसडीमधल्या नाट्य प्रशिक्षणाचा तुमच्या कामात कसा फायदा झाला? 

नाट्यनिर्मितीच्या बहुतेक सर्व बाजू मी आणि रत्नाकरच सांभाळत असू. त्याला प्रशिक्षणाची जोड असावी असं वाटलं. रत्नाकरची बँकेत नोकरी होती, त्यामुळे मग मी  एनएसडीमध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यायचं असं ठरवलं.  एनएसडीमध्ये मला नाटक या माध्यमाचा सर्वांगीण अभ्यास करता आला. दिल्लीहून परतल्यावर मी ‘धडपडे-बडबडे आणि मारकुटे मंडळी’ या बालनाट्याचं दिग्दर्शन केलं. वेळ पडेल तेव्हा या नाटकात धडपडे बाईंची भूमिकाही केली. ‘झुकझुकभाऊ इंजिनवाले’ हे नाटक लिहिलं.  राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश तसेच दुबई, मस्कत आणि अमेरिकेतही जाऊन नाट्य प्रशिक्षणवर्ग घेतले. ‘कास्प प्लॅन’ या संस्थेत काम करत असताना मला वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या समस्यांची जाणीव झाली. या मुलांना आपलंसं वाटेल असं नाटकाचं कथानक असणं गरजेचं होतं. रत्नाकरने त्यासाठी ‘बूटबैंगण’ हे नाटक लिहून दिलं. उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय मुलांपेक्षा झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या वाट्याला येणार आयुष्य वेगळं असतं. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी एक चळवळ उभी करण्याचं आम्ही ठरवलं. संजय मंगला गोपाळ, हर्षदा बोरकर ही मंडळी आमच्या सोबतीस आली. आज ठाण्यात ‘वंचितांचा रंगमंच’ ही चळवळ जोमाने उभी राहिली आहे. 

बालरंगभूमीत काळानुरूप होत असलेले कोणते बदल तुम्हाला जाणवतात? 

मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा, एक उत्तम माणूस म्हणून त्यांचा विकास व्हावा, हा बालरंगभूमीचा उद्देश सध्या हरवताना दिसतो आहे.  अल्पकालीन नाट्यशिबिरं, मुलांना सिरीअल, चित्रपटात भूमिका मिळेल अशी दिली जाणारी खोटी आश्वासनं आणि पालकांच्या(च) उपस्थितीत होणारे नाट्यप्रयोग यामुळे बालरंगभूमीचा दर्जा खालावतो आहे.  बालरंगभूमीच्या माध्यमातून मुलांवर संस्कार व्ह्यावेत, यासाठी शाळा, शिक्षक, पालक आणि सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. बालरंगभूमीवर सकस आशयाची नाटकं येणं आणि त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळणं ही काळाची गरज आहे.

मुलाखत : डॉ. संतोष पाठारेsantosh_pathare1@yahoo.co.in

 

टॅग्स :Natakनाटक