शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कार

By admin | Updated: June 19, 2016 01:42 IST

आता तर रोजच नवनव्या तंत्रज्ञानांची भर पडत आहे. त्याचा उपयोग दैनंदिन वापरासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा हा आढावा.

- प्रसाद ताम्हनकरआता तर रोजच नवनव्या तंत्रज्ञानांची भर पडत आहे. त्याचा उपयोग दैनंदिन वापरासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा हा आढावा.भारतीय भाषांचा शब्दकोश आॅनलाइनविविध भाषांनी नटलेल्या भारत देशात तसे भाषेकडे फारसे कधी गांभीर्याने पाहिले जात नाही. सरकार दरबारी अनेक भाषांविषयी अनास्थाच दाखवली जाते. विविध भाषांचे संवर्धन, जतन अत्यंत जरुरीचे असल्याचे मानले जात आहे. अशातच एक आनंदाची बातमी म्हणजे, केंद्र सरकारने आपल्या 'डिजिटल इंडिया' या उपक्रमांतर्गत 'भारतवाणी' अर्थात भारतीय भाषांचा आॅनलाइन शब्दकोश सादर करून एक सुखद धक्का दिला आहे. भारतवाणीच्या वेबसाइट तसेच अ‍ॅपचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. सध्या भारतवाणीवर एकूण २२ भाषांचा शब्दकोश लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या जोडीलाच इथे अनुवादाची सुविधाही उपलब्ध आहे. ज्ञानकोश, शब्दकोश, भाषाकोश, माहिती तंत्रज्ञान कोश, बहुमाध्यम कोश अशा गटांत या शब्दकोशाची विभागणी करण्यात आलेली आहे. ज्ञानकोशात सगळ्याच भाषांमधील ज्ञानकोशांचा संग्रह, बहुमाध्यम कोशात मल्टिमीडिया आणि विविध माध्यमांमध्ये कोश देण्यात येतील, शब्दकोशात विविध भाषांमधील विविध शब्दकोशांचा संग्रह, माहिती तंत्रज्ञान कोशात TDIL च्या माध्यमातून भाषांसाठी विकसित करण्यात आलेल्या विविध सॉफ्टवेअर्सची लिंकसह माहिती, पाठ्यपुस्तक कोशात विविध भाषांमधील पाठ्यपुस्तकांचा संग्रह, भाषा कोशात विविध भाषा शिकण्याची साधने आणि उदाहरणे असणार आहेत.BMW, जग्वारची स्वारी अवघ्या २० रुपयांतबीएमडब्ल्यू, जग्वार यासारख्या आलिशान गाड्यांची क्रेझ सर्वसामान्यांपासून ते बड्या आसामींपर्यंत सगळ्यांनाच असते. एकदा का होईना या गाडीत बसण्याची इच्छा अनेक लोक बाळगून असतातच. अशाच लोकांसाठी ओला कंपनीने खास योजना आखली आहे. मोबाइल अ‍ॅपद्वारे टॅक्सी भाड्याने देणाऱ्या या कंपनीने 'ओला लक्स' अर्थात ओला लक्झरी ही आपली नवी योजना सादर केली आहे. याद्वारे आपल्या जुन्या टॅक्सीजबरोबरच ओलाने बीएमडब्ल्यू, जग्वार, टाटा फॉर्च्युनर, मर्सिडिज, होंडा अशा आलिशान कंपनीच्या गाड्या टॅक्सी म्हणून उपलब्ध केल्या आहेत. इतर गाड्यांपेक्षा थोडी महाग, म्हणजेच २० रुपये प्रति किमी असे याचे भाडे असणार असून, कमीत कमी ५ किमी प्रवास करावा लागणार आहे. अर्थात कमीत कमी २०० रुपयांपासून पुढे याचे भाडे असणार आहे. सध्या दक्षिण मुंबईपुरतीच सुरू केलेली ही योजना लवकरच इतरही अनेक शहरांत सुरू होते आहे.व्हॉट्सअ‍ॅपवर फिंगरप्रिंट स्कॅनर'सुरक्षा' हा शब्द आता इंटरनेटवर अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. सुरक्षा मग ती तुमच्या संगणकाची असो, डेटाची असो अथवा बँक खात्यांची, ती अतिशय महत्त्वाची आहे. आजकाल विविध मेसेंजरद्वारे महत्त्वाच्या व्यवहारांच्या चर्चा होतात, खासगी माहिती शेअर केली जाते. अशा वेळी हे चॅट आणि मेसेंजर सुरक्षित राहणे गरजेचे आहे. आपल्या मेसेंजरला 'एंड टू एंड डिस्क्रीप्शन' ही महत्त्वाची सुरक्षा प्रदान केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप आता फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा घेऊन येत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. या स्कॅनरने व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर उघडणे वा लॉक करणे सहज शक्य असणार आहे. अनेक स्मार्टफोन्सच्या सुरक्षेसाठी हीच व्यवस्था दिली जात असताना, व्हॉट्सअ‍ॅपनेदेखील अशी सुरक्षा देण्याची मागणी यूजर्सकडून मोठ्या प्रमाणावर होत होती. येत्या काही दिवसांतच ही सुविधा कार्यरत होण्याची चिन्हे आहेत.क्लाउड बेस्ड फोननेक्स्टबीट रॉबीन हा पहिला क्लाऊड बेस्ड फोन दाखल झाला आहे. अनेक स्मार्ट आणि महागडे फोन मेमरी आणि स्पेसच्या बाबतीत कायमच रोषाला पात्र ठरत असतात. अशा वेळी थेट क्लाउड स्टोरेजची सुविधा देणाऱ्या या फोनची चर्चा आहे. या जोडीलाच फोनमध्ये दिलेले स्मार्ट सॉफ्टवेअर तुम्हाला क्लाउडची १०० जीबी स्पेस वापरायची सुविधा देते. एकदा का तुमच्या फोनमध्ये ३२ जीबी जागा भरली गेली की आपोआप हे सॉफ्टवेअर तुमच्या कंटेंटचे बॅक अप घेण्यास सुरुवात करते. ही कल्पना साधारण गूगल क्लाऊडसारखीच आहे. या फोनमधील इंटर्नल ३२ जीबी मेमरीपैकी २४ जीबी चक्क यूजरसाठी राखून ठेवण्यात आली आहे.